Friday, October 24, 2014

EASY WAYS TO CURE FROM COLD 

EASY WAYS TO CURE FROM COLD 

Take some time off.  Get extra rest.

Gargle with warm salt water and baking soda. 

Turn on a humidifier or vaporizer.  Inhale steam to ease your congestion and drippy nose. Hold your head over a pot of boiling water and breathe through your nose. Be careful. If the steam burns your nose, breathe in more slowly. 

Eat chicken soup. 

Eat raw honey.

Get lots of vitamin C. Consider taking a vitamin C supplement, drinking orange juice and eating fruits with a high vitamin C content, such as oranges, kiwis and strawberries. Although the effectiveness of vitamin C in stopping colds is widely disputed, many vitamin C proponents advise the use of vitamin C daily to reduce the duration of a cold.

Blow your nose sparingly Blow your nose often, but do it the proper way. It's important to blow your nose regularly when you have a cold rather than sniffling mucus back into your head. But when you blow hard, pressure can carry germ-carrying phlegm back into your ear passages, causing earache. The best way to blow your nose is to press a finger over one nostril while you blow gently to clear the other.

Drink honey and lemon tea. 

Take a hot bath or shower.

Drinking water or juice will prevent dehydration and keep your throat moist. Include fluids such as water, sports drinks, herbal teas, fruit drinks, or ginger ale.


Stay warm and rested. Staying warm and resting when you first come down with a cold or the flu helps your body direct its energy toward the immune battle. This battle taxes the body. So give it a little help by lying down under a blanket to stay warm if necessary.

TAKE CARE !!
AMBADNYA !!!



http://www.webmd.com/cold-and-flu/cold-guide/cold-remedies







नवरा बायकोच नातं

आज सकाळी दिवाळी फराळ करताना करंजी पाहिली आणि व.पुं.काळेंची "करंजी " ही कथा आठवली.
यात घटस्फोटासाठी इच्छुक नवरा बायकोच्या तक्रारी वकिलाला सांगत असतो.आणि वकील त्याला घटस्फोटापासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असतो. दिवाळीचे अनेक संदर्भ यात येतात. पण सगळ्यातमहत्वाचा सुखी संसाराचा मंत्र व.पु.करंजीच्या माध्यमातुन ,रुपका मधुन देतात .ते त्या वैतागलेल्या नवर्याला म्हणतात ,
"नवरा बायकोचं नातं हे करंजी सारख असावं,गोड आणि खुसखुशीत .नवरा म्हणजे करंजीचं वरचं आवरण आणि बायको म्हणजे आतील गोड सारण ..!!
संसारात कितीही अडचणी आल्या,
काही वाद झाले तरी ते बाहेरच्या आवरणानं झेलायचे, मनस्तापाचं
काटेरी चाक स्वत:च्या अंगावर फिरवुन घ्यायचं, तापत्या तुपात स्वत:ला पोळुन घ्यायचं ,मात्र कुठेही आतल्या सारणाला धक्का लागता कामा नये,सारण अबाधित
राहिलं पाहिजे ,तरच गोड करंजी खायला मिळते "
अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दात नवरा बायकोच नातं एव्हढ्या ताकदीने उभं
करणारे आणि संसार सुखी करण्याचे मंत्र देणारे व.पु.ग्रेटच !!
          

Sunday, October 5, 2014

Nandaramna

Sometimes Questions arises in our mind .......
Beautiful Answer by our Beloved Dharmawaran shri Yogindrasinh Joshi has Mentioned in his Notes on Facebook.
I have copied.
& here it is for all my friends.

दोन्ही हात उंचावून श्रद्धावान अत्यन्त प्रेमाने सद्‌गुरुला, भगवंताला पुकारतात. यात तसे पाहिले तर श्रद्धावानाचे सर्वस्व आहे. प्रेम, सेवा, शारण्य हे तीनही भाव यातआहेतच, त्याचबरोबर विरह, स्मरण, सामीप्याची प्रार्थना, समर्पण आणि जयजयकार हे भावदेखील यात आहेत.
'आई, माझे तुझ्याशिवाय दुसरे कुणीही नाही, फक्त तूच माझी हितकर्ती आहेस. मला तू हवी आहेस.' आईच्या विरहाने, आईच्या आठवणीने लहान मूल जसे आईला 'माझ्याजवळ येऊन मला उचलून घे गं' हे सांगताना दोन्ही हात उचलून आईला साद घालते, आईकडे पाहते; तसे 'प्रेमाने माझा उद्धार कर' अशी प्रार्थना श्रद्धावान सद्‌गुरुमाऊलीकडे करत आहे.
हा भक्तहृदयातून उठणारा टाहो आहे, ही श्रद्धावानाची सदैव-साद-स्थिति म्हणजेच भगवंताला सतत साद घालण्याची व्याकुळता आहे.
हात म्हणजे कार्यशक्ती. मी दोन्ही हात परोपकारासाठी म्हणजेच सेवेसाठी उचलत आहे. भगवंताने दिलेल्या शक्तीचा वापर कधीही विध्वंसासाठी किंवा परपीडेसाठी करणार नाही तर सदैव विकासात्मक पवित्र कार्यासाठीच करणार हा भगवंतासमोर केलेला निर्धार यात आहे.
मी जसा आहे तसा तुला शरण आहे हा अर्थही आहेच. मी सर्व सोडून तुझ्याकडे आलो आहे, सारा भार तुझ्यावर सोपवला आहे, आता माझे जे काही व्हायचे ते तुझ्या इच्छेने होवो हा समर्पणभावदेखील आहे. हा बिभीषणाचा भाव आहे.
दोन्ही हात उंचावून जेव्हा श्रद्धावान सद्‌गुरुचा, भगवंताचा जयघोषही करतात. 'रामो राजमणि: सदा विजयते' या सिद्धान्ताचा उद्‌घोषही येथे आहे. श्रद्धावान अशा प्रकारे  रामाला शरण जाणाऱ्या बिभीषणाच्या मार्गावरून सदैव चालण्याचा निर्धार करतात.

॥ अंबज्ञ ॥ ॥ अंबज्ञ ॥ ॥ अंबज्ञ ॥
Yogindrasinh Joshi.


First gear of life

Very nice message!!!
Pls. take out time and read it carefully... 

गाडी चालवायची म्हणजे
क्लच, ब्रेक आणि गिअर बरोबर
झटापट ही आलीच.
बदलत जाणारे गिअर्स आणि
त्यामुळे बदलत जणारा गाडीचा
वेग यावरून एक कल्पना सुचली.

गाडी सुरु झाल्यावर तिला पुढे
नेण्यासाठी आपण 'फर्स्ट गिअर'
टाकतो.
हा 'फर्स्ट गिअर' म्हणजे
आपल्या जवळची सख्खी माणसं. आई बाबा,जोडीदार, मुलं,जवळचे मित्र...
हा पहिला गिअर टाकल्याशिवाय गाडी पुढे जात नाही.
मुंगीच्या गतीने
का होईना गाडी न थांबता 'पुढे' जात राहिली पाहिजे हा पहिला 'संस्कार' फर्स्ट गिअर करतो.
इथे आपल्याला unconditional प्रेम मिळतं,
सुरक्षितता मिळते.
गाडी 'बंद पडणार नाही'
याची पुरेपूर काळजी हा फर्स्ट

गिअर घेतो.
परंतु गाडी'पळण्यासाठी'इतका कमी वेग
पुरेसा नसतो.

आपण गाडीचा वेग वाढवतो. सेकंड गिअर
टाकतो ! इथे आपल्याला घराबाहेरचं विश्व
कळू लागतं. शाळा,कॉलेज, पुस्तकं, मिडिया,
आपले छंद,विविध कला..... बाहेरचं जग
किती मोठं आहे
आणि माहिती आणि ज्ञानामुळे हेच मोठं जग
किती जवळ आलं आहे, हे कळतं.
समोर
पसरलेला संधीचा आणि प्रगतीचा रस्ता आता आपल्याला खुणावू
लागतो.

गाडीचा वेग
आणखी वाढवण्यासाठी आपण आता थर्ड गिअर
टाकतो. गाडीचा वेग आणखी वाढतो. हा थर्ड
गिअर म्हणजे आपला नोकरी धंदा आणि त्यातून
मिळणारं विना-खंडित उत्पन्न. गरजे पुरतं घर,
कपडा लत्ता, भांडीकुंडी,पहिला फ्रीज,
पहिला टीव्ही, प्रसंगानुरूप हॉटेलिंग,
सणासुदीला नवीन कपडे,चांगले मार्क मिळाले
तर मुलाला/मुलीला सायकल वग
वगैरे थर्ड गिअरमध्ये येतं. या गिअरमध्ये
आपण बऱ्यापैकी स्थिरावतो. गाडीचा वेग
ना कमी ना जास्त. सेकंड मधून थर्ड गिअर
मध्ये आलो तेव्हा वेग जास्त होता हे मान्य,
पण आता तोच वेग कमी वाटू लागतो.

आपण आता 'फोर्थ गिअर' टाकतो. गाडी सुसाट
निघते. मनात आलं की हॉटेलिंग-शॉपिंग-
मल्टीप्लेक्स, गाडी, latestमोबाईल, 1 BHK
मधून 2 BHK, laptop,ह्याउ नि त्याउ..!
या वेगाची नशाच काही और! गम्मत म्हणजे

आपण पाचव्या गिअर मध्ये कधी जातो हे
आपल्यालाच कळत नाही...आता गाडी अक्षरश:
तरंगत जात असते. हजार... लाख... कोटी...
खर्व.... निखर्व......रुपये नाहीत, गरजा!
हा 'वेग'खूप आनंददायी असतो.
आपल्या गाडीच्या आड कोणी येऊ नये,
'लाल'सिग्नल लागू नये असं मनोमन वाटत
असतं.... आणि... आणि.....आणि..... ‘नियती’
नावाचा एक स्पीडब्रेकर समोर येतो. तो खूप
प्रचंड असतो.
गाडी थांबवण्यावाचून आता पर्याय नसतो.

पाच.. चार.. तीन..दोन...एक....खाट खाट गिअर
मागे टाकत आपण आता neutral वर येतो.
कचकावून ब्रेक लागतात. गाडी पूर्ण थांबते.
आपल्या अंगाला खूप मोठा झटका बसतो.
पाचव्या गिअर मध्ये गाडी असताना आपण
कधी काळी फर्स्ट गिअर देखील
टाकला होता याचा विसर पडला होता.
वरचा प्रत्येक गिअर
टाकताना त्या गिअरची अशी एक
मानसिकता होती...आज एक एक गिअर मागे
येताना हे पहिल्यांदा जाणवलं.
गाडी आता पूर्ण थांबली आहे.
गाडी आता पुढे न्यायची आहे..
मला सांगा कुठला गिअर टाकाल ?
सुसाट वेगाचा पाचवा गिअर ?
की मुंगीच्या वेगाचा पण गाडी चालू ठेवेल
असा 'फर्स्ट गिअर' ?

आयुष्यात जेव्हा पराभवाचे, निराशेचे क्षण
आले होते, तेव्हा कोण होतं तुमच्या जवळ?
कोणी दिला होता आधार ?आठवून पहा.
प्लाज्मा टीव्हीने ? EMIभरत विकत
घेतलेल्या extra बेडरूमने?
नव्या कोऱ्या गाडीने ? 'You are promoted'
असं लिहिलेल्या कागदाने ?
मी सांगतो कोण होतं तुमच्याजवळ.
तुम्हाला आधार दिला होता फर्स्ट गिअरने !
आर्थिक
अडचणीच्या वेळी आपल्या उशाखाली नोटांचं
पुडकं हळूच ठेवून जाणारे बाबा, निरागस
प्रश्न विचारून
आपल्या चिंता घालवणारी आपली चिमुरडी मुलं,
'होईल सगळं व्यवस्थित'म्हणत डोक्याला बाम
चोळून देणारी'बायको' नावाची मैत्रीण,
बाहेरचं खाऊन त्रास होऊ नये म्हणून पहाटे
उठून पोळी भाजीचा डबा बनवणारी आई,
'त्या'काळात आपल्या frustration
चा ‘कान’होणारे आणि योग्य सल्ला देणारे
'जिवाभावाचे मित्र' हे सगळे हे सगळे फर्स्ट
गिअर तुमची गाडी ओढत नव्हते का ?

Don't get me wrong. माझा चवथ्या-
पाचव्या गिअर्सना आक्षेप नाही.
त्या वेगाची धुंदी जरूर अनुभवूया.
त्याचा आनंदही उपभोगुया.
फक्त
त्यावेळी आपल्या'फर्स्ट गिअर्स' चं स्मरण
ठेवूया.
आयुष्याचा वेग मधून मधून थोssडा कमी करत
पुन्हा एकदा फर्स्ट गिअरवर येऊया.  Enjoy life!!!

Thursday, October 2, 2014

Dasra story

विजयादशमी

विजयादशमी. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. सीमोल्लंघनाचा दिवस. सत्याने असत्यावर विजय मिळवल्याचा दिवस. अश्विन शुद्ध दशमीच्या या दिवशी नवरात्रोत्सवाची सांगता होते. प्रभू श्रीरामचंद्रांनी याचदिवशी रावणावर विजय मिळवला होता. अज्ञातवासात असलेल्या पांडवांनी शमीच्या झाडाच्या ढोलीतून याचदिवशी आपली शस्त्रं बाहेर काढली होती आणि कौरवांचा पराभव केला होता. कौत्साने याच दिवशी अयोध्येतील लोकांना सोनं वाटलं होतं. छत्रपती शिवरायांना याच दिवशी भवानीमातेने तलवार अर्पण केली होती. अशा अनेक कथा विजयादशमीशी संबंधित आहेत. आणि म्हणूनच या दिवसाला एका पूर्ण मुहूर्ताचा मान आहे.

रावणाने सीतेचं अपहरण केल्यावर प्रभू श्रीरामचंद्रांनी लंकेवर स्वारी केली होती. तेरा दिवस तुंबळ युद्ध चालू होतं. त्या तेरा दिवसांत रावणाचे खंदे वीर एक-एक करून मारले गेले. त्याचे कुटुंबीयही युद्धात कामी आले होते. तेराव्या दिवसापर्यंत तो मुलगा मेघनाद, भाऊ कुंभकर्ण आणि इतर अनेक लोकांना गमावून बसला होता. अखेर अश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी रामरावण युद्धात आमनेसामने आले आणि रामचंद्रांनी रावणाच्या पोटातील अमृतकुंभ फोडून त्याचा वध केला. सत्याने असत्याचा, प्रकाशाने अंधाराचा, न्यायाने अन्यायाचा पराभव केला.

चौदा वर्षांचा वनवास भोगल्यावर एक वर्षाचा अज्ञातवास भोगण्यासाठी पांडव विराटाघरी राहिले होते. तेव्हा अज्ञातवास सुरू होण्याआधी त्यांनी आपली शस्त्रात्रं विराटनगराबाहेरच्या एका शमीच्या झाडाच्या ढोलीत लपवून ठेवली. अज्ञातवास संपत आला असताना कौरवांना पांडव विराट राज्यात असल्याची शंका आली. त्यांनी पांडवांचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी विराट राज्यावर चढाई केली. तेव्हा अर्जुनाने शमीच्या झाडाच्या ढोलीतून आपलं गांडीव धनुष्य काढून कौरवांचा एकहाती पराभव केला. आणि म्हणूनच दसर्‍याच्या दिवशी शस्त्रास्त्रांची पूजा करण्याची प्रथा आहे.

दसर्‍याला आपट्याची पानं सोनं म्हणून देण्याच्या प्रथेमागेही एक कथा आहे. देवदत्त ऋषींचे पुत्र कौत्स ऋषी हे महर्षी विश्वामित्रांचे शिष्य होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते विश्वामित्रांकडे गेले आणि त्यांनी विश्वामित्र महर्षींना गुरुदक्षिणा मागण्याची विनंती केली. विश्वामित्रांनी या गोष्टीला नकार दिला. कौत्स हटूनच बसले. शेवटी नाईलाजाने विश्वामित्र म्हणाले, ‘वत्सा, मी तुला चौदा विद्या शिकवल्या. त्या प्रत्येक विद्येसाठी गुरुदक्षिणा म्हणून तू मला एक कोटी सुवर्णमुद्रा दे.’ एवढी गुरुदक्षिणा देणं कौत्सांना शक्य नव्हतं. त्यामुळे ते मदतीची याचना करायला रघुराजाकडे गेले. रघुराजा म्हणाला, ‘मी नुकताच विश्वजीत यज्ञ केला. त्यात केलेल्या दानधर्मामुळे माझ्याकडे आता एवढ्या सुवर्णमुद्रा शिल्लक नाहीत. पण आलेल्या याचकाला परत पाठवण्याचं पातक माझ्या हातून मी घडू देणार नाही. आपण तीन दिवसांनी या. तोपर्यंत मी मुद्रांची व्यवस्था करून ठेवतो.’ कौत्स ऋषी गेल्यावर त्याने सुवर्णमुद्रांसाठी इंद्राला विनंती केली. मुद्रा न दिल्यास युद्धाला तयार राहण्याचा इशाराही दिला. हा इशारा ऐकून इंद्राने कुबेराला अयोध्येवर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडण्याची आज्ञा दिली. इंद्राच्या आज्ञेवरून कुबेराने अयोध्येवर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला. रघुराजाने त्या सुवर्णमुद्रा कौत्सांना आणि कौत्सांनी त्या मुद्रा विश्वामित्रांना दिल्या. विश्वामित्रांनी त्यातील १४ कोटी मुद्रा घेऊन बाकीच्या कौत्सांना परत केल्या. कौत्स त्या मुद्रा घेऊन रघुराजाकडे परत गेले, पण रघुराजाने दिलेलं दान परत घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्या उरलेल्या मुद्रा कौत्सांनी आपट्याच्या झाडाखाली ठेवल्या आणि लोकांना त्या घ्यायला सांगितलं. तेव्हापासून आपट्याच्या झाडाची पानं सोनं म्हणून वाटण्याची पद्धत आहे.

Wednesday, October 1, 2014

Jokes

ट्रॉफीक पोलिस - 100 रूपये दे आणि निघ
मुलगा - सत्यमेव जयते पुन्हा सुरू होतय 5 तारखेला सकाळी 11 वाजता नक्की बघा
पोलिस - ठिक आहे मग 500 ची पावती फाडा
मुलगा - काय साहेब गम्मत केली..
तुम्ही तर सिरीअस झालात.
शाळेत आपल्या आदरणीय शिक्षकांनी काही मुलांना केलेल्या काही शिक्षा आठवल्या कि पुन्हा एकदा त्यांचे आभार मानावेसे वाटतात. कारण त्यांतून त्यांनी काय शिकवले ते बघा.*
1) बाकावर उभे राहा:- आपली पातळी उंचावा. मोठे स्वप्न बघा. (big Picture)
2) हात वर करून उभे रहा:- उच्च धेय्य ठेवा, उंची गाठा. (Aim high)
3) भिंतीकडे तोंड करून उभे रहा:- आत्मपरीक्षण. (Introspection)
4) वर्गाबाहेर उभे रहा:- चार भिंतीतून बाहेर या, जग बघा. (See the world)
5) गुढगे टेका:- विनम्र व्हा (Humble)
6) मुर्गा बनो:- शारीरिक सहनशक्ती वाढवा. (Physical endurance)
7) फळा पुसा:- झाले गेले विसरा आणि नव्याने सुरुवात करा. (Clean slate)
8) तोंडावर बोट ठेवा:- (स्वत:च्या) बाता कमी मारा (boast less)
9) कान धारा:- जास्त ऐका. (listen more)
10) वाका, अंगठे धरून उभे रहा:- लवचिक बना (Flexible)
11) हा धडा दहा वेळा लिहा:- अचूकतेसाठी सराव करा (Practice for perfection)
12) शाळा सुटल्यावर थांबा:- जीवघेण्या स्पर्धेत उतरू नका, विशेष व्यक्ती बना! (No rat race! Be exclusive!)
ज्या मुली म्हणतात की "माझ्यामागे खुप मुल फिरतात"
त्यांनी लक्षात घ्यायला पाहीजे, की कमी किँमतीच्या वस्तुनकडे नेहमीच जास्त Customer आकर्षित होत असतात..
हा Economics चा नियम....😂😂😂😂😂😂