Sunday, October 5, 2014

Nandaramna

Sometimes Questions arises in our mind .......
Beautiful Answer by our Beloved Dharmawaran shri Yogindrasinh Joshi has Mentioned in his Notes on Facebook.
I have copied.
& here it is for all my friends.

दोन्ही हात उंचावून श्रद्धावान अत्यन्त प्रेमाने सद्‌गुरुला, भगवंताला पुकारतात. यात तसे पाहिले तर श्रद्धावानाचे सर्वस्व आहे. प्रेम, सेवा, शारण्य हे तीनही भाव यातआहेतच, त्याचबरोबर विरह, स्मरण, सामीप्याची प्रार्थना, समर्पण आणि जयजयकार हे भावदेखील यात आहेत.
'आई, माझे तुझ्याशिवाय दुसरे कुणीही नाही, फक्त तूच माझी हितकर्ती आहेस. मला तू हवी आहेस.' आईच्या विरहाने, आईच्या आठवणीने लहान मूल जसे आईला 'माझ्याजवळ येऊन मला उचलून घे गं' हे सांगताना दोन्ही हात उचलून आईला साद घालते, आईकडे पाहते; तसे 'प्रेमाने माझा उद्धार कर' अशी प्रार्थना श्रद्धावान सद्‌गुरुमाऊलीकडे करत आहे.
हा भक्तहृदयातून उठणारा टाहो आहे, ही श्रद्धावानाची सदैव-साद-स्थिति म्हणजेच भगवंताला सतत साद घालण्याची व्याकुळता आहे.
हात म्हणजे कार्यशक्ती. मी दोन्ही हात परोपकारासाठी म्हणजेच सेवेसाठी उचलत आहे. भगवंताने दिलेल्या शक्तीचा वापर कधीही विध्वंसासाठी किंवा परपीडेसाठी करणार नाही तर सदैव विकासात्मक पवित्र कार्यासाठीच करणार हा भगवंतासमोर केलेला निर्धार यात आहे.
मी जसा आहे तसा तुला शरण आहे हा अर्थही आहेच. मी सर्व सोडून तुझ्याकडे आलो आहे, सारा भार तुझ्यावर सोपवला आहे, आता माझे जे काही व्हायचे ते तुझ्या इच्छेने होवो हा समर्पणभावदेखील आहे. हा बिभीषणाचा भाव आहे.
दोन्ही हात उंचावून जेव्हा श्रद्धावान सद्‌गुरुचा, भगवंताचा जयघोषही करतात. 'रामो राजमणि: सदा विजयते' या सिद्धान्ताचा उद्‌घोषही येथे आहे. श्रद्धावान अशा प्रकारे  रामाला शरण जाणाऱ्या बिभीषणाच्या मार्गावरून सदैव चालण्याचा निर्धार करतात.

॥ अंबज्ञ ॥ ॥ अंबज्ञ ॥ ॥ अंबज्ञ ॥
Yogindrasinh Joshi.


No comments:

Post a Comment