Saturday, October 1, 2016

नवरात्र....आणि नावरात्रीचे नऊ रंग*

*नवरात्र....आणि नावरात्रीचे नऊ रंग*

1)पहिला रंग स्त्रीभ्रूण हत्या थांबवायचा.

2)दुसरा रंग मुलगी झाल्यावरही मुलगा झाल्याइतकाच आनंद मानायचा.

3)तिसरा रंग आपल्याच मुलीकडे लायबलिटी म्हणून न पहाता ऍसेट म्हणून पहायच्या वृत्तीचा.

4)चौथा रंग मुलीला भरपूर शिकवून स्वावलंबी करायच्या मानसिकतेचा.

5)पाचवा रंग बायकांवरचे फडतूस आणि आकसयुक्त विनोद बंद करायचा.

6)सहावा रंग पुरुषांनी आपल्या शारीरिक ताकदीचा माज सोडून स्त्रीच्या बौद्धिक आणि मानसिक कणखरतेला सलाम करायचा.

7)सातवा रंग स्त्री ही फक्त "मादी" नसून अनेक बाबतीत आपल्याहून श्रेष्ठ असलेली "माणूस" आहे हे लक्षात घ्यायचा.

8)आठवा रंग विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी ह्याबाबत अत्यंत कठोर कायदे करून, लवकर न्याय करून समाजातील नराधमांच्या मनात भीती निर्माण करायचा.

9)नववा रंग "स्त्री पुरुष समानता" ह्या विषयावर फक्त टाळ्या मिळवणारी भाषणे, कौतुक मिळवणारे लेख न लिहिता ते अंगी बाणवण्याचा.प्रयत्न करू या

जगाने हे रंग पाळले तर 
आपल्या घरात, शेजारी, समाजात, देशात, जगात आपल्याला रोज भेटणाऱ्या दुर्गा, अंबाबाई, महालक्ष्मी आपल्याला प्रसन्न होतील, अनेक आशिर्वाद देतील. 
मग प्रत्येक दिवस "विजयादशमी" असेल. 
सोने लुटावे लागणार नाही....
आयुष्याचेच सोने होईल !

विश्वास नागरे पाटील यांचा सूंदर लेख

✍✍✍✍✍✍✍✍✍
_*विश्वास नागरे पाटील यांचा सूंदर लेख*_

☕ माझ्या हातात चहाचा कप होता, ऊभ्यानं चहा पित होतो.
अचानक तोल गेला,
कप सांभाळत पडल्यामुळे,
हाताच्या कोपराला लागले.
कपही फुटला.
जर मी कप सोडला असता,
तर लागले नसते.

आपल्यालाही असाच अनुभव ब-याच वेळा आला असेल.

शुल्लक गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्टी अशाच निसटुन जातात.
*गरज असते फक्त शुल्लक गोष्टी सोडुन देण्याची.*

🔸 *मला विचारलच नाही;*
🔹 *मला Good morning केले नाही;*
🔸 *मला निमंत्रणच दिलं नाही;*
🔹 *माझं नावंच घेतलं नाही;*
🔸 *माझ्या शुभेच्छा स्विकारल्या नाहीत;*
🔹 *माझा फोन घेतला नाहीं ;*
🔸 *मला बसायला खुर्चीच दिली नाही;*
🔹 *मला मानच दिला नाही.*
🔸 *सोडुन द्या हो!*
🔹 *सोडायला शिकलं कि मग पहा,*
🔸 *निसटुन चाललेल्या नात्यांमधे पुन्हा जीवन येईल.*
🔹 *सूक्ष्म अहंकार चांगली माणसं ओळखु देत नाही.  तो सोडता आला कि झालं.*

✍ तो लगेच सोडता येणार नाही.  पण कठिणही नाही.  प्रयत्न करायला काय हरकत आहे.  लक्षात ठेवा एकदा का जर नात्यात क्लिष्टता निर्माण झाली की ते कधीच जुळत नसतात आणि तुम्ही समोरच्या व्यक्तिच्या मनातून कायमचे उतरता.

       💐💐 *खास सर्वांना* 💐💐