Wednesday, January 21, 2015

आंबील

Aambil Receipe -

* साहित्य -

परिमल तांदूळ – १ वाटी
साखर – १ चमचा
दह्याचे ताक – ५ वाटी
पाणी – ७ वाटी
मीठ – चवीनुसार

* कृती -

सर्वप्रथम १ वाटी परिमल तांदूळ एका पातेल्यात घ्यावेत. त्यानंतर ते तांदूळ तीन वेळा पाण्यात धुवावेत. धुवून झाल्यानंतर त्यात ७ वाटी पाणी घ्यावे. जी वाटी आपण तांदूळ मोजण्यासाठी वापरली आहे, तीच वाटी पाणी मोजण्यासाठी वापरावी. त्यामुळे प्रमाणात फरक पडणार नाही. पाणी घेऊन झाल्यानंतर तांदळाचे पातेले कुकरमध्ये ठेवून ३ शिट्या काढाव्यात.

भात शिजल्यानंतर भाताचे भांडे कुकरमधून बाहेर काढून ठेवावे. जेव्हा आपण भाताचं भांडं बाहेर काढू तेव्हा त्यात पाणी असणारच आहे. आता हा भात थंड झाल्यानंतर मिक्सरमधून काढावा. अगदी थोड्या वेळासाठी म्हणजे ५ सेकंदांपर्यंत मिक्सर फिरवावा. मिक्सरच्या भांड्यातून परत तो भात त्या पातेल्यात काढून घ्यावा. आता त्यात १ चमचा साखर व चवीनुसार मीठ घालावे. साखर व मीठ घातल्यानंतर हा भात पुन्हा चांगल्या रितीने मिक्स करावा.

नंतर अशा प्रकारे मिक्स झालेल्या भातात ५ वाटी ताक घालावे. ताक घालून झाल्यानंतर परत ह्या भाताला व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. आता मिक्स झालेल्या भाताची चव घेऊन बघावी. गरज वाटल्यास मीठ थोडे अधिक घालावे. त्यानंतर हे भाताचे भांडे तसेच रात्रभर ठेवावे. फ्रिजमध्ये ठेवू नये. आंबील तयार होण्यासाठी साधारण १२-१४ तास वेळ लागतो.

अशा प्रकारे तयार झालेले आंबील आपण दुसऱ्या दिवशी, म्हणजे १४ तास झाल्यानंतर खाऊ शकतो.

म्हणजेच संध्याकाळी ८ वाजता केलेले आंबील आपण दुस-या दिवशी सकाळी १० वाजता खाऊ शकतो.

No comments:

Post a Comment