Wednesday, July 26, 2023

मी व्यवसाय का करावा ?

मी व्यवसाय का करावा ?

थोडा त्रास होइल वाचण्यासाठी  पण
आवर्जुन वाचा. . . प्रेरणा नक्की मिळेल.

आज बहुतांशी लोकांना असे वाटते की एक मोठ्या पगाराची नोकरी असावी, कारण साधारण आठ तासाच्या नोकरी मधे एक फिक्स पगार मिळत असतो आणि रिस्क पण कमी असते, पण एक तात्विक विचार केला तर ज्या ठिकाणी आपण नोकरी करत असतो त्या व्यवसायाचा मालक स्वतःच्या जिद्दीने आणि आत्मविश्वासाने व्यवसाय चालवत असतो आणि आपण मात्र तीथे नोकरी करत असतो !

तुमच्या कड़े जर जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर स्वतःचा व्यवसाय चालू करुण एक अनोखे विश्व तुम्ही  निर्माण करू शकता. पण एक लक्षात असू दया व्यवसाय करणे हे काम सोपे नाही कारण त्यासाठी मनाची तयारी हवी, मेहनत करण्याची इच्छा हवी आणि सतत व्यवसाय वाढीसाठी धडपड करण्याची तयारी हवी.

आज बरेचशे युवक सुशिक्षित आहेत पण नोकरी मिळत नसल्याने घरी बसून आहेत. आज बरेचशे युवक आहेत त्यांना व्यवसाय चालू करण्याची तीव्र इच्छा आहे पण कोणता व्यवसाय चालू करायचा किंवा व्यवसाय कसा चालू करायचा आणि व्यवसायासाठी पैसा कुठून उभा करायचा अशा अनेक प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यामुळे हे युवक घरीच बसून आहेत.

परिणामी आजची तरुण पिढ़ी निरशेपोटी चुकीच्या मार्गाला जात आहे. नैराश्य आणि कमी झालेला आत्मविश्वास याच्यामुळे ही पिढ़ी गुन्हेगारी आणि आत्महत्या अशा प्रवृत्ती कड़े वळू लागली आहे.

आजचे बरेचशे पालक व्यवसायातील धोक्याचा आणि तोटयाचा विचार करुण मुलांना मोठेपणी चांगले शिक्षण घेवून एक मोठ्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी आग्रही असतात पण तो आपला मुलगा किंवा मुलगी एक बिजनेसमैन किंवा बिज़नसवूमन होईल यासाठी अजिबात प्रयत्न नाही करत.

पालक आपल्या अपूर्ण इच्छा आकांशा मुलांवर लादतात आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरी कडे बोट दाखवतात. आज समाजामध्ये नोकरीला खूप प्रतिष्ठा आहे, आमचा मुलगा अमुक ठिकाणी कामाला आहे, आमच्या मूलाला एवढा पगार आहे असे बरेच पालक सांगत असतात . पण,

असे काही मोजकेच पालक असतात की जे ज्या क्षेत्रातमध्ये आपल्या पाल्याने शिक्षण प्राप्त केले आहे त्या क्षेत्रात काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशाने मुलांना व्यवसायासाठी प्रोत्साहन देतात, फारच कमी असे पालक असतात की जे अंबानी, टाटा, किर्लोस्कर, मित्तल, बजाज व डी.यस. कुलकर्णी यांचे उदहारण देवून व्यवसायामधे मुलांचे मन घट्ट करतात.

मित्रहो तुम्हाला व्यवसायामधे उतरायचे असेल तर मनाशी एक दॄढ़ निश्चय असावा, व्यवसाय करू की नोकरी करू अशी द्विधा मनःस्थिति असेल तर व्यवसाय न केलेला बरा, कारण आपण आपल्या निर्णयाशी ठाम नसाल तर व्यवसायामधे यश मिळणे खूप कठीन आहे, कदाचीत व्यवसायामध्ये सुरवातीला जर तुम्हाला अपयश आले तर नोकरी केली असती तर बरे झाले असते अशी तुमची मानसीक स्थिती होईल.

मी काही तरी नवीन करणार हे ध्येय असेल आणि व्यवसायामधे येणाऱ्या प्रत्येक अडचनींना सामोरे जाण्याची हिम्मत असेल तरच व्यवसाय करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावे. ज्यांना कुणाच्या हाताखाली काम करण्याची इच्छा नसते पण कष्ट करण्याची अपार इच्छाशक्ती असते त्यांनी व्यवसायामध्ये आपलं नशीब नक्की आजमावं.

मित्रहो आव्हान स्वीकारण्याची आणि संकटे  पचवण्याची ज्यांच्यामध्ये ताकद असते ती माणसे उद्योग क्षेत्रामध्ये स्वतःची नवी ओळख निर्माण करतात, अशी ओळख  नोकरी मध्ये तुम्हाला कधीच  मिळनार  नाही. व्यवसायामध्ये जीद्धीने यशस्वी झालात तर अमर्याद पैसा  तुमचाच असतो आणि एक प्रतिष्ठा मिळते ती बहुतेक तीस-चाळीस वर्षाच्या नोकरीमध्ये तुम्हाला कधीच मिळणार नाही .

ज्यांना घरची पार्श्वभूमी ही पिढीजात व्यवसाय करण्याची असते त्यांना मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे व्यवसायाचे धडे लहानपणापासूनच मिळत असतात. पण ज्यांच्या घरची पार्श्वभूमी ही पिढीजात व्यवसाय करण्याची नसते  त्यांनी व्यवसायाचे योग्य ते प्रशिक्षण आणि नियोजन करूनच व्यवसायाला सुरवात करावी.

व्यवसाय सुरु करण्याअगोदर मी व्यवसाय का करायचा हा प्रश्न नक्की स्वतःला विचारा त्याचबरोबर स्वतःची आर्थिक , बौद्धिक , मानसिक व शारीरिक तयारी आहे का याची ही एकदा उजळणी करावी .

सांगायचे झाले तर अपयश आल्याशिवाय यश काय आहे याची गोड चव कळत नाही. व्यवसाय म्हंटला की नफा किंवा तोटा हा येतोच पण थोडयाश्या अपयशाने खचून न जाता आलेल्या संकटाला सामोरे जाण्याची तयारी असेल तर व्यवसायामध्ये मिळालेले यश हे तुमचेच असते. मी व्यवसायामध्ये यशस्वी होणारच हे ध्येय असेल तर निश्चितच तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही.

व्यवसाय सुरु करताना त्या व्यवसायाचे सखोल ज्ञान असणे खूप गरजेचे आहे जर आपल्याला एखाद्या व्यवसायाची सखोल माहिती नसेल तर संपूर्ण माहिती गोळा करूनच योग्य नियोजन करावे. तसेच तुम्ही करत असणाऱ्या व्यवसायाची तुम्हाला आवड पाहिजे जर तुम्हाला आवडच नसेल तर कशातच रस राहणार नाही.

एक लक्षात ठेवा व्यवसायामध्ये वेळेचे बंधन नसते अगदी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्हाला व्यवसायात मेहनत करावी लागू शकते, उदाहरणासाठी बघायला गेले तर स्वीट चे दुकान, हे दुकान सकाळी सात वाजता उघडते पण स्वीट विकणारा दुकानदार सकाळी पाच वाजल्यापासून त्याच्या दुकानाच्या तयारीला लागतो आणि संध्याकाळी दहा पर्यंत हे दुकान चालूच असते म्हणजे हा दुकानदार फक्त सहा तास झोपतो आणि अठरा तास व्यवसायामध्ये डूटी करत असतो. सांगायचे झाले तर व्यवसायामध्ये जेवढा वेळ दयाल तेवढा कमीच आहे.

तुमच्या पंखांमध्ये जेवढे बळ असेल तेवढे उंच तुम्ही तुमचा बिझनेस तुम्ही नेवू शकता.

मित्रहो व्यवसाय करायचा की नोकरी हा निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ लागू द्या पण संपूर्ण विचार करूनच योग्य तो व्यवसाय चालू करा पण एकदा घेतलेल्या निर्णयाशी ठाम रहा आणि त्या निर्णयाशी तुम्ही ठाम राहिलात तर उद्योजक म्हणून तुमचे नाव प्रत्येकाच्या तोंडावर असेल.

Sunday, April 12, 2020

डोंबिवली चा इतिहास


डोंबिवली.....

डोंबिवली शहराचे वैशिष्ट्य हे आहे कि हे शहर कोणत्याही राजाने, सरदाराने, वा खोताने वसविलेले नाही. तत्कालीन परिस्थितीत सामान्य लोकांच्या गरजा व आकांक्षा यातून या शहराची निर्मिती झाली आहे. सन १९१८ मध्ये पहिल्या महायुद्धाची समाप्ती झाली. त्यानंतर महागाई झाली व राहण्याच्या जागांची टंचाई भासू लागली. त्यातून काही लोकांच्या मनात डोंबिवलीत घरे बांधावी असे आले व त्यानुसार सरकारी नोकर व मध्यम वर्गीय लोक डोंबिवलीत राहण्यासाठी येऊ लागले. येथे पाथरवटांची आळी होती त्यास पाथर्ली, ठाकुरांची आळी होती त्यास ठाकुर्ली, व डोंबांची वस्ती होती त्यास डोंबिवली म्हणत असत. डोंबिवली गाव पुरातन आहे. इतिहासकालीन ठाणे व कल्याण येथे होणाऱ्या राजकीय घडामोडींशी या भागाचा अंशतः संबंध होता. परंतु इतिहासात फार काही नोंदी नाहीत.
ऐतिहासिक नोंदी :-
तुर्भे बंदराजवळील माहुल गावी शिलाहार राजा हरिपालदेव ह्याचा शके १०७५ (सन ११५३) मधील एक लेख सापडला असून त्यात "डोंबिल वाटिका " असा उल्लेख आहे.
डोंबिवलीच्या पूर्वेस मानपाडा रस्त्यावर गावदेवी मंदिराच्या बाजूला एक ऐतिहासिक शिलालेख आहे तो इसवी सन १३९६ मधील आहे. त्यात श्री आलुनाकु या नावाचा राजा ठाण्यावर राज्य करत होता व त्याने केलेले दानपत्र नमूद आहे. याने आपला सेवक जसवंत दळवै याला आठगावामधील (अष्टागर ) डोंबिवली नावाचे गाव दान केले आहे. असा शिलालेखात उल्लेख आहे.
अणजूरच्या नाईक घराण्याच्या इतिहासात व इतर पत्रव्यवहारात व दीक्षित भटजी यांना दिलेल्या बक्षीस पत्रातून "डोंबोली" असा उल्लेख सन १७३० सालचा असल्याचे आढळले आहे.
याशिवाय हे शहर खोलगट भागात असल्याने ज्याला हुवाली म्हणतात त्यावरूनच डोंबिवली हे नाव पडले असावे. डिसेंबर १९२१ या महिन्यात ग्रामपंचायत अस्तित्वात आली लकै मणीलाल ठाकूर हे या ग्रामपंचायतीचे पहीले अध्यक्ष तर कै बहिराव अभ्यंकर हे पहीले सरचिटणीस होते. ग्रामपंचायतीच्या स्थापनेनंतर १९३१ साली वीजपुरवठा सुरु झाला. १९३६ साली पंचायत विहीर बांधण्यात आली. वीज व पाणी आल्यामुळे या शहराची वस्ती वाढू लागली. १९५८ साली सप्टेंबर महिन्यात नगरपालिका अस्तित्वात आली. या नगरपालिकेचे उद्घाटन आमदार कृष्णराव धुळप यांच्या हस्ते झाले आणि कै वि पो तथा बापूसाहेब पेंडसे यांनी पहिल्या अध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळला. १९८३ साली कल्याण डोंबिवली महानगर पालिका स्थापन झाली व सौ आरती मोकल या पहिल्या महापौर झाल्या. या शहराने आजतागायत सांस्कृतिक नगर अशी आपली वेगळी ओळख जपली आहे.
फडके रोड

ज्या फडके रस्त्याने डोंबिवलीतील तरुणाईला भुरळ घातली त्या रस्त्यासही इतिहास आहे. १८५७ च्या काळात स्टेशन वर येण्याजाण्यासाठी रस्ता नाही हे ओळखून त्यावेळचे लोकल बोर्डाचे लोकनियुक्त अध्यक्ष सखाराम गणेश तथा बापूसाहेब फडके यांनी पुढाकार घेत एक रस्ता तयार केला. याच रस्त्याला त्यांचेच नाव द्यावे असा ठराव गावकीच्या सभेत झाला - तोच आजचा फडके रस्ता.
सदरचा इतिहास अनेक पुस्तकांमधून व जुन्या वृत्तपत्रांमधून सारांश घेत वाचकांना सादर करीत आहोत
लोकसंख्या (२०११)

कल्याण डोंबिवली महानगरपालिका - १२,४७,३२७
पुरुष - ६,४९,६२६
महिला - ५,९७,७०१
साक्षर व्यक्ती - १०,२९,०४१
साक्षरता प्रमाण - ९१. ३७ %
पुरुष टक्केवारी - ९३. ७३ %
महिला टक्केवारी - ८८. ८१ %
लिंग गुणोत्तर – ९२०
डोंबिवली रेल्वे स्थानक

डोंबिवलीतील लोकांच्या भावविश्वात डोंबिवली रेल्वे स्थानकाला अढळ स्थान आहे. डोंबिवलीहून मुंबईला पोहचण्यासाठी रेल्वे हे सर्वात वेगवान वाहतुकीचे साधन आहे. त्यामुळे रोज लाखो डोंबिवलीकर लोकलने मुंबई गाठतात.
डोंबिवली रेल्वे स्थानक मध्य रेल्वेवर असून मुंबई सी. एस. टी. पासून ते तेवीसावे स्थानक आहे व सी. एस. टी. पासून ४८ किमी अंतरावर आहे. या स्थानकात पाच प्लॅटफॉर्म असून तीन पूल व दोन सरकता जिने आहेत. हे रेल्वे स्थानक सन १८८६ मध्ये बांधण्यात आले असून सन १९५३ मध्ये त्याचे विद्युतीकरण झाले. सध्या डोंबिवलीहून अनेक लोकल्स सुटतात. डोंबिवलीला सर्व वेगवान आणि धीम्या लोकल्स थांबतात. प्रचंड गर्दी असली तरी मुंबईला पोहचण्यासाठी रेल्वे हेच एक वेगवान वाहतूक माध्यम आहे.
डोंबिवलीतील ग्रंथालय व वाचनालये

अनेक सुशिक्षितांचे शहर असणाऱ्या डोंबिवलीत समृद्ध ग्रंथालये व वाचनालये असून ती डोंबिवलीकरांची वाचनाची आवड जोपासत आहेत. विविध विषयांवरील असंख्य पुस्तके या ग्रंथालयात व वाचनालयात संदर्भासाठी तसेच घरी नेण्यासाठी उपलब्ध आहेत. पुस्तके विकत घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी सुद्धा अद्ययावत पुस्तक विक्री केंद्रे डोंबिवलीत कार्यरत आहेत. आज हजारो डोंबिवलीकर या विक्री केंद्रांचा आणि वाचनालयांचा लाभ घेत आहेत. अनेक वाचनालये संगणकीकृत असून ऑनलाईन सुद्धा पुस्तक नोंदवता येते.
डोंबिवलीतील काही पुस्तक विक्री केंद्रे

मॅजेस्टिक बुक स्टॉल
ज्ञानदा ग्रंथ वितरण
शारदा ग्रंथ वितरण
ललित ग्रंथ सागर
बुक कॉर्नर
गणेश बुक डेपो
बागडे स्टोअर्स
गद्रे बंधू
रसिक बुक डेपो
डोंबिवलीतील काही वाचनालये

डोंबिवली ग्रंथ संग्रहालय - पूर्व
डोंबिवली ग्रंथ संग्रहालय - पश्चिम
श्री गणेश मंदिर संस्थान वाचनालय
ब्राह्मण सभा वाचनालय
बुक कॉर्नर
श्री स्वामी समर्थ ग्रंथालय व संदर्भ ग्रंथालय
साईनाथ वाचनालय (आता बंद )
रसिक वाचनालय
सावरकर बालवाचनालय
विकास वाचनालय (आता बंद)
अमृता वाचनालय
रीडर्स कॉर्नर
योगायोग वाचनालय
याशिवाय संपूर्ण वर्षभरात विविध संस्थांकडून डोंबिवलीत ग्रंथ प्रदर्शने भरवली जातात. त्यांनाही डोंबिवलीकर रसिक चांगला प्रतिसाद देतात. आतापर्यंत अनेक नामवंत संस्थांनी अशी प्रदर्शने डोंबिवलीत भरवली आहेत. त्यापैकी काही संस्था खालीलप्रमाणे आहेत.
ज्ञानदा ग्रंथ वितरण
आरती प्रकाशन
अक्षरधारा
बुक कॉर्नर
ग्रंथाली
मॅजेस्टिक प्रकाशन
नॅशनल बुक ट्रस्ट
चिल्ड्रन बुक ट्रस्ट
विकास वाचनालय (आता बंद)
डोंबिवली - एक साहित्य नगरी

डोंबिवली हे ठाणे जिल्ह्यातील एक ख्यातनाम शहर असून त्यास महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणतात. सांस्कृतीक राजधानी असलेल्या पुण्याखालोखाल डोंबिवलीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत असतात. साहित्य, कला, संगीत, नृत्य, नाट्य, आध्यात्मिक आणि वक्तृत्वविषयक विविध कार्यक्रम डोंबिवलीत वर्षभर होत असतात आणि दर्दी रसिक या सर्व कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित असतात. डोंबिवलीत कथा, कादंबरी, प्रवासवर्णने, ललितलेखन आणि कविता लिहिणारे अनेक लेखक व लेखिका निवासाला होते व सध्या राहत आहेत. यापैकी प्रत्येकाने डोंबिवलीचे नाव महाराष्ट्राच्या साहित्य नकाशावर झळाळून टाकले आहे. याचबरोबर साहित्यविषयक अनेक संस्था डोंबिवलीत कार्यरत आहेत व वर्षभर असंख्य कार्यक्रम त्या आयोजित करत असतात.
डोंबिवलीत निवास केलेले काही दिवगंत ख्यातनाम साहित्यिक

कै. श्री. पु. भा. भावे.
कै. श्री. शं. ना. नवरे.
कै. श्री. प्रा. अनंतराव कुलकर्णी.
कै. श्री. व. शं. खानवेलकर.
कै. श्री. राम बिवलकर
कै. श्री. भा. द. लिमये
कै. प्रभाकर अत्रे
डॉ. गॊ. प. कुलकर्णी
कै. श्री. वि. स. गवाणकर
कै. श्री. चित्तरंजन घोटीकर
कै. श्री. स. कृ. जोशी
कै. श्री. ना. ज. जाईल
डॉ. श्री. व. वि. पारखे
कै. श्री. ल. ना. भावे
कै. श्रीमती सुमती पायगावकर
कै. श्रीमती प्रभावती भावे
डॉ. वसुंधरा पटवर्धन
कै. ज. बा. कुलकर्णी
कै. गणा प्रधान
कै. जयंत रानडे
याशिवाय आज साहित्य क्षेत्रात आपल्या लेखन कर्तृत्वाने आपला ठसा उमटवणाऱ्या अनेक साहित्यिकांनी डोंबिवलीत काही काळ वास्तव्य केले. ते आता जरी इतरत्र राहात असले तरी डोंबिवलीकरांना त्यांचा निश्चित अभिमान आहे. त्यापैकी काही ख्यातकीर्त व्यक्तींची नावे खाली दिली आहेत.
श्री. वसंत सबनीस.
श्री. विं. दा. करंदीकर.
श्री. विजय तेंडुलकर.
श्री. गोविंदराव तळवलकर.
श्री. वा. य. गाडगीळ.
श्री. रंगनाथ कुलकर्णी.
श्री. शंकर सारडा.
श्री प्रवीण दवणे.
श्री. म. पा. भावे.
श्रीमती मुक्ता केणेकर
श्री परेन जांभळे.
श्रीमती विनिता ऐनापुरे.
श्रीमती माधवी घारपुरे.
डॉ. महेश केळुसकर.
श्री. विश्वास मेहंदळे.
याचबरोबर डोंबिवलीत आज अनेक कवी, कथाकार, कादंबरीकार, ललित लेखक, इतिहास लेखक, ज्योतिष विषयावरील लेखक आणि विज्ञानलेखक राहत असून आपल्या अजोड साहित्य निर्मितीने डोंबिवलीचेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचे साहित्य विश्व समृद्ध करत आहेत. ह्या सर्वांचा नामोल्लेख केवळ जागेअभावी शक्य नाही पण त्यांच्या साहित्य सेवेला आम्ही मनपूर्वक अभिवादन करतो.
डोंबिवलीतील साहित्यविषयक संस्था

सृजनशील लेखक / कवींच्या कला गुणांना उत्तेजन व मार्गदर्शन मिळावे, त्यांना आपल्या साहित्यगुणांचे सादरीकरण करण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे आणि साहित्यातील नवनव्या प्रवाहांशी त्यांचा परिचय व्हावा यासाठी डोंबिवलीत अनेक साहित्यविषयक संस्था कार्यरत आहेत. या संस्था वर्षभर अनेक उपक्रम हाती घेत आहेत व विविध साहित्यविषयक कार्यक्रम आयोजित करत असतात. यातून प्रस्थापित लेखकांचा नवोदित लेखकांना परिचय होतो व आपणही नवनिर्मिती करावी असे त्यांना प्रोत्साहन मिळते. साहित्याची जाण, प्रसार व निर्मिती यात या संस्था मोलाचे योगदान देत आहेत. या संस्थांपैकी काही साहित्यसंस्थांची नामसूची खालीलप्रमाणे आहे.
डॉ. आंबेडकर मंच.
काव्य रसिक मंडळ.
कोंकण मराठी साहित्य परिषद, डोंबिवली शाखा
डोंबिवली साहित्य सभा
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, डोंबिवली शाखा
स्वा. सावरकर अभ्यास मंडळ
साहित्य मंथन
साहित्य मंच
गीता धर्म मंडळ
ज्ञानेश्वरी अभ्यास मंडळ
दासबोध प्रकाश मंडळ
ग्रंथाली वाचक चळवळ
साहित्य चर्च मंच, डोंबिवली
धम्मदीप साहित्य सभा
डोंबिवलीत संपन्न झालेली विभागीय साहित्य संमेलने

डोंबिवलीत आतापर्यंत अखिल भारतीय साहित्य संमेलन जरी झाले नसले तरी यापूर्वी विविध विभागीय साहित्य साहित्यसंमेलने संपन्न झाली आहेत. संमेलनामुळे साहित्यातूनच समाजात संस्कार झेलण्याची प्रक्रिया वाढते व साहित्याचे प्रभाव क्षेत्र वाढते. याच हेतूने डोंबिवलीत आयोजित केलेल्या विभागीय संमेलनांपैकी काही संमेलनांची सूची खाली दिली आहे.
सातवे विभागीय साहित्य संमेलन २४,२५ व २६ जानेवारी १९९३
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे चौथे राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन १० ते १२ डिसेंबर १९९९
साहित्य चर्चा मंच २६ जानेवारी १९९९
काव्य रसिक मंडळ - रौप्यमहोत्सवी संमेलन १९९१- सुवर्णमहोत्सवी संमेलन - फेब्रुवारी २०१६
डोंबिवली - सांख्यिकी

अक्षवृत्त - १९. २१८४३३ ° N
रेखावृत्त - ७३. ०८६७१८ ° E
समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची १३. ५३४ मीटर्स [ ४४. ४०३ फूट ]
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे अंतर - ४८ किमी
कल्याण रेल्वे स्थानकापासून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे अंतर - ४ किमी
ठाणे रेल्वे स्थानकापासून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे अंतर - १४ किमी
पुणे रेल्वे स्थानकापासून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे अंतर - १४६ किमी
नाशिक रेल्वे स्थानकापासून [ डोंबिवली रेल्वे स्थानकाचे अंतर ] - १४७ किमी
जवळचा विमानतळ - मुंबई - ४९ किमी, पुणे - १४७ किमी
रस्तामार्गे विविध शहरापासून डोंबिवलीचे अंतर
ठाणे - डोंबिवली ___ २७ किमी
पुणे - डोंबिवली ___ १४४ किमी
नाशिक - डोंबिवली ___ १४३ किमी
कल्याण - डोंबिवली ___ ०४ किमी
वाहतूक व्यवस्था - डोंबिवली येथे एक्सप्रेस रेल्वे गाड्या थांबत नाहीत. एकतर कल्याण किंवा ठाणे येथे उतरून डोंबिवलीला लोकलने यावे लागते. डोंबिवलीतील एम आय डी सी भागात एसटीचे स्थानक आहे. पुणे, नाशिक, धुळे कोंकणातील अनेक नगरे, उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक नगरांहून डोंबिवलीसाठी एसटी बसेस उपलब्ध आहेत. कल्याण एसटी स्थानकातून उतरून रिक्षा किंवा स्थानिक बसने डोंबिवलीला येता येते. मुंबई, पुणे व नाशिक येथून खाजगी टॅक्सी उपलब्ध आहेत.
डोंबिवलीतील साप्ताहिके – मासिके – वार्षिक अंक

डोंबिवलीच्या साहित्यिक वातावरणाला साजेसे असे प्रकाशनविश्व डोंबिवलीत आहे. या सांस्कृतिक नगरीत अनेक साप्ताहिके, मासिके, व वार्षिक अंक प्रकाशित होतात. डोंबिवलीहून एकही दैनिक जरी प्रकाशित होत नसले तरी मुंबईतल्या सर्व वृत्तपत्रांच्या ठाणे व कल्याण डोंबिवली परिसरासाठी विशेष पुरवण्या आहेत व त्यात या परिसराचा समग्र आढावा रोज घेतला जातो. डोंबिवलीत अन्य भाषिकसुद्धा मोठ्या संख्येने राहात असल्यामुळे मराठीतील सर्व दैनिकांबरोबर भारतातील अनेक नामवंत अन्य भाषिक दैनिके उपलब्ध होतात. डोंबिवलीतून प्रकाशित होणारी काही साप्ताहिके– मासिके- वार्षिक अंक खालीलप्रमाणे आहेत.
लव-अंकुश
नव उद्घोष
डोंबिवली एक्सप्रेस
रंगतरंग
अक्षर सहवास
साहित्यजागर
ओंजळ
सुगंध
अनेक गृहपत्रिका, मुखपत्रे, त्रैमासिके, पाक्षिके, विविध दिवाळी अंक व अनियतकालिके
मी डोंबिवलीकर- सन २००९ पासून हे मासिक प्रकाशित होत आहे. अत्यंत आकर्षक रुपातले व अनेक विषयांना स्पर्श करणारे हे मासिक डोंबिवली साहित्य विश्वातले एक मानाचे पान ठरले आहे. यांचा दरवर्षी प्रकाशित होणारा दिवाळी अंक हा सर्वार्थाने विशेषांक ठरतो. तसेच प्रतिवर्षी डोंबिवलीकर दिनदर्शिका सुद्धा प्रकाशित होत आहे. प्रत्येकवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंत डोंबिवलीकरांचा परिचय त्यात दिलेला असतो. त्यामुळे तो कायमस्वरूपी संग्राह्य दस्तऐवज झाला आहे.
डोंबिवलीतील प्रकाशने

डोंबिवली शहराला सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे व साहित्याची प्रदीर्घ परंपरा आहे. मध्यम वर्गाचे निवास ठिकाण म्हणून ख्याती असलेल्या डोंबिवलीत अनेक लेखक व कलावंत राहातात. या शहरातील सांस्कृतिक- साहित्यिक- कलामय वातावरणाने अनेक साहित्यविषयक चळवळी व घडामोडींना तसेच लेखकांना स्फूर्ती दिली व त्यांना मोठे केले. लेखनापाठोपाठ प्रकाशन व्यवसायसुद्धा ह्या भूमीत रुजला व मोठा झाला. सन १९८० च्या सुमारास डोंबिवलीत व्यावसायिक पातळीवरील प्रकाशन संस्था उदयाला आल्या व प्रकाशन व्यवसायाचा शुभारंभ झाला. आज डोंबिवलीत अनेक प्रकाशक विविध व अनवट विषयांवरील पुस्तके प्रकाशित करत आहेत. व साहित्यविश्वात डोंबिवलीचे नाव सर्वतोमुखी करत आहेत. या प्रकाशकांपैकी काही नामवंत प्रकाशन संस्था खालीलप्रमाणे आहेत.
आरती प्रकाशन- डोंबिवलीतील पहिली प्रकाशन संस्था
अश्वमेध प्रकाशन
दीपरेखा प्रकाशन
दीपाली प्रकाशन
मोरया प्रकाशन
मोहिनीराज प्रकाशन
योगेश्वर प्रकाशन व द्विमित्र प्रकाशन
राधिका प्रकाशन
रावजी प्रकाशन
वंदना प्रकाशन
ॐ शांती प्रकाशन
विनायक प्रकाशन
सुमेरू प्रकाशन

Wednesday, April 11, 2018

30 मिनीट चालण्याचे ३० फायदे

30 मिनीट चालण्याचे ३० फायदे
जर आपण सकाळी लवकर ऊठुन ३० मिनीटे घराच्या बाहेर फिरायला जाण्याची तयारी ठेवत असाल तर प्रथम आपले अभिनंदन. !!
कारण आपण दिर्घायुष्यी आहार व आपण आजारी पडण्याचे प्रमाण नगण्य आहे. तर हा लेख नक्कीच वाचा.दररोज ३० मिनीटे चालण्याचे फायदे
🚶🏻१. एक पैसाही खर्च न करता करता येणारा व्यायाम प्रकार
🚶🏻२. सर्वांना करण्यासाठी सहज, सोपा व्यायाम प्रकार
🚶🏻३. कोणत्याही प्रकारच्या साहित्याशिवाय करता येणारा व्यायाम प्रकार
🚶🏻४. शरीर तंदुरुस्त, चपळ ठेवण्यासाठी एकमेव व्यायाम प्रकार
🚶🏻५. सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुध्द ऑक्सीजन चा शरीराला पुरवठा होतो.
🚶🏻६. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डि जीवनसत्व सकाळ्च्या कोवळ्या ऊनातून मिळते.
🚶🏻७. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
🚶🏻८. सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.
🚶🏻९. चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत
🚶🏻१०. चालण्यामुळे झोपही चांगली लागते.
🚶🏻११. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.
🚶🏻१२. वजन कमी करण्याचा किंवा वजन सpk🌿🚶🏻🏃🏽🌿१३. चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते
🚶🏻१४. चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.
🚶🏻१५. दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असं संशोधनातून समोर आलं आहे.
🚶🏻१६. चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे पचनाचे विकार कमी होतात.
🚶🏻१७. झपझप चालण्यामुळे हृदयाची गती व स्टॅमिना वाढतो .
🚶🏻१८. नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यु येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.
🚶🏻१९. नियमित चालणारयांची फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.
🚶🏻२०. नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
🚶🏻२१. नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.
🚶🏻२२. हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते.
🚶🏻२३. नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायु मजबुत होतात
🚶🏻२४. मोतीबिंदु ची शक्यता कमी होते.
🚶🏻२५. नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासुन बचाव
🚶🏻२६. नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबुत करण्यासाठी उपयोग.
🚶🏻२७. चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते
🚶🏻२८. दररोज ३० मिनीटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते.
🚶🏻२९. नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.
🚶🏻३०. चालण्याचा व्यायाम करण्याआड वय मात्रकधीही येत नाही. आपण आपल्य नव्वदीतही शरीर साथ देत असेल तर चालण्याचा व्यायाम करू शकता, मात्र झेपेल इतकाच!.
🌷आरोग्यम् धनसंपदा 🌷

Wednesday, January 31, 2018

तेंव्हा गणित बिघडायला लागतं*

*" तेंव्हा गणित बिघडायला लागतं* "
----------------------------------------------

मी म्हणतो तसंच
सर्वांनी वागलं पाहिजे
असा आपला अट्टहास जेंव्हा सुरु होतो
तेंव्हा गणित बिघडायला लागतं

आज पर्यंत माझा कोणताच अंदाज चुकला नाही
इतका मी भविष्याचा correct अंदाज घेऊ शकतो
तेंव्हा माझ्या निर्णयाला कुणी विरोधच करायचा नाही
असा अहंकार जेंव्हा खूप वाढीस लागतो
तेंव्हा गणित बिघडायला लागतं

एवढं " मी " सागळ्यांसाठी केलं
तरीही
कुणीच त्याची नोंद घेत नाही
चार माणसात कुणी
आमचं कौतुकही करत नाही
अशा अपेक्षांचं ओझं
जेंव्हा आपण इतरांवर टाकायला लागतो
तेंव्हा गणित बिघडायला लागतं

या घरात फक्त " मीच " शहाणा आहे
या ऑफिस मध्ये फक्त " मीच " सिन्सीअरली काम करतो आणि बाकीचे सगळे कामचुकार आहेत
हा व्यवसाय जो भरभराटीस आला तो केवळ " माझ्या कष्टामुळे " !
इतरांना त्याचं काहीच देणं घेणं नाही असा भ्रम जेंव्हा वाढीस लागतो
तेंव्हा गणित बिघडायला लागतं

मी जसं वागतो
तसंच इतरांनी वागावं
हेच खावं , तेचं प्यावं
इतके वाजताच झोपावं
तितके वाजताच उठावं
अशी नाना तऱ्हेची
अनावश्यक बंधन घालून
जेंव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणायला लागतो
तेंव्हा गणित बिघडायला लागतं

म्हणून आपल्या अवती भवतीच्या माणसांना स्वातंत्र्य द्या
थोडा मोकळा श्वास घेऊ द्या
नातू झाल्यावरही पोराला
लहान समजू नका !

पदोपदी इतरांचा आपमान करू नका
आपलं मत जरूर नोंदवा
पण आग्रह करू नका
आपल्या मतापेक्षा इतरांच मत ग्राह्य धरल्या गेलं तर राग राग , चीड चीड करू नका
कधी तरी का होत नाही
दुसऱ्याचंही कौतुक करा
मग बघा जगणं किती छान , आनंदी , सोप्प वाटायला लागतं
आणि सगळी गणितं कशी जुळून यायला लागतात .....!!

Monday, August 28, 2017

सकारात्मक विचार

THINK POSITIVE

मनात दररोज (24 तासांत) 60 हजार विचार येतात.
यातील 60 ते 70%  विचार हे नकारात्मक असतात.
नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे गरजेचे असते.

सकारात्मक विचार आपली शक्ती,
आत्मविश्‍वास,
मनोबल वाढवतात.

नकारात्मक विचारांना -
सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच - मनाशी युध्द करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात. ‘‘रात्रं दिनं आम्हां युदधाचा प्रसंग’’!

*थॉमस् अल्वा एडिसनने* 999 प्रयोग केले - हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. थॉमसला ज्यावेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारलं. थॉमस 999 प्रमाणे फसले याबाबत तुला काय वाटले ?

थॉमस म्हणाला 999 प्रयोग फसले असे म्हणू नका. 999 वेळा मी हे सिध्द केलं, या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही. (सकारात्मक दृष्टीकोन)

*नेपोलियन* समुद्र किनार्‍यावर सैन्यासमोर जहाजातून उतरताना पाय चिखलावर घसरून छातीवर आडवा पडला,
छाती चिखलाने माखली. 
तेव्हा अंधश्रध्दाळू सैनिकांना वाटलं.
आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला पराभव होणार,
आपली मुंडकी उडणार - सैनिक भयभत झाले.
नेपोलियनने ही बाब हेरली.

तो उठताना छातीत झटकत म्हणाला,  ‘मित्रांनो आजचे युध्द आपणच जिंकणार,
जिथे जिथे आपण जाऊ तेथे - तेथे आपला विजय होणार’ कारण आल्या आल्या या भूमीने मला अलिंगन दिले आहे -
मी तुझी आहे,
मी तुझी आहे.... ...

मित्रांनो सैनिकांचे मनोबल वाढले व सगळीकडे मोठी विजयश्री त्यांनी खेचून आणली. 
हे घडलं सकारात्मक दृष्टीकोनामुळे.

टेबलावर एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे.
जर असा विचार केला की,
अर्धा भरला आहे त्यामुळे मन समाधानी होतं.
पण तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की, नैराश्य, व्याकूळता, हताशपण येतं.

सकारात्मक दृष्टीकोन मनाला प्रसन्न करून - अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो त्यामुळे कर्माला गती प्राप्त होते आणि आत्मविश्‍वास वाढतो.

नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो.
परिणामी कर्माची गती मंदावते - चुका होतात - हानी होते व यातूनच औदासिन्य (Depression) येते.

*गौतम बुध्दाजवळ* एक शिष्य धापा टाकत आला व म्हणाला भगवान ‘‘मला गावकर्‍यांनी शिवी दिली.’’

बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं त्यांनी तुला मारलं नाही.’’

तो म्हणाला ‘‘भगवान नंतर त्यांनी मला मारलं सुध्दा’’  भगवान म्हणाले ‘‘या मारामुळे तुला काही जखम झाली का ?’’, शिष्य म्हणाला ‘‘भगवान माझं डोकं फुटलं आहे.’’ गौतम बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं - तुझा मृत्यू झाला नाही.’’ हे ऐकून शिष्य शांतपणे बुध्दाच्या चरणाजवळ शांत बसला,

बुध्दांना हेच सांगायचे होते की, *जी घटना घडली त्यापेक्षा वाईट घटना घडू शकली असती पण ती घडली नाही यामुळे समाधानी रहा*.

मी अस्वस्थ आहे,
पण लोकं माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थ आहेत असा विचार मनाची तात्कालीक अस्वस्थता बर्‍याच प्रमाणात नियंत्रीत करतो.

माजी राष्ट्रपती *अब्दुल कलामांना* नौदलात भरती होता न आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले.

काही वेळा अपयश हे महान यशाचे पण सूचक असते.
म्हणून सकारात्मक विचार करा व आनंदी रहा.

*कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत*
*डोळे उघडून बघा-प्रत्येकाला उडण्यासाठी-फुलपाखरासारखे पंख आहेत* ....😊

     👍 *So Be Positive !* 👍