- First, exercise stimulates enzymes that help move LDL from the blood (and blood-vessel walls) to the liver. From there, the cholesterol is converted into bile (for digestion) or excreted. So the more you exercise, the more LDL your body expels.[6]
- Second, exercise increases the size of the protein particles that carry cholesterol through the blood.
Friday, November 20, 2015
want to manage your cholesterol ??
हृदय
हृदयविकार
धमन्यांमध्ये अडथळे तयार होण्याची कारणं, कोलेस्टेरॉल,हृदयधमनीची दुखापत आणि रक्तातील गुठळ्या, बेताल हृदयस्पंदन, हृदयधमनीला आकुंचनाचा झटका म्हणजे हृदयधमन्यांच्या विकारामुळे होणारा हृदयविकार.आपलं हृदय हे छातीच्या पिंज-यात , मध्यभागी किंचित डाव्या बाजूला सरकलेलं असतं हे आता बहुतेक सर्वांना माहिती आहे. शरीरासाठी रक्त पुरवण्याचं म्हणजेच रक्त ‘पंप’ करण्याचं काम हृदय करतं. तसंच, स्वत:च्या पोषणासाठीही हृदय रक्त पंप करत असतं. प्राणवायू हे हृदयाचं अन्न आहे आणि ते रक्तातून पुरवलं जातं. जोपर्यंत पुरेसं रक्त हृदयाकडं जात असतं तोपर्यंत हृदयाचं काम सुरळीत चालू असतं. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या शुध्द रक्तवाहिन्यांना हृदयधमन्या असं म्हणतात. या हृदय धमन्यांच काम सुरळीत चालू असतं. तोपर्यंत त्यातून रक्ताचा पुरेसा पुरवठा होत राहतो आणि हृदयाचं कामही सुरळीत चालू राहतं. काही कारणानं हा रक्तपुरवठा अपुरा पडू लागला तर छाती, मान, पाठ, हात यापैकी एका किंवा अनेक ठिकाणी वेदना होऊ लागतात आणि त्याल अंजायना पेक्टोरीस (Angina Pectoris) असं म्हणतात.
जर काही कारणानं हृदयाला होणारा रक्तपुरवठा पूर्ण बंद पडला किंवा फार मोठ्या प्रमाणात बंद पडला तर झटक्यानं हृदय बंद पडतं. त्याला हृदयविकाराचा झटका असं म्हणतात.
तीन प्रमुख धमन्यांमधून हृदयाला रक्त पुरवल जातं. उजव्या हृदयधमनीतून हृदयाच्या उजव्या बाजूला रक्तपुरवठा होतो, तर डाव्या बाजूला रक्तपुरवठा करण्यासाठी दोन धमन्या असतात. पुढची डावी उतरती धमनी ही हृदयाच्या पुढच्या बाजूला रक्त पुरवते आणि वळसा घेऊन पाठीमागे जाणारी हृदयधमनी ही हृदयाच्या मागच्या बाजूला रक्तपुरवठा करते. या प्रमुख हृदयधमन्यांना पुढे अनेक फाटे फुटतात आणि ते सर्व हृदयाला रक्तपुरवठा करतात. यापैकी एखाद्या धमनीत काही अडथळा निर्माण झाला तर तिच्यातून वाहणाऱ्या रक्ताचं प्रमाण कमी होतं आणि हृदयाला रक्त अपुरं पडू लागतं.
या धमन्यांमधून होणा-या रक्तपुरवठ्यात अडथळा कशामुळे येऊ शकतो?
हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची शवचिकित्सा केल्यावर त्यांच्यापैकी बहुतेकांच्या हृदयधमन्यांमध्ये अडथळे असल्याचं आढळून येतं. (या अडथळ्यांना प्लाक - Plaque, ऍथेरोस्क्लेरॉसिस - Athero Sclerosis, किंवा आर्टिरिओ स्क्लेरॉसिस - Arteri Osclerosis असं म्हणतात) हे अडथळे हे छातीत दुखण्याचं. हृदयाला रक्त कमी पडण्याचं आणि हृदयविकाराच्या झटक्याचं मुख्य कारण असलं पाहिजे असा निष्कर्ष यावरून काढला गेला.
जगातील आणि भारतातील या पुस्तकात हृदयविकाराच्या कोणत्या प्रकारचा विचार केला आहे. हृदय, हृदयविकार, हृदयविकाराचा झटका, हृदय शस्त्रकिया हे आहेत. ‘हार्ट अटॅक’ (Heart Attack), हा शब्द तर मराठीच वाटावा इतका आपल्या भाषेत रूळला आहे.
एकंदरीत ‘हृदयविकार’ या रोगाला आपण टरकून असतो. आपल्याला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला कधीही हृदयविकार होऊ नये अशी आपली मनोमन इछा असते. कारण हृदयविकार झाला तर अचानक झटक्यानं किंवा थोड्याच काळात म्रुत्यू ओढवणार अशी भीती आपल्या मनात असते. हृदयविकार म्हणजे आकस्मिक मृत्यू, आज नाहीतर थोड्याच दिवसात, अशी सर्वसाधारणपणे या रोगाबाबतची समजूत आहे अन् ती फारशी चूकीची आहे असंही नाही. दरवर्षी जगभरात मृत्यू पावणाऱ्यांमध्ये हृदयविकारानं मरणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे.
कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, धूम्रपान, इतर उत्तेजक पदार्थ, स्थूलत्व आणि बैठी जीवनशैली, आनुवंशिकता, मधुमेह, मानसिक ताण, मानसिक एकटेपणा हे सर्व हृदयविकाराच्या द्रुष्टीने धोक्याचे घटक आहेत.
हृदयधमनीविकाराला (आणि त्यामुळे होणा-या हृदयविकाराला) कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत होतात ते आपण पाहिलं. हृदयविकार टाळायचा असला तर कोलेस्टेरॉलची पातळी, धमनीच्या अस्तराला होणारी दुखापत, धमनीला येणारे पेटके आणि रक्तात तयार होणाऱ्या गुठळ्या या गोष्टी नियंत्रणात हव्यात. तेव्हा या गोष्टींवर परिणाम करणारे, त्यांना कारणीभूत ठरणारे घटक म्हणजेच धोक्याचे घटक कोणते असतात ते आपण पाहू या.
कोलेस्टेरॉल
आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणाचं काम यकृत करत असतं. आपल्या रोजच्या दैनंदिन आहारातल्या घटकामधून यकृत कोलेस्टेरॉल बनवत असतं. आणि यकृताची ही क्षमता ब-याच अंशी आनुवंशिक असते. त्यामुळे काही लोकांची कोलेस्टेरॉल पातळी त्यांनी कितीही संपृक्त चरबीयुक्त पदार्थ खाल्ले तरी फारशी वाढलेली आढळत नाही. तर याउलट काही लोकांच्या आहारात संपृक्त चरबीचा फारसा भाग नसतानासुध्दा त्यांची कोलेस्टेरॉलची पातळी वाढत गेलेली दिसते.
आपल्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी प्रमाणात ठेवायची असली तर आहारातून कोलेस्टेरॉल न खाणं किंवा कमीत कमी खाणं हा एक त्याचा मार्ग आहे. आपल्या आहारातील काही पदार्थामधून आपल्याला थेट कोलेस्टेरॉलच मिळत असतं. उदा. अंड्यातला पिवळा बलक. हा बलक जवळ जवळ संपूर्ण कोलेस्टेरॉलचा बनलेला असतो. तसचं लोणी, साय, चीज (Cheese), तूप इ. पदार्थांमधून आपल्याला कोलेस्टेरॉल आणि संपृक्त चरबी मिळते जिचं रूपांतर पुढे Cholesterol मध्ये होतं. कोलेस्टेरॉलची पातळी कमी ठेवायची असली तर हे पदार्थ आहारातून गाळणं आवश्यक आहे.
आपल्या आहारातील तेल, तूप, लोणी या आणि अशा स्निग्ध पदार्थापैकी कोणते संपृक्त चरबीचे आहेत हे बघण्याचा साधा मार्ग म्हणजे हे पदार्थ किती तापमानाला गोठतात, ते बघावं. सर्वसाधारण तापमानाला म्हणजे हे पदार्थ किती तापमानाला जे पदार्थ घट्ट होतात ते संपृक्त चरबीचे असतात असं म्हणायला हरकत नाही. आपल्या रोजच्या स्वयंपाकातलं शेंगदाणा तेल, करडईच तेल किंवा सोयाबीन तेल ही आणि अशी वनस्पतिजन्य तेल घरातल्या तापमानात द्रवस्थितीत असतात. आणि ती असंपृक्त चरबीची असतात. पण पामतेल व खोबरेल तेल यांच्यात मात्र बऱ्याच प्रमाणात संपृक्त चरबी असते.
उच्च रक्तदाब
उच्च रक्तदाबाखाली वाहणारं रक्तं हे अधिक दाबाखाली वाहात असल्यामुळे धमनीच्या भिंतीवर अधिक जोरात धडका देतं आणि त्यामुळे धमनीच्या भिंतींना इजा पोचण्याची शक्यता असते. अशी इजा पोहचली की त्या ठिकाणी कोलेस्टेरॉलचा थर साचून अडथळा तयार होऊ लागतो.
अडथळा तयार झाल्यामुळे धमनी चिंचोळी होते, ती चिंचोळी झाल्यामुळे, रक्तप्रवाहाला मिळणारी वाट कमी झाल्यामुळे, रक्तप्रवाहाचा दाब आणखी वाढतो आणि ते आणखी जोरानं भिंतीवर धडका देऊ लागतं. असं एक दुष्टचक्र उच्च रक्तदाबामुळे सुरू होतं.
स्थूलत्व आणि बैठी जीवनशैली: लठ्ठपणा आणि फारसे शारीरिक श्रम करावे न लागणारी दैनंदिन राहणी असलेली जीवनशैली या गोष्टींचाही हृदयविकार होण्यात वाटा असतो. अशा लोकांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण इतरांपेक्षा जास्त असल्यांचं आढळून येतं.
हृदयविकाराच्या दृष्टीनं आणखी काही धोकादायक असे घटक आहेत की ज्यांच्यावर आपलं काहीही नियंत्रण असू शकत नाही. उदा. लिंग, वय, आनुवंशिकता, मधुमेह.
लिंग आणि वय: हृदयविकारानं मृत्यू येण्याचं प्रमाण ६५ वर्षांनंतर पुष्कळ जास्त असलं तरी एकूण मृत्यूंपैकी १/३ मृत्यू ६५ वर्षांपूर्वीच झालेले असतात. त्यातही हृदयविकारानं मृत्यू होण्याचं प्रमाण पुरूषांमध्ये जास्त आहे. असं आढळून आलेलं आहे की ३५ ते ४४ वर्षांच्या वयानंतर मात्र हे प्रमाण जवळ-जवळ सारखंच असतं. मेनोपॉज पूर्वी (म्हणजे मासिक पाळी बंद होण्यापूर्वी) स्त्रियांच्या रक्तात चांगल्या कोलेस्टेरॉलचं म्हणजे HDL Cholesterol चं प्रमाण जास्त असत, आणि त्यामुळे बहुधा त्यांचा हृदयविकार कमी होत असावा.
आनुवंशिकता: आपल्या रोजच्या आहारातून किती कोलेस्टेरॉल तयार होतं हे आपल्या यकृताच्या कामगिरीवर अवलंबून असतं. काही लोकांना आनुवंशिकत:च या दृष्टीनं कार्यक्षम असं यकृत मिळालेलं असतं तर काही लोकांचं यकृत पुरेसं सक्षम नसतं. या बाबतही आपल्या हातात करण्याजोगं काहीच नसतं.
मधुमेह:हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू येण्याचं प्रमाण मधुमेहींच्यामध्ये इतर लोकांपेक्षा जास्त असतं. विशेषत: लहान वयात ज्यांना मधुमेह झालेला असतो त्यांच्या मध्ये हे प्रमाण वाढलेलं आढळून येतं. मधुमेह हा ब-याच वेळा आनुवंशिक असतो. त्यामुळे तो टाळता येत नाही. पण योग्य आहार, व्यायाम यांसारख्या गोष्टींनी तो आटोक्यात मात्र ठेवता येतो. हृदअपु-या याला होणारा रक्तपुरवठा हृदयधमनीविकारामुळे कमी झालेला असला की हृदयविकार होतो आणि काही कारणानं तो पूर्णपणे बंद पडला किंवा बराच काळ अपुऱ्या प्रमाणात सुरू राहिला तर हृदयविकाराचा झटका येतो हे आपण पाहिलं.
हृदयधमनी विकारात हृदयधमन्यांमध्ये अडथळे निर्माण झालेले असतात आणि त्यामुळे त्या चिंचोळ्या होऊन रक्ताचा प्रवाह कमी झालेला असतो. याशिवाय काही वेळेला अडथळ्यांमधून रक्तस्त्राव होऊन रक्ताच्या गुठळ्या प्रवाहात येतात आणि चिंचोळ्या भागात त्या अडकून बसून रक्तपुरवठा बंद पडतो. पण कधी कधी खुद्द हृदयधमनीलाच पेटका येऊन ती एकदम चिंचोळी होते आणि अशा तात्पुरत्या चिंचोळ्या झालेल्या धमनीतही अडथळ्याच्या ठिकाणी रक्तप्रवाह पूर्णपणे बंद पडून हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. म्हणजे, हृदयविकाराला (कार्डिऍक हार्ट डिसीजच) कारणीभूत कोण? तर हृदयधमनी विकार आणि हृदयधमनी विकाराला कारणीभूत असलेल्या गोष्टी म्हणजे एकतर कोलेस्टेरॉलचं धमनीच्या आतल्या भागावर बसणारं किटण (याला कारण म्हणजे रक्तातील कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी), दुसरं म्हणजे हृदयधमन्यांना येणारे पेटके, आणि तिसरं म्हणजे हृदयधमनीतील अडथळ्यांमधून रक्तस्त्राव होऊन बाहेर सुटणाऱ्या रक्ताच्या गुठळ्या. या तिन्ही गोष्टींना कारणीभूत असणाऱ्या बाबी म्हणजे, वाढीव कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, निकोटिन असलेल्या पदार्थांचं सेवन, वाढतं वय, आनुवंशिकता, आहार, मधुमेह अशा असतात हे आपण पाहिलं. यापैकी काही बाबींवर आपलं नियंत्रण असूच शकत नाही हे खरं असलं तरी काही बाबी मात्र आपण प्रयत्नानी आटोक्यात ठेवू शकतो. शिवाय या सगळ्या घटकांच्या जोडीला आणखी दोन घटक बरेच महत्त्वाचे असल्याचं अलीकडे लक्षात येऊ लागलं आहे. एक म्हणजे मानसिक ताणतणाव आणि दुसरा म्हणजे एकटेपणा किंवा एकाकीपणा.
मानसिक ताण
मानसिक ताण मोजण्याचं साधन आज उपलब्ध नसलं, तरी सध्याच्या आधुनिक जगामध्ये, आपल्या आधुनिक दिनक्रमामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक मानसिक तणावाचे, ताणाचे प्रसंग आपल्या रोजच्या आयुष्यात घडत असतात. यांच्यामुळे मनावर प्रचंड ताण पडतो असं नाही पण सौम्य प्रमाणातला ताण मात्र आपल्या जीवनामध्ये मनावर बराच काळ असतो तर काही काही वेळा अचानक अतिशय मोठा ताणही येण्याची शक्यता असते.
मानसिक ताणाखाली वावरत असताना आपली ‘फाईट ऑर फ्लाईट’ यंत्रणा कार्यान्वित झालेली असते आणि ती दीर्घकाळ कार्यरत राहिल्यामुळे, धोका टाळण्यासाठी म्हणून कार्यरत होणारी ही यंत्रणा नुकसानकारक एवढंच नव्हे तर प्रसंगी प्राणघातकही ठरू शकते. आपल्या हातापायांच्याच नव्हे तर हृदयातल्या धमन्याही आकुंचन पावू लागतात. रक्तात गुठळ्या होण्याची शक्यता वाढत जाते. कारण रक्तगोठण्याची क्रिया बराच काळ जलद चालू राहते. शरीराचे बरेच स्नायू या काळात आकुंचित होतात. या स्नायूंमध्ये पाठ, खांदे, मान यांतल्या मोठ्या स्नायूंबरोबरच हृदयधमन्यांमधले अरेखित स्नायूदेखील असतात. एवढंच नव्हे तर खुद्द हृदयातले (Fibres) असतात.
हल्लीच्या आधुनिक युगात कुठल्याच प्रकारचा ताण नसलेलं आयुष्य जगणं ही अशक्य गोष्ट आहे. विशेषत: शहरी धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जीवनात तर आता अशक्यच गोष्ट झाली आहे पण शक्यतो कमी ताण येईल असं बघणं आणि आलेला ताण योग्य रीतीनं हाताळणं हे मात्र आपण करू शकतो. ताणाच्या प्रसंगांना योग्य रीतीनं तोंड द्यायचं आणि नंतर मनावराचा ताण जाणीवपूर्वक हलका करायचा हे हृदयविकाराच्या दृष्टीनं महत्त्वाचं असल्याचं आता लक्षात येऊ लागलेलं आहे.
पथ्यं
पण पुष्कळदा या गोळ्या आपण कुठे ठेवल्या आहेत ते आपल्या जवळच्या किंवा नेहमी बरोबर असलेल्या व्यक्तीला मात्र त्यांनी सांगितलेले नसतं. त्यामुळे त्रास होऊ लागला किंवा हृदयविकाराचा झटका आला तर बरोबर असलेल्या किंवा घरात असलेल्या व्यक्ती डॉक्टरांशी संपर्क साधण्याची, रूग्णाला हॉस्पीटलमध्ये नेण्याची धावपळ करू लागतात आणि तातडीनं जे औषध द्यायला हवं ते मात्र दिलं जात नाही. हे औषध द्यायला हवं हे पुष्कळांना माहीत नसतं. तर ते कुठे ठेवलेलं आहे हे कित्येकांना माहीत नसतं. हृदयविकाराचा झटका आलेला रुग्ण काही वेळा पूर्ण बेशुध्द होतो तर काही वेळा बेशुध्द नसला तरी त्याचा एकदम शक्तीपात झाल्यामुळे तो बोलण्याच्या किंवा विचार करण्याच्या परिस्थितीत नसतो. त्यामुळे बरोबर किंवा जवळपास असलेल्यांनी त्याला ही तातडीची मदत करणं आवश्यक असतं. याचप्रमाणे या तातडिक गोळ्या एकाच ठिकाणी न ठेवता ठराविक ठिकाणी, त्या ठेवलेल्या असाव्या. आणि आपल्या घरातल्या सर्वांना, सहकाऱ्यांना, पुष्कळदा बरोबर असणाऱ्या मित्रांना या गोळ्यांचं महत्व आणि ठेवण्याचं ठिकाण सांगितलेलं असावं.
भात
| सूप, सार इ.
|
- अचानक मृत्यू -हृदय अचानक थांबते.
अंजायना -हृदयाच्या प्रमुख तीन रक्तवाहिन्यांपैकी कोणतीही एक किंवा अधिक रक्तवाहिनी बंद झाल्याने हृदयाच्या काही भागाला अपुरा रक्तपुरवठा होतो.
- हार्ट अटॅक - हृदयाची रक्तवाहिनी अचानक बंद झाल्याने हृदयाच्या काही भागाचा रक्तपुरवठा पूर्णपणे थांबतो व हृदयाचा तेवढा भाग निकामी होतो. छातीत तीव्र वेदना होतात, ज्या ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ सुरू राहतात. सोबत घाम, उलट्या, थकवा, अनेकदा पोटातील गॅसेस किंवा ऍसिडिटी, छातीतील स्नायुंचे दुखणे, किंवा काळजीमुळे काहीशा अशाच प्रकारचे दुखू शकते. तर कधी कधी हार्ट अटॅक पूर्णपणे वेदनारहित असू शकतो (सायलेंट इन्फार्क्शन), या कारणांनी रूग्ण व डॉक्टर दोघांनाही हा बरेचदा फसवतो.
- हृदयाचा पंप कमजोर होणे - श्रम करतांना दम लागणे, किंवा बिछान्यात झोपल्यावर दम लागणे, पायावर सूज.
- हृदयगती अनियमित - छातीत धडधड होते, नाडीचे ठोके अनियमित किंवा खूप वेगाने पडतात.
- हार्ट ब्लॉक - हृदयाची गती अचानक खूप कमी (३० - ४० प्रती मिनिट) अशी होते. चक्कर येणे, बेशुध्द पडणे.
- हिस्टरी (रोग्याने दिलेली माहिती, रोगाची शंका त्रासाचे वर्णन) छातीतले दुखणे इतर अनेक कारणांनी देखील निर्माण होऊ शकते. छातीतील प्रत्येक दुखणे हृदयरोगामुळे नसते.
- शारीरिक तपासणी - डॉक्टर द्वारा केलेली शारिरीक तपासणी
- इ. सी. जी. - आरामात झोपवून. अंजायन असतांना १०० इ. सी. जी. ही परीक्षा पुरेशी संवेदनाक्षम नाही. ३० टक्के अनेकदा रोग असूनही इ. सी. जी. मधे काहीही रोग हार्ट अटॅक असताना आढळत नाही. उलट इ. सी. जी. मधले काहीबदल - ८० टक्के असे आहेत, की ते हृदयरोगाशिवाय अन्य कारणांमुळेही होऊ शकतात. इ. सी. जी. ने रोगनिदान होत नसल्यास पुढील टेस्ट करतात.
| तपासण्या | क्षमता | किंमत (रू) |
| ट्रेडमिल टेस्ट - फिरत्या पट्ट्यावर चालवून | ५५ ते ७५ टक्के | ६०० |
| इको कार्डिओग्राफी - आरामात व चालवून | ८५ टक्के | १ ते २ हजार |
| स्ट्रेस थॅलियम टेस्ट - सायकल फिरवून | - | - |
| थॅलियम इंजेक्शन | ८० टक्के | ५ ते ८ हजार |
| कोरोनरी ऍजिओग्राफी - हृदयात नळी घालून | १०० टक्के | १५,०००/- |
रक्तवाहिन्यांचे फोटो. रक्तवाहिन्यांची रोग शोधण्याची संवेदनक्षमता १०० ऽ मानली जाते, पण हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे तात्कालिक आकुंचन (कोरोनरी स्पाजम) व हृदयाच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांचा रोग हे हृदयरोग असूनही कोरोनरी अँजिओग्राफी नॉर्मल येते.
डॉ. अभय बंग ह्यांच्या ’माझा साक्षात्कारी हृदयरोग’ ह्या पुस्तकात लिहिले आहे,
“माझ्या हृदयरोगाच्या निदानाने मला बरेच दिवस चकवलं होतं. याबद्दल मला फार विषाद व अपराधी भावना होती. एक दिवस ‘लासेन्ट’ या जगप्रसिध्द वैद्यकीय जर्नलचा वार्षिक विशेषांक हृदयरोगावर आला. या अंकाचे अतिथी संपादक हे हृदयरोगावरचे जागतिक तज्ञ मानले जातात. त्यांनी लिहिलं होतं, ‘गेल्या वर्षी मला जेव्हा हार्ट अटॅक आला, तेव्हा छातीत दुखत असूनही वैद्यकीय निदान करून मदत घ्यायला मी ७२ तास उशिर केला.
माझ्या या मूर्खपणामुळे मला फार अपराधी वाटत होतं. म्हणून मी गेल्या काही वर्षात हार्ट अटॅक आलेल्या जगातील प्रमुख १० हृदयरोग तज्ज्ञांना त्यांचा अनुभव विचारला. दहा पैकी दहाही तज्ज्ञांनी स्वतःचं वैद्यकीय निदान चुकवलं होतं, टाळलं होतं व उपचारात दिरंगाई केली होती’.”
Thursday, November 19, 2015
तुमची बायको / तुम्ही या निकषात बसता का ?
प्रत्येक नवरेमंडळीच्या कानावर
बायकोचा पडणारा...शब्द..!
खाली उत्तर वाचल्यास हसू येईल कारण गावंढळ असो वा
उच्च शिक्षीत सर्व बायकांचे डोके
देव एकाच फँक्टरीत बनवतो.
विचार केला का...
उत्तर...- मी आहे म्हणूनच टिकले दुसरी कोण असती तर केव्हाच सोडून गेली असती.
आता हसा..
पुढिल मेसेज जरा गमतीनं घ्या बर!
तुमची बायको आदर्श व गृहकृत्यदक्ष आहे हे तुम्ही कसे ओळखाल ?
भात चिगट झाल्यास...
तांदूळ नवीन होता
चपात्या कडक झाल्यास...
चांगले दळून दिले नाही
चहा गोड झाल्यास...
साखर जाड होती
व
तो पातळ झाल्यास...
दुधात पाणी जास्त होत
लग्नाला किंवा Function ला जाताना...
कुठली साडी नेसू?
मला चांगली साडीच नाही!
घरी लवकर आल्यास...
आज लवकर कसा आलात?
उशीर झाल्यास...
इतका वेळ कुठे होतात?
एखादी वस्तू स्वस्त आणल्यास...
तुम्हाला सगळे फसवतात...
महाग आणल्यास...
तुम्हाला कुणी आणायला सागितलं होतं?
जेवणाचं कौतुक केल्यास...
मी दररोजच करते
नावं ठेवल्यास...
तुम्हाला मेलं कौतुकच नाही कशाचं
एखाद काम केल्यास...
एक काम कधी धड करत नाही...
न केल्यास...
तुमच्या भरवशावर राहिले तर एकही काम होणार नाही...
बघा, तुमची बायको / तुम्ही या निकषात बसता का ?
स्वत: ची काळजी घ्या,
शांत रहाण्याचा प्रयत्न करा.
भिऊ नका, देव तुमच्या पाठिशी आहे...
so be silent
Namaskar....



