Saturday, June 25, 2016

Earn from Youtube

यु ट्यूबद्वारे ती कमवते प्रतिमहिना 10 ते 35 लाख,
तुम्हीही कमवू शकतात कोट्यवधी रुपये
------------------------------------------
www.smallideaBIGMONEY.com

नवी दिल्ली- आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. ही स्पर्धा पैसा, धन-संपत्ती व सुखसाधने मिळविण्यासाठीच चालली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संगणक व इंटरनेट हे अत्यंत प्रभावी साधन ठरले आहे. सोशल मीडिया हा त्याचाच एक भाग आहे. आम आदमीपासून सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसा कमावण्याचा फंडा शोधून काढला आहे.

तुम्हाला माहीत आहे का? Youtubeच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमवता येतात. आम्ही आपल्याला अशाच काही लोकांची माहिती घेऊन आलो आहे. Youtubeमधून त्यांनी कोट्यवधी रुपये कमवले आहेत. बिझनेससोबत कॉमेडी, फॅशन, फूडसारख्या क्षेत्रातून या मंडळींनी पैसा कमवला आहे.

तुम्ही देखील या मंडळींच्या टीप्स फॉलो केल्या तर अल्पावधीत कोट्यधीश होऊ शकतात.
------------------------------------------
Youtube स्टार आहे श्रुती आनंद...
(https://www.facebook.com/shrutiarjunanand)

- 30 वर्षीय श्रुती आनंदला Youtube वर 'मेकअप क्वीन' नावाने ओळखले जाते.
- Youtubeवर श्रुती आनंदचे 6 कोटी व्ह्यूअर्स आहे.
- मेकअप टिप्सचे 3 लाखांहून जास्त सब्सक्रायबर्स आहेत.
- Youtubeच्या माध्यमातून महिन्याकाठी ती 10 ते 35 लाख रुपये कमवते.

असा सापडला श्रृतीचा पैसा कमवण्याचा फंडा..

श्रृतीला ऑफिसातून घरी पोहोचायला 90 मिनिटे लागायचे. प्रवासादरम्यान ती Youtubeवर नेहमी 'How to' व्हिडिओ सर्च करून पाहात असे. श्रृतीने असे करता करता ब्यूटी व मेकअपशी संबंधीत व्हिडिओ बनवून Youtubeवर अपलोड करायची.

2011मध्ये तिने पहिला प्रोफेशनल व्हिडिओ शूट करून तो Youtubeवर अपलोड केला. हळू हळू ती प्रत्येक आठवड्याला एक व्हिडिओ अपलोड करू लागली. परिणामी तिचे व्हिडिओ लोकप्रिय झाले. पतीच्या मदतीने श्रृतीने Youtubeवर चॅनल (https://www.youtube.com/user/shrutiarjunanand) तयार केले. पाच लोकांची टीम आज हे चॅनल हँडल करते. श्रृती सोमवार व शुक्रवारी एक नवा व्हिडिओ Youtubeवर अपलोड करते.
------------------------------------------

कॉमेडियन तन्मय असा झाला कोट्यधीश...

- मुंबईचा तन्मय भट्ट (https://www.facebook.com/tanmaycomedy) हा सुरुवातीला वीरदास यांच्या कॉमेडी टीममध्ये स्टॅंड-अप कॉमेडियन म्हणून काम करत होता.
- त्याला सनी लियोनीच्या 'रागिनी एमएमएस-2'मध्ये छोटाशी भूमिका केली होती.
- 2014मध्ये गुरसिमरन खांबासोबत त्याने Youtubeवर AIB (https://www.youtube.com/user/allindiabakchod) ची सुरुवात केली.
- रोहन जोशी व आशीष साख्या या दोघांचीही त्याला साध लाभली.
- तन्मय AIBवर आलियासह स्पूफ, कल्किसोबत मेकिंग हेडलाइन असलेले व्हिडिओ जबरदस्त हिट झाले.
- Youtubeवर अल्पवधीत तन्मय भट्टची कॉमेटी ट्रेन वेगात धावली.
- तन्मयचा AIB शोचे Youtubeवर 14 कोटी पेक्षा जास्त व्ह्यूज आहेत.
- दुसरीकडे, Youtubeवर त्याचे 15 लाखांहून जास्त सब्सक्रायबर्स आहेत.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, तन्मयने Youtubeवरुन आतापर्यंत 14 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
- 2015मध्ये 'फोर्ब्स'ने सर्वात श्रीमंत सेलेब्रिटीजच्या लिस्टमध्ये तन्मयला स्थान दिले होते.
------------------------------------------

Youtubeमधून कमवा कोट्यवधी रुपये..

- तुमचे गूगल अकाउंट अर्थात Gmail असेलच.
- Gmail अकाउंट असलेल्या यूजर्सला स्वतंत्र Youtube अकाउंट बनवण्याची आवश्यकता नसते.
- तुम्ही Gmail अकाउंटवरूनच Youtube एक्सेस करू शकतात.
- व्हिडिओ अपलोड करण्‍यासाठी Youtube चॅनल क्रिएट करावे लागते.
- चॅनल अर्थात Youtubeवरचे तुमचे अकाउंट असते. यात व्हिडिओ अपलोड, व्हयूज आदी माहिती असते.
- Youtubeवरील माय चॅनल फीचरवरून तुम्ही स्वत:चे चॅनल क्रिएट करू शकतात.
- यात व्हिडिओ, स्लाइड शोच्या रुपात व्हिडिओ अपलोड करू शकतात.
- इतकेच नव्हे तर तुम्ही Youtube चॅनल सजवू शकतात. सेटिंग्जमध्ये या संदर्भात अनेक ऑप्शन असतात.
----------------------------------------

--- Youtube चॅनल बनवल्यानंतर पैसा कसा मिळतो, हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

- यासाठी तुम्हाला गूगल अॅडसेंस अकाउंट बनवावे लागते.
- अॅडसेंस गूगल हे जाहिरात डाटा व ऑफिशियल टूल आहे.
- येथे तुमच्या Youtube चॅनलला किती लोकांनी भेट दिली. तसेच जाहिरातीवर किती क्लिक मिळाल्या याबाबत माहिती मिळते.
- प्रत्येक जाहिरातीच्या क्लिकवर किती रुपये मिळाले, याची देखील माहिती मिळते.
- अॅडसेंस अकाउंट क्रिएट करण्यासोबत तुम्हाला Youtubeच्या मोनेटाइजेशन फीचरला इनेबल करावे लागते.
- हे फीचर Youtubeच्या चॅनल सेटिंग्जमध्ये असते.
- हे फीचर सक्रिय केल्यानंतर तुम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओजवर जाहिराती दिसू लागतात. यूजर्स या जाहिरातींवर क्लिक करतात. त्याचा पैसा तुम्हाला अॅडसेंसच्या माध्यमातून मिळतो.
- दरम्यान, मोनेटाइज फीचर इनेबल केल्यानंतर Youtube तुमच्या चॅनलची संपूर्ण चौकशी करू शकते. - सर्व माहिती पडताळून पाहिल्यानंतर तुमच्या व्हिडिओजवर जाहिराती दिसायला लागतात.
------------------------------------------

10 डॉलर जमा होताच तुम्हाला पैसे मिळणे सुरु होतात...

तुमच्या यूट्यूब चॅनलवर जाहिराती येण्यास सुरुवात होते. व्हिडिओ दिसू लागतात. तेव्हापासून तुम्हाला मोबदला मिळू लागतो. तुम्ही 10 डॉलर जमा झाल्यानंतर मोबदला मिळण्याचा पर्याय निवडू शकतात. जास्तीत जास्त मोबदला मिळवण्यासाठी तुम्हाला नेहमी चॅनल अपटेट करावे लागते.
नवे युजर्स यावे यासाठी Youtube चॅनलवर नेहमी व्हिडिओ अपलोड करावे लागता. चॅनलची लोकप्रियता कशी वाढवता येईल. याचे नियोजन करावे लागते. प्रत्येक व्हिडिओमध्ये यूनिकनेस असायला हवा. यूजर्सला जास्त वेळ कसे इंगेज ठेवता येईल, यासाठी प्रयत्न करावे लागतात. यूजर्सनी तुमचा व्हिडिओ जितका जास्त पाहिला तितकी तुमची कमाई जास्त होईल.
------------------------------------------

Youtube वर हिट आहे कनन गिल
(https://www.facebook.com/GillKanan)

तुम्ही Youtube कनन गिल (https://www.youtube.com/user/knngill) नाव टाइप कराल तर तुमच्यासमोर त्याचे अनेक व्हिडिओ उघडतील. त्यात कॉमेडीपासून फिल्म रिव्ह्यूचा समावेश आहे. कनन हा इं‍जिनिअर आहे. मात्र, त्याचा कॉमेडीचा छंद आहे. 2014 मध्ये त्याला कॉमेडी सेंट्ल चॅनलवरील कॉमेडी शो 'द लिव्हिंग रूम'मध्ये काम करण्‍याची संधी मिळाली होती. यानंतर त्याने Youtubeवर फिल्म रिव्ह्यूचे काम सुरु केले. अवघ्या 26 वर्षाच्या वयात कननचे Youtubeवर जवळपास तीन कोटी व्यूअर्स आहेत. प्रत्येक महिन्याला तो 4 ते 20 लाख रुपये कमवते.
------------------------------------------

सौजन्य : दैनिक दिव्य मराठी