Friday, November 20, 2015

want to manage your cholesterol ??

Eat garlic. Garlic is an excellent substance to add to your diet to keep your cholesterol levels at a reasonable number. It can reduce cholesterol levels without causing any side effects, in addition to preventing blood clots, reducing blood pressure, and protecting against infections.[1] Although it is best to take it in raw form, it is equally efficacious in other forms like pickles.

Walnuts, almonds, and other nuts are good

Go fish. Eating fatty fish like salmon, mackerel, and herring is ultra heart-healthy to due their high levels of omega-3 fatty acids. Those guys can lower your blood pressure and prevent your blood from clotting. If you've already had a heart attack, they can even reduce the risk of sudden death.

Load up on fiber. Not only are fruits, vegetables, and whole grains great for your waistline, but they're wonderfully full of heart-healthy antioxidants and cholesterol-lowering dietary fiber. 

It's practically a super-food, oatmeal is. And when it comes to cholesterol, it's full of the soluble fiber that lowers your LDL cholesterol. Aim for 5 to 10 grams (or more!) of fiber a day to reap the cholesterol-lowering effects. 
If you're curious, 1 1/2 cups of cooked oatmeal ranks in at 6 grams of fiber. Not an oatmeal fan? Kidney beans, apples, pears, and prunes are also high-fiber foods.

Use healthy vegetable oils.

Munch on raw fruits and veggies. Raw vegetables are always a better source of fiber and antioxidants than cooked ones. When they're raw, they maintain all their vitamins and nutrients -- all the stuff that's good for you. The good stuff gets cooked away when heated.



Keep fit. Include as much exercise as your physical condition allows. Physical activity increases the body’s flexibility and helps pump the blood through your arteries. And of course, follow your doctor's advice too.

  • Choose a form of exercise you can do for 10-20 minutes at a time, with at least moderate intensity, such as walking, biking, swimming, jogging, or using an exercise machine at low speed.[5]

    • First, exercise stimulates enzymes that help move LDL from the blood (and blood-vessel walls) to the liver. From there, the cholesterol is converted into bile (for digestion) or excreted. So the more you exercise, the more LDL your body expels.[6]
    • Second, exercise increases the size of the protein particles that carry cholesterol through the blood.




    हृदय

         

    हृदयविकार

         धमन्यांमध्ये अडथळे तयार होण्याची कारणं, कोलेस्टेरॉल,हृदयधमनीची दुखापत आणि रक्तातील गुठळ्या, बेताल हृदयस्पंदन, हृदयधमनीला आकुंचनाचा झटका म्हणजे हृदयधमन्यांच्या विकारामुळे होणारा हृदयविकार.

    आपलं हृदय हे छातीच्या पिंज-यात , मध्यभागी किंचित डाव्या बाजूला सरकलेलं असतं हे आता बहुतेक सर्वांना माहिती आहे. शरीरासाठी रक्त पुरवण्याचं म्हणजेच रक्त ‘पंप’ करण्याचं काम हृदय करतं. तसंच, स्वत:च्या पोषणासाठीही हृदय रक्त पंप करत असतं. प्राणवायू हे हृदयाचं अन्न आहे आणि ते रक्तातून पुरवलं जातं. जोपर्यंत पुरेसं रक्त हृदयाकडं जात असतं तोपर्यंत हृदयाचं काम सुरळीत चालू असतं. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या शुध्द रक्तवाहिन्यांना हृदयधमन्या असं म्हणतात. या हृदय धमन्यांच काम सुरळीत चालू असतं. तोपर्यंत त्यातून रक्ताचा पुरेसा पुरवठा होत राहतो आणि हृदयाचं कामही सुरळीत चालू राहतं. काही कारणानं हा रक्तपुरवठा अपुरा पडू लागला तर छाती, मान, पाठ, हात यापैकी एका किंवा अनेक ठिकाणी वेदना होऊ लागतात आणि त्याल अंजायना पेक्टोरीस (Angina Pectoris) असं म्हणतात.

    जर काही कारणानं हृदयाला होणारा रक्तपुरवठा पूर्ण बंद पडला किंवा फार मोठ्या प्रमाणात बंद पडला तर झटक्यानं हृदय बंद पडतं. त्याला हृदयविकाराचा झटका असं म्हणतात.

    तीन प्रमुख धमन्यांमधून हृदयाला रक्त पुरवल जातं. उजव्या हृदयधमनीतून हृदयाच्या उजव्या बाजूला रक्तपुरवठा होतो, तर डाव्या बाजूला रक्तपुरवठा करण्यासाठी दोन धमन्या असतात. पुढची डावी उतरती धमनी ही हृदयाच्या पुढच्या बाजूला रक्त पुरवते आणि वळसा घेऊन पाठीमागे जाणारी हृदयधमनी ही हृदयाच्या मागच्या बाजूला रक्तपुरवठा करते. या प्रमुख हृदयधमन्यांना पुढे अनेक फाटे फुटतात आणि ते सर्व हृदयाला रक्तपुरवठा करतात. यापैकी एखाद्या धमनीत काही अडथळा निर्माण झाला तर तिच्यातून वाहणाऱ्या रक्ताचं प्रमाण कमी होतं आणि हृदयाला रक्त अपुरं पडू लागतं.

    या धमन्यांमधून होणा-या रक्तपुरवठ्यात अडथळा कशामुळे येऊ शकतो?
    हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची शवचिकित्सा केल्यावर त्यांच्यापैकी बहुतेकांच्या हृदयधमन्यांमध्ये अडथळे असल्याचं आढळून येतं. (या अडथळ्यांना प्लाक - Plaque, ऍथेरोस्क्लेरॉसिस - Athero Sclerosis, किंवा आर्टिरिओ स्क्लेरॉसिस - Arteri Osclerosis असं म्हणतात) हे अडथळे हे छातीत दुखण्याचं. हृदयाला रक्त कमी पडण्याचं आणि हृदयविकाराच्या झटक्याचं मुख्य कारण असलं पाहिजे असा निष्कर्ष यावरून काढला गेला.
       जगातील आणि भारतातील या पुस्तकात हृदयविकाराच्या कोणत्या प्रकारचा विचार केला आहे. हृदय, हृदयविकार, हृदयविकाराचा झटका, हृदय शस्त्रकिया हे आहेत. ‘हार्ट अटॅक’ (Heart Attack), हा शब्द तर मराठीच वाटावा इतका आपल्या भाषेत रूळला आहे.
    एकंदरीत ‘हृदयविकार’ या रोगाला आपण टरकून असतो. आपल्याला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला कधीही हृदयविकार होऊ नये अशी आपली मनोमन इछा असते. कारण हृदयविकार झाला तर अचानक झटक्यानं किंवा थोड्याच काळात म्रुत्यू ओढवणार अशी भीती आपल्या मनात असते. हृदयविकार म्हणजे आकस्मिक मृत्यू, आज नाहीतर थोड्याच दिवसात, अशी सर्वसाधारणपणे या रोगाबाबतची समजूत आहे अन्‌ ती फारशी चूकीची आहे असंही नाही. दरवर्षी जगभरात मृत्यू पावणाऱ्यांमध्ये हृदयविकारानं मरणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे.

    कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, धूम्रपान, इतर उत्तेजक पदार्थ, स्थूलत्व आणि बैठी जीवनशैली, आनुवंशिकता, मधुमेह, मानसिक ताण, मानसिक एकटेपणा हे सर्व हृदयविकाराच्या द्रुष्टीने धोक्याचे घटक आहेत.

    हृदयधमनीविकाराला (आणि त्यामुळे होणा-या हृदयविकाराला) कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत होतात ते आपण पाहिलं. हृदयविकार टाळायचा असला तर कोलेस्टेरॉलची पातळी, धमनीच्या अस्तराला होणारी दुखापत, धमनीला येणारे पेटके आणि रक्तात तयार होणाऱ्या गुठळ्या या गोष्टी नियंत्रणात हव्यात. तेव्हा या गोष्टींवर परिणाम करणारे, त्यांना कारणीभूत ठरणारे घटक म्हणजेच धोक्याचे घटक कोणते असतात ते आपण पाहू या.

    कोलेस्टेरॉल
    आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणाचं काम यकृत करत असतं. आपल्या रोजच्या दैनंदिन आहारातल्या घटकामधून यकृत कोलेस्टेरॉल बनवत असतं. आणि यकृताची ही क्षमता ब-याच अंशी आनुवंशिक असते. त्यामुळे काही लोकांची कोलेस्टेरॉल पातळी त्यांनी कितीही संपृक्त चरबीयुक्त पदार्थ खाल्ले तरी फारशी वाढलेली आढळत नाही. तर याउलट काही लोकांच्या आहारात संपृक्त चरबीचा फारसा भाग नसतानासुध्दा त्यांची कोलेस्टेरॉलची पातळी वाढत गेलेली दिसते. 

    आपल्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी प्रमाणात ठेवायची असली तर आहारातून कोलेस्टेरॉल न खाणं किंवा कमीत कमी खाणं हा एक त्याचा मार्ग आहे. आपल्या आहारातील काही पदार्थामधून आपल्याला थेट कोलेस्टेरॉलच मिळत असतं. उदा. अंड्यातला पिवळा बलक. हा बलक जवळ जवळ संपूर्ण कोलेस्टेरॉलचा बनलेला असतो. तसचं लोणी, साय, चीज (Cheese), तूप इ. पदार्थांमधून आपल्याला कोलेस्टेरॉल आणि संपृक्त चरबी मिळते जिचं रूपांतर पुढे Cholesterol मध्ये होतं. कोलेस्टेरॉलची पातळी कमी ठेवायची असली तर हे पदार्थ आहारातून गाळणं आवश्यक आहे.

    आपल्या आहारातील तेल, तूप, लोणी या आणि अशा स्निग्ध पदार्थापैकी कोणते संपृक्त चरबीचे आहेत हे बघण्याचा साधा मार्ग म्हणजे हे पदार्थ किती तापमानाला गोठतात, ते बघावं. सर्वसाधारण तापमानाला म्हणजे हे पदार्थ किती तापमानाला जे पदार्थ घट्ट होतात ते संपृक्त चरबीचे असतात असं म्हणायला हरकत नाही. आपल्या रोजच्या स्वयंपाकातलं शेंगदाणा तेल, करडईच तेल किंवा सोयाबीन तेल ही आणि अशी वनस्पतिजन्य तेल घरातल्या तापमानात द्रवस्थितीत असतात. आणि ती असंपृक्त चरबीची असतात. पण पामतेल व खोबरेल तेल यांच्यात मात्र बऱ्याच प्रमाणात संपृक्त चरबी असते.

    उच्च रक्तदाब
    उच्च रक्तदाबाखाली वाहणारं रक्तं हे अधिक दाबाखाली वाहात असल्यामुळे धमनीच्या भिंतीवर अधिक जोरात धडका देतं आणि त्यामुळे धमनीच्या भिंतींना इजा पोचण्याची शक्यता असते. अशी इजा पोहचली की त्या ठिकाणी कोलेस्टेरॉलचा थर साचून अडथळा तयार होऊ लागतो.

    अडथळा तयार झाल्यामुळे धमनी चिंचोळी होते, ती चिंचोळी झाल्यामुळे, रक्तप्रवाहाला मिळणारी वाट कमी झाल्यामुळे, रक्तप्रवाहाचा दाब आणखी वाढतो आणि ते आणखी जोरानं भिंतीवर धडका देऊ लागतं. असं एक दुष्टचक्र उच्च रक्तदाबामुळे सुरू होतं. 

    स्थूलत्व आणि बैठी जीवनशैली: लठ्ठपणा आणि फारसे शारीरिक श्रम करावे न लागणारी दैनंदिन राहणी असलेली जीवनशैली या गोष्टींचाही हृदयविकार होण्यात वाटा असतो. अशा लोकांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण इतरांपेक्षा जास्त असल्यांचं आढळून येतं.

    हृदयविकाराच्या दृष्टीनं आणखी काही धोकादायक असे घटक आहेत की ज्यांच्यावर आपलं काहीही नियंत्रण असू शकत नाही. उदा. लिंग, वय, आनुवंशिकता, मधुमेह. 

    लिंग आणि वय: हृदयविकारानं मृत्यू येण्याचं प्रमाण ६५ वर्षांनंतर पुष्कळ जास्त असलं तरी एकूण मृत्यूंपैकी १/३ मृत्यू ६५ वर्षांपूर्वीच झालेले असतात. त्यातही हृदयविकारानं मृत्यू होण्याचं प्रमाण पुरूषांमध्ये जास्त आहे. असं आढळून आलेलं आहे की ३५ ते ४४ वर्षांच्या वयानंतर मात्र हे प्रमाण जवळ-जवळ सारखंच असतं. मेनोपॉज पूर्वी (म्हणजे मासिक पाळी बंद होण्यापूर्वी) स्त्रियांच्या रक्तात चांगल्या कोलेस्टेरॉलचं म्हणजे HDL Cholesterol चं प्रमाण जास्त असत, आणि त्यामुळे बहुधा त्यांचा हृदयविकार कमी होत असावा. 

    आनुवंशिकता: आपल्या रोजच्या आहारातून किती कोलेस्टेरॉल तयार होतं हे आपल्या यकृताच्या कामगिरीवर अवलंबून असतं. काही लोकांना आनुवंशिकत:च या दृष्टीनं कार्यक्षम असं यकृत मिळालेलं असतं तर काही लोकांचं यकृत पुरेसं सक्षम नसतं. या बाबतही आपल्या हातात करण्याजोगं काहीच नसतं. 

    मधुमेह:हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू येण्याचं प्रमाण मधुमेहींच्यामध्ये इतर लोकांपेक्षा जास्त असतं. विशेषत: लहान वयात ज्यांना मधुमेह झालेला असतो त्यांच्या मध्ये हे प्रमाण वाढलेलं आढळून येतं. मधुमेह हा ब-याच वेळा आनुवंशिक असतो. त्यामुळे तो टाळता येत नाही. पण योग्य आहार, व्यायाम यांसारख्या गोष्टींनी तो आटोक्यात मात्र ठेवता येतो. हृदअपु-या याला होणारा रक्तपुरवठा हृदयधमनीविकारामुळे कमी झालेला असला की हृदयविकार होतो आणि काही कारणानं तो पूर्णपणे बंद पडला किंवा बराच काळ अपुऱ्या प्रमाणात सुरू राहिला तर हृदयविकाराचा झटका येतो हे आपण पाहिलं.

    हृदयधमनी विकारात हृदयधमन्यांमध्ये अडथळे निर्माण झालेले असतात आणि त्यामुळे त्या चिंचोळ्या होऊन रक्ताचा प्रवाह कमी झालेला असतो. याशिवाय काही वेळेला अडथळ्यांमधून रक्तस्त्राव होऊन रक्ताच्या गुठळ्या प्रवाहात येतात आणि चिंचोळ्या भागात त्या अडकून बसून रक्तपुरवठा बंद पडतो. पण कधी कधी खुद्द हृदयधमनीलाच पेटका येऊन ती एकदम चिंचोळी होते आणि अशा तात्पुरत्या चिंचोळ्या झालेल्या धमनीतही अडथळ्याच्या ठिकाणी रक्तप्रवाह पूर्णपणे बंद पडून हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. म्हणजे, हृदयविकाराला (कार्डिऍक हार्ट डिसीजच) कारणीभूत कोण? तर हृदयधमनी विकार आणि हृदयधमनी विकाराला कारणीभूत असलेल्या गोष्टी म्हणजे एकतर कोलेस्टेरॉलचं धमनीच्या आतल्या भागावर बसणारं किटण (याला कारण म्हणजे रक्तातील कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी), दुसरं म्हणजे हृदयधमन्यांना येणारे पेटके, आणि तिसरं म्हणजे हृदयधमनीतील अडथळ्यांमधून रक्तस्त्राव होऊन बाहेर सुटणाऱ्या रक्ताच्या गुठळ्या. या तिन्ही गोष्टींना कारणीभूत असणाऱ्या बाबी म्हणजे, वाढीव कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, निकोटिन असलेल्या पदार्थांचं सेवन, वाढतं वय, आनुवंशिकता, आहार, मधुमेह अशा असतात हे आपण पाहिलं. यापैकी काही बाबींवर आपलं नियंत्रण असूच शकत नाही हे खरं असलं तरी काही बाबी मात्र आपण प्रयत्‍नानी आटोक्यात ठेवू शकतो. शिवाय या सगळ्या घटकांच्या जोडीला आणखी दोन घटक बरेच महत्त्वाचे असल्याचं अलीकडे लक्षात येऊ लागलं आहे. एक म्हणजे मानसिक ताणतणाव आणि दुसरा म्हणजे एकटेपणा किंवा एकाकीपणा.

    मानसिक ताण

    मानसिक ताण मोजण्याचं साधन आज उपलब्ध नसलं, तरी सध्याच्या आधुनिक जगामध्ये, आपल्या आधुनिक दिनक्रमामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक मानसिक तणावाचे, ताणाचे प्रसंग आपल्या रोजच्या आयुष्यात घडत असतात. यांच्यामुळे मनावर प्रचंड ताण पडतो असं नाही पण सौम्य प्रमाणातला ताण मात्र आपल्या जीवनामध्ये मनावर बराच काळ असतो तर काही काही वेळा अचानक अतिशय मोठा ताणही येण्याची शक्यता असते.
    मानसिक ताणाखाली वावरत असताना आपली ‘फाईट ऑर फ्लाईट’ यंत्रणा कार्यान्वित झालेली असते आणि ती दीर्घकाळ कार्यरत राहिल्यामुळे, धोका टाळण्यासाठी म्हणून कार्यरत होणारी ही यंत्रणा नुकसानकारक एवढंच नव्हे तर प्रसंगी प्राणघातकही ठरू शकते. आपल्या हातापायांच्याच नव्हे तर हृदयातल्या धमन्याही आकुंचन पावू लागतात. रक्तात गुठळ्या होण्याची शक्यता वाढत जाते. कारण रक्तगोठण्याची क्रिया बराच काळ जलद चालू राहते. शरीराचे बरेच स्नायू या काळात आकुंचित होतात. या स्नायूंमध्ये पाठ, खांदे, मान यांतल्या मोठ्या स्नायूंबरोबरच हृदयधमन्यांमधले अरेखित स्नायूदेखील असतात. एवढंच नव्हे तर खुद्द हृदयातले (Fibres) असतात.

    हल्लीच्या आधुनिक युगात कुठल्याच प्रकारचा ताण नसलेलं आयुष्य जगणं ही अशक्य गोष्ट आहे. विशेषत: शहरी धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जीवनात तर आता अशक्यच गोष्ट झाली आहे पण शक्यतो कमी ताण येईल असं बघणं आणि आलेला ताण योग्य रीतीनं हाताळणं हे मात्र आपण करू शकतो. ताणाच्या प्रसंगांना योग्य रीतीनं तोंड द्यायचं आणि नंतर मनावराचा ताण जाणीवपूर्वक हलका करायचा हे हृदयविकाराच्या दृष्टीनं महत्त्वाचं असल्याचं आता लक्षात येऊ लागलेलं आहे.


    पथ्यं


    हृदयविकार असणाऱ्या रूग्णाला छातीत, पाठीत, खांद्यात, मानेत अशा वेदना होऊ लागल्या (ज्या अँजायनाच्या हृदयझटक्याच्या असू शकतात) तर अशा वेळी घेण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना काही गोळ्या दिलेल्या असतात. (सॉरबिट्रेट किंवा तत्सम) या गोळ्या अशा रूग्णांनी सतत स्वतःबरोबर बाळगाव्या असं त्यांना सांगितलेलं असतं. जर काही त्रास होऊ लागला तर त्यातली अर्धी ते एक गोळी ताबडतोब जिभेखाली ठेवायची असते. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे बहूतेक रूग्ण या गोळ्या आपल्या खिशात, पाकिटात अशा ठिकाणी ठेवतात.

    पण पुष्कळदा या गोळ्या आपण कुठे ठेवल्या आहेत ते आपल्या जवळच्या किंवा नेहमी बरोबर असलेल्या व्यक्तीला मात्र त्यांनी सांगितलेले नसतं. त्यामुळे त्रास होऊ लागला किंवा हृदयविकाराचा झटका आला तर बरोबर असलेल्या किंवा घरात असलेल्या व्यक्ती डॉक्टरांशी संपर्क साधण्याची, रूग्णाला हॉस्पीटलमध्ये नेण्याची धावपळ करू लागतात आणि तातडीनं जे औषध द्यायला हवं ते मात्र दिलं जात नाही. हे औषध द्यायला हवं हे पुष्कळांना माहीत नसतं. तर ते कुठे ठेवलेलं आहे हे कित्येकांना माहीत नसतं. हृदयविकाराचा झटका आलेला रुग्ण काही वेळा पूर्ण बेशुध्द होतो तर काही वेळा बेशुध्द नसला तरी त्याचा एकदम शक्तीपात झाल्यामुळे तो बोलण्याच्या किंवा विचार करण्याच्या परिस्थितीत नसतो. त्यामुळे बरोबर किंवा जवळपास असलेल्यांनी त्याला ही तातडीची मदत करणं आवश्यक असतं. याचप्रमाणे या तातडिक गोळ्या एकाच ठिकाणी न ठेवता ठराविक ठिकाणी, त्या ठेवलेल्या असाव्या. आणि आपल्या घरातल्या सर्वांना, सहकाऱ्यांना, पुष्कळदा बरोबर असणाऱ्या मित्रांना या गोळ्यांचं महत्व आणि ठेवण्याचं ठिकाण सांगितलेलं असावं.
    भात
    1. खिचडी ज्वारीची
    2. भात - जिरे, मिरे
    3. भात - पालक
    4. भात - बटाटा
    5. भात - मटार - टॉमेटो
    6. भात - मेथी
    भाज्या
    1. उसळ - मसुरची
    2. बेक्ड व्हेजिटेबल्स इन व्हाईट सॉस
    3. भरला बटाटा
    4. भरली भेंडी
    5. वांग्याची सुकी भाजी
    6. व्हेजिटेबल स्ट्यू(१)
    7. व्हेजिटेबल स्ट्यू(२)
    चटण्या
    1. कांदा - कैरी गोड लोणचं
    2. चटणी - कच्च्या टोमॅटोची
    3. चटणी - कांदा तीळ परतलेली
    4. चटणी - दोडक्याच्या शिरांची
    5. मेथांबा
    सूप, सार इ.
    1. डाळ पंजाबी
    2. दूधजल कढी
    3. सार - टोमॅटो
    4. सार - आमसुलाचं
    5. सूप - क्रीम ऑफ टोमॅटो
    6. सूप - भाज्याचं
    7. वरण - मुगाचं
    8. वरण - मेथीचं
    कोशिंबीर
    1. कोशिंबीर - अंडी - बटाटा
    2. कोशिंबीर - काकडी
    3. कोशिंबीर - केळं-टोमॅटो
    4. कोशिंबरी - कोबीची
    5. कोशिंबीर - गाजर - कांदा
    6. कोशिंबीर - गाजर - टोमॅटो
    7. कोशिंबीर - मोडाच्या मुगाची
    8. कोशिंबीर - मूगडाळ-भाज्या
    9. कोशिंबीर - कोल स्लॉ(१)
    10. कोशिंबीर - कोल स्लॉ(२)
    11. भरीत - भोपळ्याचं
    12. कोशिंबीर - भेंडी - कांदा
    हृदयरोग कोणकोणत्या रूपाने प्रकट होऊ शकतो?
    • अचानक मृत्यू -हृदय अचानक थांबते. 
      अंजायना -हृदयाच्या प्रमुख तीन रक्तवाहिन्यांपैकी कोणतीही एक किंवा अधिक रक्तवाहिनी बंद झाल्याने हृदयाच्या काही भागाला अपुरा रक्तपुरवठा होतो.
    त्यामुळे चालतांना किंवा श्रम करतांना हृदयाच्या आसपास वेदना उठतात (छातीत, डाव्या हातात, दोन्ही हातांत, मानेत, जबड्यात, हनुवटीत) आराम केल्यावर काही मिनिटांनी वेदना थांबते.
    • हार्ट अटॅक - हृदयाची रक्तवाहिनी अचानक बंद झाल्याने हृदयाच्या काही भागाचा रक्तपुरवठा पूर्णपणे थांबतो व हृदयाचा तेवढा भाग निकामी होतो. छातीत तीव्र वेदना होतात, ज्या ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ सुरू राहतात. सोबत घाम, उलट्या, थकवा, अनेकदा पोटातील गॅसेस किंवा ऍसिडिटी, छातीतील स्नायुंचे दुखणे, किंवा काळजीमुळे काहीशा अशाच प्रकारचे दुखू शकते. तर कधी कधी हार्ट अटॅक पूर्णपणे वेदनारहित असू शकतो (सायलेंट इन्फार्क्‍शन), या कारणांनी रूग्ण व डॉक्टर दोघांनाही हा बरेचदा फसवतो.
    • हृदयाचा पंप कमजोर होणे - श्रम करतांना दम लागणे, किंवा बिछान्यात झोपल्यावर दम लागणे, पायावर सूज.
    • हृदयगती अनियमित - छातीत धडधड होते, नाडीचे ठोके अनियमित किंवा खूप वेगाने पडतात.
    • हार्ट ब्लॉक - हृदयाची गती अचानक खूप कमी (३० - ४० प्रती मिनिट) अशी होते. चक्‍कर येणे, बेशुध्द पडणे.
    हृदयरोगासाठी तपासण्या
    • हिस्टरी (रोग्याने दिलेली माहिती, रोगाची शंका त्रासाचे वर्णन) छातीतले दुखणे इतर अनेक कारणांनी देखील निर्माण होऊ शकते. छातीतील प्रत्येक दुखणे हृदयरोगामुळे नसते.
    • शारीरिक तपासणी - डॉक्टर द्वारा केलेली शारिरीक तपासणी
    • इ. सी. जी. - आरामात झोपवून. अंजायन असतांना १०० इ. सी. जी. ही परीक्षा पुरेशी संवेदनाक्षम नाही. ३० टक्‍के अनेकदा रोग असूनही इ. सी. जी. मधे काहीही रोग हार्ट अटॅक असताना आढळत नाही. उलट इ. सी. जी. मधले काहीबदल - ८० टक्‍के असे आहेत, की ते हृदयरोगाशिवाय अन्य कारणांमुळेही होऊ शकतात. इ. सी. जी. ने रोगनिदान होत नसल्यास पुढील टेस्ट करतात.
    तपासण्याक्षमताकिंमत (रू)
    ट्रेडमिल टेस्ट - फिरत्या पट्‍ट्यावर चालवून५५ ते ७५ टक्‍के६००
    इको कार्डिओग्राफी - आरामात व चालवून८५ टक्‍के१ ते २ हजार
    स्ट्रेस थॅलियम टेस्ट - सायकल फिरवून--
    थॅलियम इंजेक्शन८० टक्‍के५ ते ८ हजार
    कोरोनरी ऍजिओग्राफी - हृदयात नळी घालून१०० टक्‍के१५,०००/-

    रक्तवाहिन्यांचे फोटो. रक्तवाहिन्यांची रोग शोधण्याची संवेदनक्षमता १०० ऽ मानली जाते, पण हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे तात्कालिक आकुंचन (कोरोनरी स्पाजम) व हृदयाच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांचा रोग हे हृदयरोग असूनही कोरोनरी अँजिओग्राफी नॉर्मल येते.

    डॉ. अभय बंग ह्यांच्या ’माझा साक्षात्कारी हृदयरोग’ ह्या पुस्तकात लिहिले आहे,
    “माझ्या हृदयरोगाच्या निदानाने मला बरेच दिवस चकवलं होतं. याबद्दल मला फार विषाद व अपराधी भावना होती. एक दिवस ‘लासेन्ट’ या जगप्रसिध्द वैद्यकीय जर्नलचा वार्षिक विशेषांक हृदयरोगावर आला. या अंकाचे अतिथी संपादक हे हृदयरोगावरचे जागतिक तज्ञ मानले जातात. त्यांनी लिहिलं होतं, ‘गेल्या वर्षी मला जेव्हा हार्ट अटॅक आला, तेव्हा छातीत दुखत असूनही वैद्यकीय निदान करून मदत घ्यायला मी ७२ तास उशिर केला.

    माझ्या या मूर्खपणामुळे मला फार अपराधी वाटत होतं. म्हणून मी गेल्या काही वर्षात हार्ट अटॅक आलेल्या जगातील प्रमुख १० हृदयरोग तज्ज्ञांना त्यांचा अनुभव विचारला. दहा पैकी दहाही तज्ज्ञांनी स्वतःचं वैद्यकीय निदान चुकवलं होतं, टाळलं होतं व उपचारात दिरंगाई केली होती’.”

    Thursday, November 19, 2015

    तुमची बायको / तुम्ही या निकषात बसता का ?

    प्रत्येक नवरेमंडळीच्या कानावर
    बायकोचा पडणारा...शब्द..!






    ��






    ��





    ��

    खाली उत्तर वाचल्यास हसू येईल कारण गावंढळ असो वा
    उच्च शिक्षीत सर्व बायकांचे डोके
    देव एकाच फँक्टरीत बनवतो.
    ����������������

    विचार केला का...

    उत्तर...- मी आहे म्हणूनच टिकले दुसरी कोण असती तर केव्हाच सोडून गेली असती.
    ��

    आता हसा..������

    पुढिल मेसेज जरा गमतीनं घ्या बर!

    तुमची बायको आदर्श व गृहकृत्यदक्ष आहे हे तुम्ही कसे ओळखाल ?

    भात चिगट झाल्यास...
    तांदूळ नवीन होता��

    चपात्या कडक झाल्यास...
    चांगले दळून दिले नाही
    ��

    चहा गोड झाल्यास...
    साखर जाड होती
    व��

    तो पातळ झाल्यास...
    दुधात पाणी जास्त होत��

    लग्नाला किंवा Function ला जाताना...
    कुठली साडी नेसू?
    मला चांगली साडीच नाही!��

    घरी लवकर आल्यास...
    आज लवकर कसा आलात?��

    उशीर झाल्यास...
    इतका वेळ कुठे होतात?��

    एखादी वस्तू स्वस्त आणल्यास...
    तुम्हाला सगळे फसवतात...
    ��

    महाग आणल्यास...
    तुम्हाला कुणी आणायला सागितलं होतं?��

    जेवणाचं कौतुक केल्यास...
    मी दररोजच करते

    ��

    नावं ठेवल्यास...
    तुम्हाला मेलं कौतुकच नाही कशाचं��

    एखाद काम केल्यास...
    एक काम कधी धड करत नाही...
    ��

    न केल्यास...
    तुमच्या भरवशावर राहिले तर एकही काम होणार नाही...
    ��

    बघा, तुमची बायको / तुम्ही या निकषात बसता का ?

    स्वत: ची काळजी घ्या,
    शांत रहाण्याचा प्रयत्न करा.
    भिऊ नका, देव तुमच्या पाठिशी आहे...
    ����
    so be silent��

    Namaskar....
    ��������

    Thursday, August 27, 2015

    पु.ल.देशपांडे ..खाद्यान्न

    ( पु.लं )  ��                     खाण्याचंसुद्धा शास्त्र आहे. रागांना वर्ज्यबिर्ज्य स्वर असतात, तसे खाण्यालासुद्धा असतात. उदाहरणार्थ, श्रीखंड घ्या. बाकी, जोपर्यंत मला प्रत्यक्ष काही द्यावं लागत नाही तोपर्यंत 'घ्या' म्हणायला माझं काय जातं म्हणा! तर श्रीखंड पावाला लावून खा," म्हटलं तर तो खाणार नाही. वास्तविक पाव हा देखील पुरीसारखा गव्हाचाच केलेला असतो; पण श्रीखंडाच्या संदर्भात तो वर्ज्य स्वर आहे. पाव आणि अंड्याचं आमलेट ही जोडी शास्त्रोक्त आहे. पुरी आणि आमलेट हे एकत्र सुखांन नांदणार नाहीत. जिलबी आणि मठ्ठा यांचा संसार जसा सुखाचा होतो तसा जिलबी आणि...छे! जिलबीला अन्य कुणाशी नांदायला पाठवण्याची कल्पनाच रुचत नाही.

    खाण्याचे हे कायदे सांभाळून खाण्याला खानदानी मजा आहे. सुरांचे वर्ज्यावर्ज्य नियम पाळून गाण्याला जसं खानदानी गाणं म्हणतात. तसंच पदार्थाची कुठली गोत्रं जुळतात त्याचा विचार करून ते पानात वाढण्याला खानदानी खाणं म्हणतात. राग्याप्रमाणंच खाण्याच्या वेळा सांभाळल्या पाहिजेत. सकाळी यमन बेचव वाटतो. सकाळी थालीपीठही बेचव वाटतं. मारवा राग जसा संधिकालातला, तसंच थालीपीठदेखील साधारणतः भीमपलास आणि पूरिया धनाश्री या रागांच्या वेळांच्या मधे बसतं सारंगाच्या दुपारच्या वेळेला थालीपीठ खाऊन पहा. आणि संध्याकाळी साडेपाच-सहाच्या सुमाराला नको म्हणून पहा. 

    बाहेर पाऊस पडत असताना ज्याला गरम भजी म्हणून खावीशी वाटली नाहीत, तो मनुष्य चळलाच म्हणून समजावं. सकाळी तीन भजी खाल्ली तरी अधिक. पण बाहेर पाऊस पडतो आहे, हवेत गारवा आहे, रमी किंवा ब्रिजमध्ये आपण जिंकतो आहो, अशा वेळी शेकडो भजी खाल्ली तरी ती अधिक नाहीत. अधिकचं हे असं आहे. लोक भलत्या वेळी, भलत्या ठिकाणी आणि भलतं खातात. हॉटेलात जाऊन भेळ खाण्या-याचं पोट नव्हे, मुख्यत: डोकं बिघडलेलं असतं. शहाळ्याचं पाणी हापिसात बसून पिणा-याची प्रमोशनं थांबवली पाहिजेत. मसाल्याच्या दुधावर पान खाल्लं पाहिजे. आणि चहाबरोबर भलतंच खातात.. आणि चहावर धुम्रपान केलं पाहिजे. खाण्यापिण्याचंही काही शास्त्र आहे. ह्या भारतात एके काळी हे शास्त्रवेते होते. उपासांच खाणंदेखील शोधून काढणारी ती विद्वान माणसं माझ्या माहितीत आहेत. उपास लागणा-या माणसाइतकीच उपासाचे पदार्थ जास्त झाल्यामुळं जरा जड वाटतंय म्हणणारी माणसं आहेत. 

    लग्नाला पंक्ती, गावजेवणं, समाराधना वगैरेचा तो जमाना होता. 'हरहर महादेव'ही आरोळी रणक्षेत्राप्रमाणं वरणक्षेत्रादेखील उठत असे. माणसं बसल्या बैठकीला शंभर जिलब्या तोंडी लावणं म्हणून उठवत, त्यानंतर आग्रह सुरू होई. सा-या सणांतून खाणे काढून टाका नि काय उरते पाहा. सारी भारतीय संस्कृती खाण्याभोवती गुंतली आहे;नव्हे, टिकली आहे. होळीतून पोळी काढली की उरतो फक्त शंखध्वनी तो देखील पोळी मिळणार नसेल तर क्षीणच व्हायचा. दिवाळीतून फराळ वगळा, नुसती ओवाळणीची वसुली उरते. संक्रातीच्या भोगीला जोवर तीळ लावलेली बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत आणि तिळगूळ आहे तोवर 'गोड गोड बोला' म्हणतील लोक. 

    कोजागिरी पौर्णिमेतनं आटीव केशरी दुध वगळा, उरेल फक्त जागरण आणि कुठल्या तरी सस्त्यात मिळालेल्या उमेदवार गवयाचं गाणं. गणेशचतुर्थीला मोदक नसले तर आरत्या कुठल्या भरवशावर म्हणायच्या? रामनवमीच्या सुंठवडा, कृष्णाष्टमीच्या दहीलाह्या, दत्तापुढले पेढे, मारुतरायापुढलं साधं खोबरं अन, खडीसाखर... सा-या देवांची मदार या खाण्यावर आहे. हेच गाळलं की हल्लीच्या लग्नासारखं व्हायचं. पाहुण्यांचे हात ओले करण्याऎवजी आहेराच्या रूपानं स्वतःचे हात धुवून घेण्याचा कार्यक्रम. पंगती उठवण्याऎवजी कर्कशकर्ण्यातून रेकॉर्डस ऎकवून येणा-याचं डोकं उठवायचं.
    ( पु.ल.देशपांडे )                                                                                   शुभ खाद्यान्न !  शुभदिन !

    Tuesday, July 28, 2015

    रामेश्वरम ते राष्ट्रपतीभवन- डॉ. अब्दुल कलाम.

    ए.पी.जे. अब्दुल कलाम

    पूर्ण नावअबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम
    जन्म१५ ऑक्टोबर १९३१
    रामेश्वर
    नागरिकत्वभारतीय
    राष्ट्रीयत्वभारतीय
    धर्ममुस्लीम
    पुरस्कारपद्मभूषण', 'पद्मविभूषण', 'भारतरत्न

    वडीलजैनुलाबदिन अब्दुल
    अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (जन्म ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७[१]) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले.

    शिक्षण
    त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.
    त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी(DRDO) संबंध आला.

    कार्य
    १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.
    स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या 'विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे ते प्रमुख झाले.
    वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
    विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे आहेत. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद आहे. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित आहेत व पूर्ण शाकाहारी आहेत. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते पाहतात. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे.

    गौरव
    भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९७ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
    Year of Award or HonorName of Award or HonorAwarding Organization
    १९८१पद्मभूषणभारत सरकार [२][३]
    १९९०पद्मविभूषणभारत सरकार [२][३]
    १९९७भारतरत्नभारत सरकार[३][४]
    १९९७इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारभारत सरकार [३]
    १९९८वीर सावरकर पुरस्कारभारत सरकार
    २०००रामानुजम पुरस्कारमद्रासचे अल्वार रिसर्च सेंटर[३]
    २००७किंग चार्ल्स (दुसरा) पदकब्रिटिश रॉयल सोसायटी[५][६]
    २००७डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवीवॉल्व्हरहॅम्फ्टन विद्यापीठ, U.K[७]
    २००८डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग (Honoris Causa)नान्यांग टेक्नॉजिकल युनिव्हर्सिटी, सिंगापूर[८]
    २००९हूवर पदकASME Foundation(अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स)[९]
    २००९आंतरराष्ट्रीय von Kármán Wings पुरस्कारअमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, U.S.A[१०]
    २०१०डॉक्टर ऑफ इंजिनिरिंगवॉटरलू विद्यापीठ[११]
    २०११न्यू यॉर्कच्या IEEE (इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्टिकल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स) या संस्थेचे समासदत्व.IEEE[१२]

    कारकीर्द
    जन्म : १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे.
    शिक्षण : श्वात्र्झ(?) हायस्कूल, रामनाथपुरम. सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी(१९५४). नंतर चेन्नई येथून एरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदविका घेतली(१९६०).
    १९५८ : डी.आर.डी.ओ.मध्ये सीनियर सायंटिस्ट. तेथे असताना प्रोटोटाईप हॉवरक्रॉफ्ट (हॉवरक्राफ्टचे कामचलाऊ मॉडेल) तयार केले. हैद्राबादच्या डी.आर.डी.ओ.(डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन)चे संचालकपद.
    १९६२ : बंगलोरमध्ये असताना भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी. एरोडायनॅमिक्स डिझाइनच्या फायबर रीएनफोर्स्ड प्लास्टिक (FRP) या प्रकल्पात सहभागी.
    १९६३ ते ७१ :विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम केले. तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर(ISRO) येथे सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल(SLV) प्रोग्रॅमचे प्रमुख.
    १९७८ ते ८६ : प्रा. सतीश धवन यांच्याबरोबर काम.
    १९७९ : SLVच्या उड्डाण कार्यक्रमाचे संचालक
    १९७९ ते ८० : थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्टर. (जुलै १९८० अवकाशात रोहिणी हा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित)
    १९८१ : पद्मभूषण पुरस्कार प्राप्त
    १९८५ : त्रिशूल या अग्निबाणाची निर्मिती.
    १९८८ : पृथ्वी अग्निबाणाची निर्मिती. रिसर्च सेंटरची इमारत तयार करवली.
    १९८९ : अग्नी या अग्निबाणाची निर्मिती.
    १९९० : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.
    १९९१ : वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री डी. आर.डी. ओ. चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) हा रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एल.सी.ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
    १९९४ : 'माय जर्नी ' हा कवितासंग्रह प्रकाशित.
    २५ नोव्हें. १९९८ : भारतरत्‍न हा पुरस्कार प्राप्त.
    २००१ : सेवेतून निवृत्त.
    २००२ : भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमणूक.
    मागील:
    के.आर. नारायणनभारतीय राष्ट्रपती
    जुलै २५, २००२ – जुलै २५, २००७पुढील:
    प्रतिभा पाटील
    अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]
    अदम्य जिद्द (मराठी अनुवाद : सुप्रिया वकील)
    इग्नाइटेड माइंड्‌स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर)
    'इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम' (इंग्रजी, सहलेखक अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन); 'भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध' या नावाने मराठी अनुवाद : अभय सदावर्ते)
    इंडिया - माय-ड्रीम
    एनव्हिजनिंग ॲन एम्पॉवर्ड नेशन : टेक्नालॉजी फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन
    ए.पी.जे. अब्दुल कलाम - एक व्यक्तिवेध (मराठी अनुवाद : माधुरी शानभाग)
    विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र). मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद, अनुवादक :माधुरी शानभाग.
    सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)
    टर्निंग पॉइंट्‌स (याच नावाचा मराठी अनुवाद : अंजनी नरवणे)
    दीपस्तंभ (सहलेखक : अरुण तिवारी; मराठी अनुवाद कमलेश वालावलकर)
    डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके[संपादन]
    इटर्नल क्वेस्ट : लाइफ ॲन्ड टाइम्स ऑफ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक : एस.चंद्रा)
    ’डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम - एक मानवतावादी शास्त्रज्ञ.’ (हिंदी, मूळ लेखक अतुलेंद्रनाथ चतुर्वेदी; मराठी अनुवाद - मंदा आचार्य).
    ए पी जे अब्दुल कलाम : द व्हिजनरी ऑफ इंडिया (इंग्रजी, लेखक : के. भूषण आणि जी. कात्याल)
    प्रेसिडेंट एपीजे अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक :आर के पूर्ती)
    रामेश्वरम ते राष्ट्रपतीभवन- डॉ. अब्दुल कलाम. (मराठी, लेखक : शां. ग. महाजन)

    Don’t take rest after your first victory because if you fail in second, more lips are waiting to say that your first victory was just luck.” - A.P.J Abdul Kalam

    “All Birds find shelter during a rain. But Eagle avoids rain by flying above the Clouds.” - A.P.J Abdul Kalam

    “Failure will never overtake me if my definition to succeed is strong enough”. - A.P.J Abdul Kalam

    “Man needs difficulties in life because they are necessary to enjoy the success.” - A.P.J Abdul Kalam

    “If you want to shine like a sun. First burn like a sun.” - A.P.J Abdul Kalam 

    “It is very easy to defeat someone, but it is very hard to win someone” - A.P.J Abdul Kalam

    "All of us do not have equal talent. But , all of us have an equal opportunity to develop our talents.” - A.P.J Abdul Kalam

    " Be more dedicated to making solid achievements than in running after swift but synthetic happiness." -A.P.J Abdul Kalam

    "Thinking should become your capital asset, no matter whatever ups and downs you come across in your life."  - A.P.J Abdul Kalam

    " Without your involvement you can't succeed. With your involvement you can't fail. " - A.P.J Abdul Kalam