Wednesday, November 30, 2016

स्वभावाचा आणि आजारांचा संबध काय आहे ?

🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔

🌹🍃

स्वभावाचा आणि आजारांचा संबध काय आहे ?

     तर आता आपण जाणून घेऊ की मनाचा,भावनेचा,विचारांचा,स्वभावाचा कसा व कोठे परिणाम होतो......

१).अहंकारामुळे हाडामध्ये ताठरता निर्माण होते.

२).स्वत:चा हट्ट पुर्ण करण्याच्या सवयीमुळे पोटाचे विकार होतात.

३)अतिराग व चिडचिडेपणामुळे यकृताला व पित्ताशयाला हानी पोहचते.

४)अति ताण व चिंतेमुळे स्वादुपिंड खराब होतो.

५) भितीमुळे किडन्या व मुत्राशयाला हानी पोहचते.

६) कपटी वृत्तीमुळे गळ्याचे व फुफुसाचे रोग होतात.

७) आपलं तेच खर / मी म्हणेन तीच पुर्व दिशा,अशा अट्टाहसामुळे बध्दकोष्टता होते.

८) दु:ख दाृबुन ठेवल्याने फुफुस व मोठ्या आतड्यांची कार्यक्षमता कमी होते.

९)अधिरता,अतिआवेश,घाईगडबड अशा सवईमुळे ह्रदयाला व छोट्या आतड्याला हानी होते.

१०) स्वार्थी लोकांना सगळ्यात जास्त आजार होतात कारण त्यांना द्यायची इच्छा नसते त्यामुळ् शरीराला नको असलेली धातक द्रव्ये पण नीट बाहेर टाकली जात नाहीत व रोग निर्माण होतो.

११) प्रेम/प्रेमळपणा शांती व समाधान देऊन मनाला व शरीराला ताकद देतं.

१२) स्मित हास्य स्वतःलाच नाही तर समोरच्याला पण आनंदी बनवते.

१३) हासत खेळत राहिल्यास ताणतणाव कमी होतो.

तर मग आता आपल्या  रागावर, विचारांवर, भावनेवर, अहंकारावर, स्वार्थीपणावर, नियंत्रण   करण्याचा प्रयत्न करा. हासत, खेळत, आनंदी, समाधानी, सुखी, संतुष्ट रहा म्हणजे निरोगी व तंदुरूस्त बनाल.

🍃🌹

🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔

Wednesday, November 2, 2016

कथा बळीराजाची

कथा बळीराजाची

दिवाळीतील महत्वपूर्ण दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. शेतकऱ्यांचा राजा बळीराजा. या दिवशी बळीराजा पुन्हा आपल्या प्रजेला भेटायला येतो, अशी भावना आहे. या दिवशी ‘इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो’ असे म्हणतात. युद्धात जिंकता येत नाही म्हणून आर्याचा सेनापती असलेल्या वामनाने बळीराजाला कपटाने मारले, असे म्हटले जाते. वामन अवताराने तीन पावले जमीन मागून बळीराजाला पाताळात गाडले, ही कथा आपणास पुराणांमधून सांगितली जाते.

बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा, असे मानतात. त्यामुळेच आजही शेतकऱ्याला बळीराजा म्हटले जाते. दसऱ्याच्या दिवशी बळीराजाला कपटाने मारण्यात आले. वामनाने व त्याच्या सैन्याने या दिवशी बळीच्या प्रजेला प्रचंड लुटले. सोने, चांदी, धन-धान्य सर्वस्व लुटले. प्रजा हताश झाली. अशा वेळी बळीच्या शूर मुलाने बाणासुराने प्रजेला धीर देतांना सांगितले की, ‘आपला राजा मेला नाही. तो आपल्याला २१ दिवसांनी भेटायला येणार आहे.’ दसऱ्यानंतर २१ वा दिवस म्हणजे प्रतिपदा. या दिवशी बळीराजा आपल्या दु:खी व कष्टी प्रजेला भेटायला येतो. प्रजा आपले सर्व दु:ख बाजूला ठेवून आनंदाने आपल्या राजाचे स्वागत करते. नवे कपडे, मिठाई, फटाके, रोषणाई अशा जल्लोषात बळीराजाचे स्वागत होत असते. घराघरात बलिपूजन केले जाते.