आज सकाळी दिवाळी फराळ करताना करंजी पाहिली आणि व.पुं.काळेंची "करंजी " ही कथा आठवली.
यात घटस्फोटासाठी इच्छुक नवरा बायकोच्या तक्रारी वकिलाला सांगत असतो.आणि वकील त्याला घटस्फोटापासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असतो. दिवाळीचे अनेक संदर्भ यात येतात. पण सगळ्यातमहत्वाचा सुखी संसाराचा मंत्र व.पु.करंजीच्या माध्यमातुन ,रुपका मधुन देतात .ते त्या वैतागलेल्या नवर्याला म्हणतात ,
"नवरा बायकोचं नातं हे करंजी सारख असावं,गोड आणि खुसखुशीत .नवरा म्हणजे करंजीचं वरचं आवरण आणि बायको म्हणजे आतील गोड सारण ..!!
संसारात कितीही अडचणी आल्या,
काही वाद झाले तरी ते बाहेरच्या आवरणानं झेलायचे, मनस्तापाचं
काटेरी चाक स्वत:च्या अंगावर फिरवुन घ्यायचं, तापत्या तुपात स्वत:ला पोळुन घ्यायचं ,मात्र कुठेही आतल्या सारणाला धक्का लागता कामा नये,सारण अबाधित
राहिलं पाहिजे ,तरच गोड करंजी खायला मिळते "
अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दात नवरा बायकोच नातं एव्हढ्या ताकदीने उभं
करणारे आणि संसार सुखी करण्याचे मंत्र देणारे व.पु.ग्रेटच !!
Friday, October 24, 2014
नवरा बायकोच नातं
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment