Friday, June 26, 2015

राजर्षी शाहू महाराज


राजर्षी शाहू महाराज

राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सर्वोत्तम उदाहरण घालून देणारे आदर्श शासनकर्ते आणि बहुजनांमध्ये प्रचंड आत्मविश्र्वास निर्माण करणारे द्रष्टे समाजसुधारक !

राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले. १८९४ मध्ये महाराजांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर १९२२ पर्यंतची २८ वर्षांची त्यांची कोल्हापूर संस्थानातील कारकीर्द महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते.

राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापुरात मराठा, लिंगायत, पांचाल, जैन, मुसलमान, शिंपी, देवज्ञ, वैश्य, ढोर-चांभार, नाभिक अशा विविध जातींसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू केली. अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी ‘मिस क्लार्क बोर्डिंग’ हे वसतिगृह उभारले.बहुजन समाजातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन त्यांना शिक्षण घेण्यास महाराजांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्‍या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्‍या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.

त्यांनी अस्पृश्यांना (त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या) राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकर्‍या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. ‘दलितांच्या सेवेसाठी मला छत्रपतींचे सिंहासन सोडावे लागले तरी पर्वा नाही’ अशी घोषणा त्यांनी केली होती. जातिभेदाला महाराजांचा तीव्र विरोध होता. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. त्यांनी बहुजन समाजाची पिळवणूक करणारी कुलकर्णी वतने रद्द केली, तसेच महार कुटुंबांना गुलाम करणारी महार वतनेही रद्द केली.१९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली.

बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी १९१६ मध्ये निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ या संस्थेची स्थापना केली. ब्रह्मणेतर चळवळीच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी महाराजांनी महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागांत दौरे काढून सभा घेतल्या. राजर्षी शाहूंना ब्रह्मणेतर चळवळीचे उद्गातेच म्हटले जाते. बहुजन समाजाला व (तत्कालीन) शूद्रातिशूद्रांना राजकीय सत्तेतही सन्मानपूर्वक सहभाग मिळावा यासाठी त्यांनी सक्रिय प्रयत्न केले. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी आपल्या कार्यातून सत्यशोधक विचार पुढे नेलाच, शिवाय सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले, पाठिंबाही दिला.

‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकर्‍यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, राधानगरी धरणाची उभारणी, शेतकर्‍यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली.

राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला व लोककला या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले. यातून कलाकारांना राजाश्रय मिळालाच पण मुख्य म्हणजे या कलांचा विकास व विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात (व भारतातही) झाला. काही लेखक, संशोधक यांनाही त्यांनी प्रोत्साहनपर सहकार्य केले. त्यांनी खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. युवकांमध्ये व्यायामाची आवड उत्पन्न होण्यासाठी त्यांनी आखाडे, तालमी यांना आर्थिक सहकार्य केले, तसेच कुस्तीला प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. कोल्हापूरला ‘मल्ल विद्येची पंढरी’ म्हटले जाते ते यामुळेच.

राजर्षी शाहू महाराजांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक व कृषी-सिंचन या सर्वच क्षेत्रांतील कार्याचा दूरगामी परिणाम केवळ कोल्हापूर परिसरावरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रावर झालेला स्पष्टपणे जाणवतो. कोल्हापूर संस्थानाचे राजे असूनही त्यांनी लोकशाही पद्धतीने राज्यकारभार केला. डॉ. आंबेडकरांनी ‘सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ’ अशा समर्पक शब्दांत राजर्षी शाहूंचे वर्णन केले आहे. शाहू महाराजांच्या सर्वव्यापक कार्यामुळेच कानपूरच्या कूर्मी क्षत्रिय समाजाने त्यांना ‘राजर्षी’ ही पदवी बहाल केली.

अशा या द्रष्ट्या, पुरोगामी नेत्याचे ६ मे, १९२२ रोजी मुंबई येथे निधन झाले.

Tuesday, June 16, 2015

Shocking Facts about the Health Dangers of Wi-Fi

Wi-Fi is convenient but many have raised doubts concerning the safety of unseen forces that permeate everything around us.

1. Contributes to the Development of Insomnia


2. Damaging to Childhood Development


3. Affects Cell Growth The plants nearest the radiation didn’t grow. 


4. Derails Brain Function


5. Reduces Brain Activity in Females A group of 30 healthy volunteers, 15 men and 15 women, were given a simple memory test. First, the entire group was tested without any exposure to Wi-Fi radiation — no problem. Then, they were exposed to 2.4 GHz Wi-Fi from a wireless access point for about 45 minutes. During that portion of the testing, brain activity was measured and the women had a noticeable change in brain activity and energy levels


6. Neutralizes Sperm


7. May Impact Fertility


8. Provokes Cardiac Stress


9. Linked to Cancer?



Aniruddha's various links

!! Hari Om !!

All links give information about Sadguru Shree Aniruddha Bapu in some or
the other way.

  *Publications Websites*

Aanjaneya Publications

*http://www.aanjaneyapublications.com
<http://www.aanjaneyapublications.com/>*

The Exponent Group Of Journals

*http://www.exponentjournals.com <http://www.exponentjournals.com/>*

Third World War

*http://www.worldwarthird.com/ <http://www.worldwarthird.com/>*

Shree Krupasindhu Magazine

*http://www.krupasindhu.com/ <http://www.krupasindhu.com/>*

  *Blogs*

Samirsinh Dattopadhye

*http://aniruddhafriend-samirsinh.com/
<http://aniruddhafriend-samirsinh.com/>*

Nahu Tujhiya Preme

*http://nahutujhiyapreme.blogspot.in/
<http://nahutujhiyapreme.blogspot.in/>*

Aniruddha Friend Hindi

*http://aniruddhafriend-hindi.blogspot.in/
<http://aniruddhafriend-hindi.blogspot.in/>*

Aniruddha Friend English

*http://aniruddhafriend-english.blogspot.in/
<http://aniruddhafriend-english.blogspot.in/>*

Aniruddha Friend Gujarati

*http://aniruddhafriend-gujarati.blogspot.in/
<http://aniruddhafriend-gujarati.blogspot.in/>*

Aniruddha Friend Tamil

*http://aniruddhafriend-tamil.blogspot.in/
<http://aniruddhafriend-tamil.blogspot.in/>*

Aniruddha Friend Kannada

*http://aniruddhafriend-kannada.blogspot.in/
<http://aniruddhafriend-kannada.blogspot.in/>*

Aniruddha Friend Telugu

*http://aniruddhafriend-telugu.blogspot.in/
<http://aniruddhafriend-telugu.blogspot.in/>*

Aniruddha Friend Bangla

*http://aniruddhafriend-bangla.blogspot.in/
<http://aniruddhafriend-bangla.blogspot.in/>*

Aniruddha Friend French

*http://aniruddhafriend-french.blogspot.in/
<http://aniruddhafriend-french.blogspot.in/>*

Aniruddha Friend German

*http://journeytoaniruddha.blogspot.in/
<http://journeytoaniruddha.blogspot.in/>*

  *Youtube Video Channels*

Aniruddha Bapu Videos

*http://www.youtube.com/user/manasamarthyadatavid
<http://www.youtube.com/user/manasamarthyadatavid>*

Aniruddha Bapu - Abhangs and Gajars

*http://www.youtube.com/user/AbhangsGajarsofBapu

मुंबईकरांची मान्सून पिकनिक

पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे. रिमझिम बरसलेल्या पावसामुळे मुंबईकरांची मान्सून पिकनिकची तयारी सुपरफास्ट ट्रॅकवर आहे.
कैक फुटांच्या उंचीवरून येणारे फेसाळते पाणी अंगावर घेण्याची मजा काही औरच असते. लोणावळा, खंडाळा, माळशेज घाट यांसारख्या गजबजलेल्या ठिकाणांबरोबरचं जवळपासचे धबधबे शोधण्याची जोरदार धावपळ सुरू झालीये.

- भिवपुरी - माथेरानच्या कुशीत असलेले हे ठिकाण मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. भिवपुरी रेल्वे स्टेशनजवळ हॉटेल्स आहेत. गावकर्यांना सांगितल्यास ते जेवणाची सोय करतात.

- चिंचोटी - इथे पोहोचताना हिरव्या झाडाझुडपाच्या दाटीतून जावं लागतं. या मार्गावर ठिकठिकाणी धबधबे पाहायला मिळतील.मुख्य धबधब्याजवळ पोहचायला
सुमारे तासभर चालावं लागतं. दहिसर टोलनाक्यानंतर ‘कामन’ जंक्शनजवळ हे ठिकाण आहे. ट्रेनने जायचं असेल तर नायगाव स्टेशनला उतरून रिक्षाने जावे लागते.

- तुंगारेश्वर - नदी आणि धबधबा अशा दोन्ही ठिकाणचा आनंद घेता येतो.
मुंबईपासून सुमारे २ तासांच्या अंतरावर तुंगारेश्वर आहे. पर्यटकांसाठी
डोंगरावर कोणतीही जेवणाची व्यवस्था नाही.

- रांधा फॉल - सह्याद्रीच्या पर्वतरांगात विल्सन डॅमपासून तयार झालेला हा
धबधबा. या ठिकाणी जाण्यासाठी गाडी हा एकमेव पर्याय आहे. इगतपुरीजवळ
असलेल्या विल्सन डॅमजवळ हा धबधबा आहे. या ठिकाणी जेवणासाठी हॉटेल्सची सोय नसली तरी इगतपुरीजवळ जेवणाची व्यवस्था होते.

- पांडवकडा - खारघर परिसरात पांडवकडा हा धबधबा गेल्या दहा वर्षांंत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांच्या लीस्टमध्ये अग्रभागी आहे. या धबधब्यावर जाण्यास बंदी घातली असली तरी अनेक पर्यटक पांडवकड्याला भेट देतात. आजूबाजूच्या डोंगराने नेसलेला हिरवाकंच शालू पर्यटकांना भुरळ घालत असतो. हार्बर रेल्वे मार्गावरील खारघर स्टेशनवरून या ठिकाणी जाता येते.

- झेनिथ - खोपोली शहरापासून २ किमीवर असलेल्या झेनिथ धबधब्याच्या पाण्याचा फोर्स खूप आहे, पण तरीही तरुणाईला पिकनिकसाठी झेनिथला जाण्याचा मोह काही आवरत नाही.म्हणूनच शनिवारी-रविवारी या धबधब्यावर मोठी गर्दी होत
असते. इथल्या प्रत्येक कोपर्यावर पंजाबी धाबे आहेत.

- पळसदरी - मुंबई-पुणे महामार्गावरच्या चौक फाट्यापासून १८ किमी दूर आणि पळसदरी रेल्वे स्टेशनपासून दोन किमी अंतरावर पळसदरी धबधबा आहे.
रेल्वेमार्गाचा पर्याय असल्याने या ठिकाणी गर्दीचे प्रमाण जास्त असते.
जेवणाची सोय या ठिकाणी होते.

- गाढेश्वर - पनवेल तालुक्यात पावसाळी गर्दी गाढेश्वर नदीकाठी पाहायला मिळते. मनसोक्त डुंबण्यासाठी इच्छुक असणारे पर्यटक या ठिकाणी आवर्जून येतात.

- फणसाड धबधबा - फणसाड अभयारण्यामधील या धबधब्यात चिंब होणं म्हणजे एक रोमहर्षक अनुभव आहे. या धबधब्यात सचैल स्नानानंतर अभयारण्यात पक्ष्यांचा किलबिलाट आणि झाडांची हिरवाई पाहण्यात एक वेगळा आनंद आहे.

- सवतकडा - मुरुड-जंजिरापासून ११ किमी अंतरावरील सवतकडा धबधबा पर्यटकांनी शोधून काढला आहे. मुरुड-आगरदांडा रस्त्यावरील शिघ्रे गावातून सवतकड्याची पाऊलवाट जाते. या पाऊलवाटेवरून जाण्याचा थरार अविस्मरणीय आहे. जवळपास
खाण्याची सोय नाही.

- गवळीदेव - नवी मुंबईतील घणसोली गावाजवळ असणारा गवळीदेव धबधबाही आसपासच्या पर्यटकांना खुणावत आहे. शहराच्या इतक्या जवळ असूनही हा धबधबा आणि गवळीदेव डोंगर अनेक मूलभूत सोयीसुविधांपासूून वंचित आहे.

- कोंडेश्वर - बदलापूरपासून सहा किलोमीटर अंतरावर कोंडेश्वरचा धबधबा आहे. इथे दोन धबधबे आहेत. बदलापूर पूर्वेकडून भोज-दहिवली शेअर रिक्षा उपलब्ध आहेत. कुंडात डोह असून त्यात कपार्या असल्याने येथे पाण्यात उतरताना पुरेशी खबरदारी घ्यावी लागते.

- भगीरथ - वांगणीपासून चार किलोमीटर अंतरावर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरलेला भगीरथ धबधबा आहे. बेडीसगावापासून धबधब्याकडे जाण्यासाठी पायवाट आहे. या ठिकाणी जेवणाची सोय नाही.

- टपालवाडी - नेरळ रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटर अंतरावर असणार्या आनंदवाडी आदिवासी वाडीजवळ यथेच्छ पोहण्यासाठी छान डोह असणारा एक धबधबा आहे. अलीकडच्या काळात पर्यटकांपैकीच कुणीतरी ‘टपालवाडीचा धबधबा’ असे त्याचे नाव ठेवले आहे. ठिकाण अतिशय निसर्गरम्य असले तरी येथे जेवण तसेच कोणतेही खाद्यपदार्थ मिळण्याची व्यवस्था नाही.

- आषाणे - भिवपुरी-कर्जतदरम्यान भिवपुरीपासून पाच किमीवर असणार्या आषाणे गावाजवळील धबधबा हेही पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. इथे जाण्यासाठी भिवपुरीपासून रिक्षा मिळते. आषाणे ग्रामस्थ पर्यटकांना मागणीनुसार जेवण करून देतात.

- थिदबीचा धबधबा - पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा आपल्याला दिसतो. कल्याण-माळशेज रस्त्यावर
घाटाच्या पायथ्याशी साबर्णे गावापासून पुढे थिदबी गावापर्यंत ३ कि.मी.
कच्च्या रस्त्याने चालत जावे लागेल.

- निवळी - निवळी घाट चढताना पर्यटकांना आकर्षित करतो तो हिरव्या दाट झाडीतून कोसळणारा धबधबा. निवळी धबधब्याचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी घाटातच पर्यटकांसाठी खास पॉइंट तयार करण्यात आला आहे. ज्या पर्यटकांना प्रत्यक्ष धबधब्याजवळ जायचे असेल त्यांच्यासाठी पायर्यांचा मार्ग तयार
करण्यात आला आहे.

- मोहिली धबधबा - कर्जतपासून ६ ते ७ किमीवर उल्हास नदी पार करून मोहिलीत प्रवेश होतो. डोंगरावरून भिरभिरणारा वारा, हिरवीगार वनराई असे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवून ठेवावं, असे वाटते. धबधब्याजवळ थंड वातावरणात गरम गरम वाफाळता चहा आणि मक्याची कणसे खाण्याची मजाच काही औरच आहे.
लोणावळ्याचे भुशी धरण,त्यापुढे असणारी टायगर लीप दरी, या ठिकाणी
पावसाळ्यात बरेच पर्यटक जातात. इथून जवळच असलेला कोरीगड, तैलबैला,घनगड,
कैलासगड इत्यादीसारख्या किल्ल्यांना पावसाळ्यात भेट देण म्हणजे काही औरच मजा आहे. लोणावळ्याजवळील कार्ला-भाजे लेण्या, लोहगड,विसापूर, राजमाची, तुंग,तिकोन्याच्या वाटेने पुढे पौडमार्गे मुळशी धरणाला रस्ता जातो, तोच रस्ता खाली कोंकणात माणगाव-कोलाडला उतरतो. हाच तो ताम्हिणी घाट. मुळशी धरणाच्या काठाकाठाने जाणारा हा गाडी रस्ता अतिशय सुंदर असून एकीकडे धरणाचा पाणवठा आणि त्याचबरोबर उंच डोंगर आणि खोल दर्याचा देखावा एक
अविस्मरणीय आनंद देतो.

- माळशेजघाटाआधी मुरबाडजवळ असणारा पळूचा धबधबा हे एक उत्तम स्थळ आहे. याच्यामागे असणारी भीमाशंकरची डोंगररांग पावसाळ्यात विलोभनीय दिसते आणि त्याचबरोबर आपण गोरखगड, सिद्धगड, मच्छिंद्रगड इत्यादी एक दिवसाचे ट्रेकसुद्धा करू शकतो.

- ठाणे जिल्ह्यातील जव्हार म्हणजे डोंगरदर्या, असंख्य धबधबे, दूरवर
पसरलेली भातशेती, यांनी नटलेले छोटेसे हिल स्टेशन. इथला हनुमान टेकडी, शिर्पा माळ, दाभोसा धबधबा ठिकाण पाहण्यासारखा आहे. कसारा घाटाअलीकडे बळवंतगड हा छोटासा किल्लादेखील पाहण्यासारखा आहे.

- नाशिक त्र्यंबकेेशर परिसरात असणारे कावनई, गडगडा, त्रिंगलवाडी, हरिहर,
बसगड, अंजनेरी इत्यादीसारख्या बर्याच किल्ल्यांची सैर पावसात करता येते.

- ठाणे-नाशिक महामार्गावर आटगावहून तानसा आणि याच भातसा धारणाकडे जाणारा रस्ता आहे. इथेदेखील एक दिवसीय पावसाळी सहलीला जाता येईल. कळसुबाई,
भंडारदरा आणि रंध धबधब्याला पावसाळ्यात भेट द्या. इथले अमृतेेशर मंदिर आवर्जून पाहण्यासारखं आहे. साम्रात गावाजवळील सांधण दरी अप्रतिम आहे. रतनगड किल्लादेखील याच परिसरात असून अनेक मंडळी रतनगड ते हरिश्चंद्रगड असा ट्रेकदेखील करतात.

- धुळे-नंदुरबार इथून जवळ असलेल्या तोरणमाळ या ठिकाणची सुंदरता काही औरच आहे.इथले जंगल, डोंगर, दर्या, पक्षी, रंगीबेरंगी फुले आपले मन प्रसन्न
करून टाकतील यात वादच नाही.

- नाशिकच्या पुढेच असणार्या चाळीसगावाजवळील पावणादेवी आणि त्या परिसरातील जंगल हे पावसाळ्यात पर्यटनाचे आणखी काही पर्याय ठरू शकतात. इथे असलेला
कण्हेरगड किल्ला आणि केदारेेश्वर धबधबा पाहण्यासारखा आहे.

- चिखलदरा हे अमरावतीहून जवळ असणारे आणि विदर्भवासीयांचे आवडते ठिकाण. इथे असणारा गाविलगड किल्ला, किचकदरा यासारखी बरीच ठिकाणं पाहण्यासारखी आहेत.चिखलदर्याहून जवळच्या मेळघाट व्याघ्रप्रकल्पाला नक्की भेट द्या.

- सातारा जिल्ह्यातलं कासचे पठार म्हणजे महाराष्ट्रातील व्हॅली ऑफ
फ्लॉवर्स. साधारण सप्टेंबर महिन्यात या पठारावर असंख्य विविधरंगी फुले
फुलतात आणि त्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक इथे भेट देतात. कासबरोबरच सातार्याजवळ नदीकिनारी आणि जुन्या मंदिरांचा समूह असणार्या माहुली तसेच अजिंक्यतारा, सज्जनगड, ठोसेघर धबधबा पाहण्यासारखा आहे.
सातारहून ८ कि.मी. असणार्या कण्हेर धरणाला सुद्धा भेट देता येईल.

- ट्रेकर्सनी पन्हाळगड ते विशाळगड हा पावसाळी ट्रेक नक्की करावा. मसाईचे
विस्तीर्ण पठार, शेती, जंगल, ओढे, नदी, नाले, छोटी छोटी गावे अशा
ठिकाणांहून हा ट्रेक पूर्ण होतो.

- पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणार्या वाटेवर वरंधाघाट लागतो. वरंधाघाटा
लगतच कावळ्या या किल्ल्यावर जाता येईल. डोंगरातून वाहणारे छोटे मोठे झरे, धबधबे, बाजूला खोल दरी आणि त्या दरीत दिसणारं छोटंसं गाव, आणि त्या गावालगत वाहणारी नदी असे वेड लावणारं सौंदर्य वरंधाघाटात आहे. वरंधा घाट उतरल्यावर शिवथरघळ इथली गुहा आणि त्या गुहेबाहेर पडणारा पाऊस, धबधबा
म्हणजे क्या बात!

- रायगड जिल्ह्यातील नागोठणेजवळील सुकेळी खिंडीजवळ खांबगाव नजीक सुरगड
किल्ल्याला देखील भेट देणं छान वाटेल. मुंबईहून महाडकडे जाताना याच सुकेळी खिंडीपासून पायवाटेने साधारण २० मिनिटांनंतर एक उंच धबधबा दिसतो. त्या धबधब्याचं पाणी आणि नदी हे एक अतिशय सुंदर आणि सुरक्षित ठिकाण आहे.

- रायगड जिल्ह्यात खोपोली पाली रस्त्यालगत दुरशेत गावाआधी उंबरखिंड हे स्थान आहे. खंडाळ्याच्या डोंगरातून पडणारे पाणी उंबरखिंडीत येते आणि नदीमार्गे कोकणात जाते.दुरशेतहून पुढे जांभूळपाड्यामार्गे भेलीव गावालगतचा मृगगड हा किल्ला आणि त्याकडे जाणारा नदीलगतचा मार्गही पर्यटकांना भुरळ पाडतो. गणपतीच्या पाली गावाआधी ठाणाळे हा लेणी समूह आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर पावसाळ्यात आपले विलोभनीय रूप द