गुरुकुल माहिती
जुईनगर गुरुकुल निवास मंदिर माहिती, पंच-पुरुषार्थ देवता स्थानं,गर्भ गृह मध्ये मंगेशी- शांतादुर्गा,महाकाली ,महालक्ष्मी,महासरस्वती ह्यांच्या मूर्ती स्थापित केल्या आहेत, सकाळी ११:३० च्या सुमारास गर्भ-गृह बंद करतात आणि नैवेद्य ,तांबुल अर्पण करतात तर पहाटे ५ वाजता देवतांचे नित्योपचार सुरु होतात . देवीन च्या समोर असलेल्या खांबा मध्ये कलश आहे, त्या कलश मध्ये
३३ पवित्र तीर्थाक्षेत्रान ची माती आहे, जेव्हा आपण ह्या कलशांना नमस्कार करतो तेव्हा आपला नमस्कार ह्या पवित्र क्षेत्रांना पोचतो, ह्या देवतांची ओटी भरली जाते, आणि मंगेशी ला श्रीफळ अर्पण केले जाते. ह्या देवता अत्यंत जागृत देवता आहेत,जिवंत आहेत, हे गर्भ गृह गोमुखा च्या आकाराचे आहे, देवतां कडे मुख केल्यावर उजवी कडे आत्ता फोटो gallery बनवली आहे, आधी त्या भागाला "गोपीनाथ शास्त्री अध्ययन कक्ष" असे म्हंटले जायचे तिथे शास्त्रीन चा फोटो आणि त्या खाली आपल्या लाडक्या बापू,नंदाई आणि दादान चा फोटो आणि बापूंच्या पादुका दर्शन साठी असायच्या, आत्ता ह्या ठिकाणी देवता प्रतिशठापणे चे फोटो लाव्लेलेल आहेत,
gallery च्या समोरच वर जाण्या साठी पायऱ्या आहेत, पहिल्या मजल्या वर पंचापुरुशार्थ उपासने ची recharching आणि उपासना शिकवली जाते.
खाली डावी कडे प.पू. आध्य-पिपा समाधी स्थानं आहे, आपण प.पू. आध्य-पिपान च्या समाधी ला अत्तर अर्पण करू शकतो, , समाधी ला नमस्कार करून प्रदक्षिणा घालून,
समोर असलेल्या रंग-शिळे वर उभे राहून साई बाबांच्या फोटो कडे बघत आपले कान पकडून ३ वेळा उड्या मारून माफी मागायची, ह्या ठिकाणी सत्य-साई पूजन दुपारी आणि संध्याकाळी होते, आपण बापूंना सुदीप अर्पण करू शकतो , आत्ता याग हि इथेच होतात, मागे धुनी आहे , मंगळवार,गुरुवार,शुक्रवार,आणि रविवार ह्या दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी आरती होई परंत धुनी चालू असते, इथे मन्नत धूप अर्पण करू शकतो आपण, आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी / संकटे दूर होण्यासाठी इथे मन्नत धूप अर्पण करतात. तिथेच धर्म-चक्राची स्थापना केली आहे, हे धर्म चक्र आपल्या विश्वातील सगळ्या magnetic waves चे केंद्र बिंदू आहे म्हणजे centre of point आहे तिथे स्थापित आहे .(धर्म-चक्रा बद्दल तिथे लिहलेली माहिती नक्की वाचा, आणि समाधी स्थानं मध्ये माहिती लिहलेली आहे ती पण नक्की वाचा ) , मंदिरातच 2nd floor वर ग्रंथालय आहे, आणि श्रीविश्वलोचन यंत्र आहे. हे यंत्र म्हणजे महाप्राण हनुमंताचे विश्वाकडे बघण्याचे नेत्रच आहे , ह्या यंत्र समोर बसून ४३ मिनिटे अध्ययन केल्याने आपले concentration वाढते. खाली तीर्थ म्हणून देवतांना अभिषेक केलेले जल भक्तांना देतात, आणि नैवेद्य चाच प्रसाद दिला जातो,
चैत्र नवरात्र, आणि अश्विन नवरात्र इथे साजरी केली जाते, अश्विन शुद्ध पंचमी म्हणजे ललिता पंचमी ला, आपल्या नंदाई चा उत्सव साजरा केला जातो,
श्रावणी शनिवारी इथे अश्वथ्य मारुती पूजन केले जाते, आणि मार्गशीर्ष शुक्रवारी वैभव-लक्ष्मी पूजन होते, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वर्धापन दिन असतो.
शब्द-संकलन संकेतसिंह भंडारी
No comments:
Post a Comment