Friday, January 20, 2017

आयुर्वेदिक डॉक्टरने आरोग्यासाठी केलेल्या १४० मौलिक सूचना

 आयुर्वेदिक डॉक्टरने आरोग्यासाठी केलेल्या १४० मौलिक सूचना

खुप छान आहेत 
जरूर वाचा

१. दररोज न चुकता ३० मिनिटे शास्त्रोक्त पद्धतीने चालायाला जा . (लक्षात असू द्या “चालला तो चालला,थांबला तो संपला”) 
२. दररोज कोणतेही एकतरी फळ खावे. (खास करून सफरचंद,संत्रे,केळे,पपई,सीताफळ,आवळा यापकी एखादे)
३. दररोज सकाळी अनुशापोटी कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस व एक चमचा मध घालून प्या. 
४. प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याऐवजी शक्यतो पूर्ण जेवण करा. 
५. कृत्रिम रंग व गोडी आणणारी साखर यांचा वापर करून केलेले घन / द्रव पदार्थ खाणे टाळा. 
६. दुपारचे व रात्रीचे जेवणाची सुरुवात सॅलेड खाण्याने करा. 
७. दिवसातून दोन वेळा ३ ते ५ मिनिटे दीर्घ श्वास घेण्याचा प्रघात ठेवा. 
८. रात्री शांत झोप लागण्यासाठी ,झोपण्यापूर्वी मनाचा थकवा जाऊन मन प्रसन्न व्हावे यासाठी दोन मिनिटे एखाद्या सुगंधाचा भरभरून वास घ्या.
९. रात्री झोपण्यापूर्वी अर्धी मूठ आक्रोड खा. 
१०. दिवसभर थोड्या थोड्या वेळाने भरपूर पाणी प्या. (दिवसातून किमान ३ लीटर) 
११. सकाळी १०-१५ मिनिटे शुद्ध हवा व सूर्याचे कोवळे ऊन घ्या. 
१२. दररोज १०-१५ मिनिटे जॉगिंग करा. 
१३. दररोज १०-१५ मिनिटे पळा. (जागच्या जागी सुद्धा चालेल)
१४. जेवणातील पदार्थात भरपूर विविधता असू द्या,(म्हणजे प्रमाण जास्त नको तर जास्त पौष्टिक असावे)
१५. शांत चित्ताने हळूहळू संथपणे नीट चाऊन खा. (वाघ मागे लागल्यासारखे भराभरा न चावता नुसते गिळू नका) 
१६. दोन जेवणाचे मध्ये छोटा उपहार घ्या. 
१७. जीवनात नेहमी आनंद व हास्य असू द्या. 
१८. सकाळची न्याहरी घेणे कधीच चुकवू नका. 
१९. रात्रीची झोप किमान सात तास घ्या.
२०. रात्रीची झोपण्याची वेळ काटेकोरपणे पाळा. (शक्यतो रात्री १० वाजता झोपावे) 
२१. आहारात तंतुमय (Fibber) पदार्थांचा वापर वाढवा. 
२२. जेवणात रसरशीत नैसर्गिक रंग असलेले अन्न-पदार्थ असू द्या. 
२३. योगासन वर्ग लावा व योगासने करा. किमान बारा सूर्य नमस्कार घाला. 
२४. प्रेम व आनंद देणार्याै व्यक्ति सदैव तुमच्या सभोवताली असतील याची दक्षता ज्ञा. 
२५. लक्षात ठेवा आरोग्याला चांगले असणारे पदार्थ जिभेला आवडतीलच असे नव्हे. 
२६. दोन वेळा ‘ग्रीन’ चहा प्या. 
२७. घाम येईल इतका व्यायाम करा. 
२८. आर्थिक तणाव टाळण्यासाठी किमान एक वर्षाच्या खर्चाला पुरेल एव्हढी रक्कम सेव्हिंग करा. 
२९. शक्य तेव्हढा सेक्सचा आनंद घ्या. (आठवड्यातून किमान दोनदा) 
३०. आठवड्यातून दोनदा तरी ३० मिनिटे पुलअप – पुशअप व्यायाम करा. 
३१. जेवणापुर्वी अर्धा तास अर्धी मूठ शेंगदाणे खा. 
३२. वर्षातून एकदा ट्रेडमिल टेस्ट करून घ्या. 
३३. एक घास बत्तीस वेळा चाऊन खा. 
३४. ‘ड’ जीवनसत्वयुक्त पूरक आहार (supplementary) घ्या. 
३५. जेवणात दोन चमचे गाईचे तूप वापरा. 
३६. म्हशीच्या दुधात जास्त स्निग्धांश असलेल्या दूचे ऐवजी गाईचे कमी स्निग्धांश असलेले दूध वापरा. 
३७. सकाळच्या न्याहरीत भाजणीचे थालीपीठ,सांजा,पोहे,भाज्याचे पराठे असे सकस व पौष्टिक पदार्थ असावेत. 
३८. जेवणासोबत कृत्रिम थंड पेये घेणे टाळा.(कोका कोळा,थम्सअप,लीम्का इत्यादी.) 
३९. जेवणापूर्वी हात-पाय साबणाने स्वच्छ धुवा व निर्जंतुक करा. 
४०. नेहमी गर्म व ताजे जेवण घेत जा. 
४१. रोज थोडा आल्याचा छोटा तुकडा खा. 
४२. रोज एक-दोन लसणाच्या कच्च्या पाकळ्या खा. 
४३. साखरेचा वापर अतिशय कमी करा. 
४४. पदार्थ बनवताना तेलाचा वापर शक्य तितका कमी करा. वरुन कच्चे तेल घेऊ नका. तळणीसाठी एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरू नका 
४५. एकाच प्रकारचे तेल न वापरता करडई,शेंगदाणा,सनफ्लॉवर,सोयाबीन,पाम,राईसब्रान,मोहरी,ऑलीव्ह अशी मिश्र तेल एकत्र करून वाळरल्यास प्रत्येकातील काही चांगले गुणधर्म मिळून येतील. 
४६. भातासाठी हातसडीचा किंवा बिनसडलेला तांदूळ वापारा. 
४७. गिरणीतून गहू दळून आणताना त्यात सोयाबीन घाला. (एक किलोला १०० ग्राम) 
४८. सकाळी दोन खजुर,राजगिरा लाडू / रोल ,मोरावळा खावा. 
४९. आहारात नाचणीचा समावेश करा. 
५०. शक्य तितके मिठाचे प्रमाण कमी करा. भाजी,आमटी,पदार्थ अळणी वाटल्यास वरून मीठ घालून घेऊ नका. 
५१. जास्त खाणे टाळा . (लक्षात ठेवा “अति खाणे अन् मसणांत जाणे”) 
५२. झोपण्यापूर्वी किमान ३ तास आधी काहीही खाऊ नये / जेवू नये. 
५३. जेवणानंतर शतपावली घाला . (शंभर पावले चाला)
५४. जेवणानंतर लगेच झोपू नका. 
५५. आठवड्यातून एक वेळ उपवास करा. 
५६. दिवसातून १० मिनिटे मौनव्रत पाळा. 
५७. आठवड्यातून किमान एकदा मैदानी खेळ खेळा. 
५८. दिवसातून एकदा अर्धा तास चांगल्या पुस्तकांचे वाचन करा. 
५९. सकाळी आंघोळीनंतर दहा मिनिटे प्रार्थना करा. 
६०. सकाळी आंघोळीनंतर दहा मिनिटे “ध्यान” (Meditation) करा. 
६१. इतरांबरोबर स्वत:ची तुलना कधीही करू नका. 
६२. तुमच्या आवडीचेच काम करा. 
६३. नावडते काम / नोकरी ताबडतोब सोडा. 
६४. सदैव तुमच्या कुटुंबियांच्या संपर्कात / सान्निद्ध्यांत रहा. 
६५. मित्रांच्या सान्निद्ध्यांत रहा. 
६६. रोज एका तरी व्यक्तीच्या हिताचे / भल्याचे कृत्य करा. 
६७. रोज एका तरी व्यक्तिला माफ करत जा. 
६८. जेंव्हा दामल्यासारखे वाटेल तेंव्हा थोडी विश्रांति घ्या / आराम करा. 
६९. मुक्तपणे जोरात हसा. 
७०. धूम्रपान वर्ज्य करा. 
७१. मद्यपान वर्ज्य करा. 
७२. गुटखा / तंबाखू आदी व्यसनांपासून दूर रहा. 
७३. पत्त्यांचा जुगार,मटका,रेस,वेश्यागमन अशा मार्गांपासून दूर रहा. एकपत्नीव्रत आचरा. 
७४. आठवड्यातून काही वेळ निसर्गाच्या सान्निद्ध्यांत घालवा. 
७५. सकाळी दंव पडलेल असतांना हिरवळीवरून अनवाणी चाला. 
७६. जरूर असेल तेंव्हा मदत मागा. 
७७. सकारात्मक विचार करा.
७८. नकारात्मक विचार प्रयत्नपूर्वक मनातून काढून टाका. 
७९. दुपारी १०-१५ मिनीटांची डुलकी घ्या. 
८०. लिफ्ट किंवा एस्कॅलेटर यांचा वापर न करता जिन्यांचा वापर करा. 
८१. दूध,अंडी,मासे,चीज,हिरव्या पालेभाज्या अशा कॅलशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. 
८२. हिरव्या पालेभाज्या , सॅलड ,कोशिंबीरी (यात मोड आलेली कच्ची कडधान्ये असावीत) भरपूर प्रमाणात खा. 
८३. मोड आलेली कडधान्यांच्याउसळी करून खा. 
८४. मधून मधून डोळे व चेहरा गार पाण्याने धुवा. 
८५. वर्षातून एकदा ट्रीपला जाऊन येत जा. 
८६. आरामदायी पादत्राणे वापरा. 
८७. मुक्तपणे व आनंदाने नाचा. 
८८. मुक्तपणे व आनंदाने गा. 
८९. तडस लागेल इतके न जेवता पोटात जेव्हढी जागा (भूक) असेल त्याच्या फक्त ८०% खा. (लक्षात ठेवा “दोन घास भुकी तो सुखी”) 
९०. एखाद्या जवळच्या जुन्या मित्राशी / स्नेह्याशी वेळ काढून ५-१० मिनिटे फोनवर बोला. 
९१. तुमच्या दातांची योग्य निगा राखा /काळजी घ्या. सकाळी व रात्री दोन वेळा ब्रशने दांत साफ करा. 
९२. बागकामात मन रमवा. 
९३. सूती व सैल कपडे वापरा,तंग कपडे वापरणे टाळा. 
९४. नियमित पोहायला जा. 
९५. स्वत:चा आत्म विश्वास वाढवा. 
९६. जीवनाचा उद्देश व उद्दीष्ट लक्षात गेऊन जगा व जीवनातील आनंद लुटा. 
९७. नियमितपणे मोकळ्या हवेत / बागेत फिरायला जात जा. 
९८. नियमितपणे नाटक / सिनेमा / संगीताचा जलसा / व्यख्यान अशा अभिरुचीसंपन्न / मनोरंजन कार्यक्रमास अवश्य जा. 
९९. तुम्ही दमला असाल तरीही रेटून काम न करता थोडा वेळ काढून आराम करा / विश्रांती घ्या. 
१००. प्रकृतीच्या कारणाने कधी कधी कामास नकार द्यायला शिका. 
१०१. तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मधाचा योग्य वापर कारा. 
१०२. एडस् सारख्या भयानक व्याधींपासून दोन हात दूर रहाण्यासाठी तुमच्या काम जीवनातील जोडीदाराबरोबर एकनिष्ठ रहा. 
१०३. आरोग्यासाठी स्वयंचलित वाहनाऐवजी सायकलचा वापर करा. 
१०४. तुमच्या भावनिक समस्या इतरांजवळ व्यक्त करू नका. 
१०५. नकारात्मक व्यक्तींना टाळा / तुमच्यापासुन दोन हात दूरच ठेवा . 
१०६. एखाद्या समाजहिताच्या कार्यात स्वयंसेवक म्हणून काम करा. 
१०७. नियमित रक्तदान करा. 
१०८. समाजाचे ऋण मान्य करून परतफेड म्हणून सेवाभावी संस्थांना यथाशक्ती मदत करा. 
१०९. साधी रहाणी व उच्च विचारसारणी ठेवा. 
११०. एक नवी परोपकार वही चालू करून त्यांत रोज केलेल्या एका तरी परोपकाराची नोंद करत जा. 
१११. पैशांची व अन्नाची उधळपट्टी करू नका. 
११२. लोणची,फरसाण असे खारवलेले पदार्थ जास्त खाऊ नका. त्यांत मोनोसाच्युरेटेड फॅटस् असतात जी आरोग्याला घातक असतात. 
११३. भजी,वडे,कुरर्डया,पापड,पापड्या असे तेलकट पदार्थ जे आरोग्याला अपायकारक आहेत,कमी प्रमाणात खा. 
११४. मैदा, मैद्याचे आणि बेकरीचे बिस्किटे,केक असे पदार्थ कमी प्रमाणात खा. 
११५. बाजारान्त मिळणारे जंक व फास्ट फूड खाणे टाळा. 
११६. श्रीखंड,बासुंदी,गुलाबजाम ,लाडू असे मिठाईचे गोड पदार्थ मोजकेच खा व मनावर संयम ठेवा. 
११७. अतिरिक्त चहा,कॉफी,एरिएटेड थंड पेये न पिता रवी खालचे ताजे अदमुरे गोडसर ताक,लिंबू सरबत,सोलकढी,कोकम,ताज्या फळांचे रस प्या. 
११८. शिळे,नासलेले ,आंबलेले अन्न व उतरलेली फळे खाऊ नका. 
११९. बाजारात अस्वच्छ जागी उघड्यावर बनवलेले पदार्थ खाऊ नका. 
१२०. शेवग्याच्या शेंगा, कारली,कुळीथ,हादग्याचीफुले,अळू,पुदिना,कढीपत्ता,मेथी,मुळा, पालक,कांदापात, लसूणपात,गवार,सुरण,लिंबू,कोथिंबीर,,आले ह्या व अशा अनेक हर्बल भाज्यांचा त्यांचे गुणधर्म लक्षांत घेऊन जेवणात जाणीवपूर्वक वापर करावा. 
१२१. ऋतुमानानुसार आहारात योग्य बदल करत जावा. 
१२२. शक्यतो शाकाहारच घ्यावा. मांसाहार वर्ज्य करावा. 
१२३. जिभेला कायम लगाम घालून ताब्यात ठेवावे, तिचे जास्त चोचले पुरवत बसू नये. (लक्षात असू द्या की जीभ ज्याची आग्रहाने मागणी करते ते नेहमीच आरोग्यास अपायकारक असते)
१२४. प्रकृतीस न झेपणारे उपास करू नयेत त्यांनी अपायच होतो. 
१२५. उपासाचे दिवशी उपासाचे म्हणून आपण जे खातो ते नेहमीच पित्त वाढवणारे व प्रकृतीस अपायकारक असतात. 
१२६. व्रत-वैकल्ये,उपास-तापास प्रमाणाबाहेर व प्रकृतीस न झेपतील असे करू नयेत. 
१२७. जेवणाच्या वेळा कटाक्षपूर्वक पाळाव्यात. ( नाहीतर अॅरसिडीटीचा त्रास होतो) 
१२८. आपल्याला ज्याची अॅकलर्जी आहे ते लक्षांत घेऊन असे पदार्थ आहारात टाळावेत. 
१२९. नियमितपणे व वक्तशीर राहून डॉक्टरांच्या सल्ल्याने शारीरिक तपासण्या करून घेत जा. 
१३०. तुमच्या व्याधींवर डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे / गोळ्या वेळचे वेळी न चुकता घेत जा व पथ्य पाळा. 
१३१. तुम्ही स्वत:च घरच्या घरी मनाने किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणतीही औषधे घेऊ नका. 
१३२. मुदतबाह्य झालेली औषधे घेऊ नका. 
१३३. टि.व्ही. समोर बसून जेवण घेणे बंद करा. कुटुंबियांसमवेत एका टेबलावर सर्व मिळून हास्य-विनोद करत जेवण घ्या. 
१३४. संगणकावर काम करत असणारांनी लाकडी (पूर्वी सरकारी कार्यालयात होत्या तशी) खुर्ची वापरावी खुर्चीवर ताठ बसावे,संगणकाच्या पडद्या पासून किमान १८” अंतर ठेवावे व दर तासाने तोंडावर थंड पाण्याचा मारा करून व डोळे धुवून घ्यावेत व थोडे चालून यावे. 
१३५. भ्रमणध्वनीचा (मोबाईलचा) अतिरिक्त वापर व वाहन चालवतांना वापर कटाक्षाने टाळावा. (अॅडडिक्ट होऊ नका)
१३६. पंखे,ए.सी. यांचा अनावश्यक वापर टाळावा. 
१३७. शक्यतो थंड पाण्याने आंघोळ करणे उत्तम. 
१३८. लवकर निजा व लवकर उठा. जागरणे करणे टाळा. 
१३९. तेलकट,चमचमीत,मसालेदार,अत्यंत जहाल तिखट ,जास्त गोड अशा पदार्थांचे सेवन करू नये. 
१४०. तुमच्याशारीरिक व्याधी लक्षात ठेऊन त्यानुसार पाथ्य-पाणी, औषधे याबाबत दक्षता घ्या.

Wednesday, January 11, 2017

होणार्‍या केस गळतीवर घरगुती उपाय

Englishहिंदीதமிழ்

Home

केसगळती होतेय ? हे ' 7' घरगुती उपाय नक्की करुन पहा

By Dipali Nevarekar on Fri, February 27, 2015 2:52pm

स्त्रीचे खरं सौंदर्य तीच्या केसांमध्ये असते , मग केसगळती रोखा या काही घरगुती उपायांनी !

   

काही जण प्रदूषणामुळे , कोंड्यामुळे तर काही तणावपूर्ण जीवनशैलीमुळे केसगळतीच्या समस्येशी झगडत असतात. तज्ञांच्या मते ,काही प्रमाणात होणारी केसगळती ठीक आहे मात्र जेव्हा ती दिवसाला ५०-१००केसांच्या वर जाते तेव्हा मात्र धोक्याची घंटा आहे, अशावेळी हे काही घरगुती उपाय करून तर पहा

१) कांद्याचा रस

कांद्यातील सल्फर केसांच्या वाढीसाठी मदत करते. कांद्याचा रस टाळूवर लावल्याने केसगळतीवर नियंत्रण मिळवता येते.

कसे कराल ?

- एक कांदा बारीक कापून त्याचा रस काढा
- रस टाळूवर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा
- सौम्य शाम्पूने केस धुवा व ते वाऱ्यावर सुकू द्या
- आठवड्यातून दोनदा हा उपचार करून पहा

२) लसुण

कांद्याप्रमाणेच लसूण मध्येही 'सल्फर'चे घटक असतात म्हणूनच पारंपारिक केस वाढीच्या औषधांमध्ये याचा वापर केल्याचे प्रामुख्याने आढळून येते .

कसे कराल ?

- लसणाच्या काही पाकळ्या ठेचून घ्या
- त्यात खोबऱ्याचे तेल घालून मिश्रण गरम करून घ्या
- मिश्रण थोडे थंड झाल्यावर केसांच्या मुळांशी लावा
- ३० मिनिटे तेल लावून ठेवा त्यानंतर केस धुऊन टाका
- असे आठवड्यातून दोनदा करा.

३) नारळ

केसांच्या वाढीसाठी तसेच त्याच्या देखभालीसाठी नारळ अतिशय उपयुक्त आहे. नाराळातील उपयुक्त मेद ,प्रोटिन्स व मिनरल्स केसांचे तुटण्याचे प्रमाण कमी करते. केस गळती रोखण्यासाठी नारळाचे दुध वा तेल अतिशय उपयुक्त ठरते.

कसे कराल ?

- नाराळाचे तेल गरम करून घ्या व केसाच्या मूळापासून टोकापर्यंत लावा
- तासाभराने केस धुऊन टाका
- किंवा खोबरं किसून त्याचे दुध काढून ते टाळूवर केस गळतीच्या जागेवर लावा
- रात्रभर ते राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुऊन टाका.

४) हीना

केसांना नैसर्गिक रंग देण्याच्या प्रक्रियेत ' हीना ' प्रामुख्याने वापरला जातो मात्र मूळापासून केस घट्ट करण्याची क्षमतासुद्धा हीनात आहे.

कसे कराल ?

- २५० ग्रॅम राईच्या तेलात ६० ग्रॅम धूतलेली हिनाची पाने घाला.
- हे मिश्रण उकळून नंतर गाळून घ्या.
- आवश्यक तेवढ्या तेलाने टाळूवर मसाज करा व उर्वरित हवाबंद डब्यात ठेवा
- सुकी हिना पावडर दह्यात मिसळून तासभर केसांना लावून ठेवा तासाभराने केस धुऊ न टाका

अन्य  घरगुती हीना पॅक्स बनवण्यासाठी - (हीना’ – केसगळती दुर करणारा रामबाण घरगुती उपाय) नक्की पहा.

५) जास्वंद

जास्वंद केसांना पोषण देतात,केसगळती टाळतात तसेच केस अकाली पांढरे होण्यापासून बचावतात.

कसे कराल ?

- काही जास्वंदाची फुले कुटून तीळ अथवा खोबऱ्याच्या तेलात घालून मिश्रण एकत्र करा.
- हे मिश्रण काही तासांसाठी केसांना लावून ठेवा
- थंड पाणी व सौम्य शाम्पूने केस धुवा .

केसगळती रोखण्यासाठी तुम्ही घरच्या घरीचदेखील बनवू शकता हे  जास्वंदाचे हेअर पॅक्स

६) आवळा

केस गळतीने त्रस्त असलेल्यांसाठी 'आवळा' नक्कीच फायदेशीर ठरतो , त्यातील व्हिटामिन सी व एन्टीऑक्सिडन्ट गुण सुरवातीच्या टप्प्यातील केसगळती थांबवते.

कसे कराल ?

- आवळ्याचा अर्क अथवा पावडर लिंबाच्या रसात एकत्र करा
- हे मिश्रण केसांना लावून सुकू द्या
- केस कोमट पाण्याने धुऊन टाका

७) अंड

अंड्यातील अनेक घटक केस गळतीवर किफायतशीर आहेत. त्यातील सल्फर, फॉसफरस , आयोडीन, झिंक घटक केसांच्या वाढीस मदत करतात.

कसे कराल ?

- एका अंड्यातील पांढरा भाग एक टीस्पून ऑलिव तेलात मिक्स करा हे मिश्रण फेटून केसांना लावून ठेवा.
- १५ ते २० मिनिटांनंतर थंड पाणी व सौम्य शाम्पूने केस धुवा .

 संबंधित दुवे -

     केसांचे सौंदर्य वाढवा

पित्ताशयातील खडे


पित्ताशयातील खडे

पित्ताशयातील खडय़ांचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे. काय आहेत त्यावरच्या उपाययोजना?

डॉ. अविनाश सुपे |Updated: September 4, 2015 2:07 pm

बदलत्या जीवनशैलीमुळे आपले जीवनमान बदलले आहे. त्याच्या अनेक परिणामांपैकी एक म्हणजे पित्ताशयातील खडय़ांचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे. काय आहेत त्यावरच्या उपाययोजना?

हल्ली बऱ्याचदा असे रुग्ण येतात की ज्यांनी इतर कोणत्या तरी कारणांसाठी पोटाची सोनोग्राफी केली असताना त्यांच्या पित्ताशयामध्ये खडे आहेत असे निदान केले गेलेले असते. म्हणूनच आपण हे खडे का व कसे तयार होतात, त्यामुळे काय त्रास होऊ शकतो, हे टाळता येणे शक्य आहे का व त्यावर काय उपाय उपलब्ध आहेत हे समजावून घेऊ या.

पित्ताशयात खडे का होतात?

आपल्या शरीरात पित्तरसाची निर्मिती ही यकृतामध्ये (लिव्हरमध्ये) होत असते. यकृताच्या खालच्या बाजूला पित्ताशय (Gall bladder) नामक एक छोटीशी फुग्याच्या आकाराची पिशवी असते, जिचे काम असते जास्त तयार झालेले पित्त साठवून ठेवणे व प्रत्येक जेवणाच्या वेळी ते पित्तनलिकेवाटे लहान आतडय़ात सोडणे. खाल्लेल्या अन्नाच्या पचनासाठी याची गरज असते. हे पित्त जेवणानंतर ठरावीक प्रमाणामध्ये पचनक्रियेसाठी हा पित्तरस लहान आतडय़ात सोडला जातो. आहारात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण (Oily food) जास्त झालं किंवा तंतुमय पदार्थाचं (fibre) प्रमाण कमी झालं तर पित्तरसाची घनता वाढते व पित्ताशयात छोटे छोटे खडे तयार होतात. हे खडे तीन प्रकारचे असतात

१. कोलेस्टेरोल (Cholesterol)

२. पिगमेंट pigment (बिलिरुबीनचे घटक)

३. मिश्र.

७०-८० टक्केरुग्णांमध्ये ते मिश्र असतात. अगदी लहान खडे पित्तनलिकेवाटे पित्तरसाबरोबर लहान आतडय़ात निघून जातात. पण त्यांचा आकार मोठा असेल तर ते पित्ताशयाच्या व पित्तनलिकेच्या अरुंद ठिकाणी अडकून राहतात व पित्ताशयाला सूज येऊन जंतूचा प्रादुर्भाव होतो.

हा त्रास कुणाला होऊ शकतो?

वैद्यकशास्त्रामध्ये पित्ताशयातील खडे हे फॅट, फर्टाइल, फीमेल ऑफ फोर्टी म्हणजे स्थूल देहाच्या चाळिशीतील महिलांमध्ये जास्त प्रमाणात असे शिकवले जाते. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण सहापटींनी जास्त असते. पाश्चात्त्य देशात व उत्तर भारतामध्ये याचे प्रमाण जास्त आहे. त्यांचा आहार, स्थूल शरीर, जाडेपणा, अतिस्थूलपणा, अति तूपकट, तेलकट खाणे, आहारात तंतुमय पदार्थ न घेणे, बैठी कामे करणे, व्यायामाचा अभाव, वरचेवर फास्ट फूड किंवा जंक फूड असणे, या सर्व गोष्टींमुळे पित्ताशयात खडे तयार होऊ शकतात. त्यामुळे गेल्या दोन-तीन दशकांत भारतातही याचे प्रमाण वाढत आहे. हल्ली हे खडे सर्व वयाच्या स्त्री-पुरुषांमध्ये आढळतात.

हा त्रास कसा ओळखावा?

सुरुवातीची लक्षणे अ‍ॅसिडिटीच्या त्रासासारखीच असतात. सुरुवातीला पोटाच्या वरच्या भागात थोडेसे उजवीकडे दुखायला लागते. गॅसेस होतात. मळमळ सुटते, जळजळ होऊ लागते, त्याबरोबरच एखादा खडा पित्तनलिकेत अडकून राहिला तर पित्तरस आतडय़ात नेणारा मार्ग अरुंद होतो व पित्तरस यकृत (लिव्हर)मध्ये साचू लागतो त्यातील बिलिरुबीन हे रंगद्रव्य रक्तात मिसळतात व काविळीची लक्षणे दिसू लागतात. याला अवरोधक कावीळ (Obstructive Jaundice) असे म्हणतात. पित्तखडय़ांमुळे होणाऱ्या काविळीबरोबर अंगाला खाज सुटते. पित्ताशयातील खडय़ांमुळे स्वादुपिंडदाहही होऊ शकतो.

पित्ताशयातील खडय़ाचे निदान

सोनोग्राफी, काही विशिष्ट रक्ततपासणी व एण्डोस्कोपी करून पित्ताशयातील दोष, अडकलेले खडे, पित्तनलिकेचा आजार इत्यादी गोष्टींविषयी पूर्ण माहिती मिळू शकते.

उपाय

एखाद्यास पित्ताशयाच्या खडय़ामुळे त्रास होत असेल आणि कावीळ नसेल तर शस्त्रक्रिया करून हे पित्ताशय काढून टाकता येते, ही शस्त्रक्रिया पोटाची चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपी (Laparoscopy) केली जाते. ती तज्ज्ञ, अनुभवी सर्जनकडून करणे. त्यामुळे रुग्ण दुसऱ्या दिवशी घरी जाऊ शकतो. दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेमुळे फारशी गुंतागुंत निर्माण होत नाही व पोटावर टाके, जखमेत व्रण राहत नाही. ही शस्त्रक्रिया सोपी, सुलभ असते. यामध्ये खराब झालेले पित्ताशय व खडे काढून टाकतात. यानंतर त्या व्यक्तीला त्रास होत नाही. कारण पचनास लागणारा पित्तरस सरळ लहान आतडय़ात नियमित प्रमाणात येत राहतो.

जर एखाद्यास पित्ताशयाच्या खडय़ामुळे कावीळ असेल तर दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपी किंवा ERCP करून, पित्तनलिकेतील खडे काढले जातात, दुर्बिणीद्वारे एक छोटेसे छेद करून पित्तनलिकेतील खडे काढता येतात व एक प्लास्टिकची नळी (stent) पित्तनलिकेत टाकून कावीळ कमी होते. पुन्हा होऊ नये म्हणून दुर्बिणीद्वारे पित्ताशय काढणे उचित ठरते. काही रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज लागते ज्यामध्ये पित्तनलिका ही लहान आतडय़ास जोडली जाते.

टाळण्यासाठी काय करावे?

१) जेवणातील तेल-तुपाचे प्रमाण (स्वयंपाकातील) योग्य प्रमाणात असावे म्हणजे फोडणीसाठी माफक तेल, भातावर थोडे साजूक तूप (हे लोणी काढून घरी बनवलेले तूपच असावे) इतके चालेल. पनीर, खोबरे व शेंगदाण्याचाही वापर माफक प्रमाणात करावा.

२) तळलेले पदार्थ, फास्ट फूड वरचेवर खाऊ नये.

३) जेवणात रोज कोशिंबीर वा सॅलड घ्यावे.

४) चिकू, सफरचंद, पपई, संत्री, मोसंबी, केळे अशी फळे खावीत.

५) रोज नियमित व्यायाम करावा. रोज एक तास चालायला जावे.

खडे विरघळण्यासाठी औषधे ?

पित्ताशयातील खडे विरघळण्याची काही औषधे उपलब्ध आहेत खरी, पण ती बरीच वर्षे घ्यायला लागतात. बरीच खर्चीक असतात व खडे विरघळण्याचे प्रमाण अनिश्चित असते. दुसरा धोका म्हणजे या अवधीत एखादा खडा अडकून काही दुष्परिणाम होणार नाहीत, असे सांगता येत नाही.

त्रास न होणारे खडे (Silent or asymptomatic stones)

पित्ताशयातील खडे असणाऱ्या ७०-८० टक्के रुग्णांना त्याचा काही त्रास होत नाही. त्यातले काही सोनोग्राफीमध्ये दिसतात. अशा खडय़ांना सायलेंट खडे म्हणतात. जर खडय़ांचा काही त्रास नसेल, ते लहान असतील व पित्ताशय जाड झाले नसेल तर असे खडे काढणे आवश्यक नसते. केवळ सोनोग्राफीमध्ये खडे आहेत म्हणून ते काढावेत हे गरजेचे नाही. त्यावर फक्त लक्ष ठेवावे व डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करावे. सोनोग्राफीच्या रिपोर्टने घाबरून न जाता जर खडय़ामुळे त्रास होत असेल तरच त्यावर शस्त्रक्रियेची गरज असते.

डॉ. अविनाश सुपे – response.lokprabha@expressindia.com

First Published on: September 4, 2015 1:21 am

Tags: gall bladderkashasathi-potasathi,

Copyright © 2017 The Indian Express [P] Ltd. All Rights Reserved

Powered by WordPress.com VIP