Monday, December 19, 2016

स्वामी आणि बापू

स्वामी आणि बापू यांचे संबंध 1906साली गुढीपाडवा या दिवशी आला होता, जेंव्हा बापूंचे पणजोबा गोपीनाथ शास्त्री पाद्धे त्यांची रोजची उपासना करत असताना,त्यांना अक्ललकोटच्या श्री स्वामी समर्थांचे दर्शन होते,आणि त्यांनी त्यांना श्री दत्त  उपासना निम या गावी, जे तापी नदीच्या काठावर वसलेले आहे, तिथे करण्यास सांगितले
गोपीनाथ शास्त्री रामनवमीच्या दिवशी पटकन निम गावी गेले आणि त्यांनी स्वामीनी सांगितल्या प्रमाणे दत्ताची उपासना सुरु केली. ही त्यांची उपासना अविरत तीन वर्ष म्हणजे1909च्या रामनवमी पर्यंत चालली.
स्वामी समर्थ राम नवमीच्या दिवशी निमच्या पुण्यक्षेत्री प्रकट झाले आणि गोपीनाथ शास्त्रीनां म्हणाले, तुला काय वर(आशीर्वाद) देऊ? गोपीनाथ शास्त्री स्वामीनां म्हणाले, माझी भक्ती आणि सेवा अशीच माझ्या कुटुंबात  वाढत राहू द्या आणि म्हणाले की तुम्ही आमच्या कुटुंबात जन्म घेवून आम्हाला धन्य करा."गोपीनाथ शास्त्री मोठे भक्त होते, त्यांना  सदगुरुंशिवाय कशाचीही आस(ओढ)नव्हती.
त्यांची ही ईच्छा मान्य करून स्वामी समर्थ म्हणाले,"तुला एक मुलगी होईल,आणि तिला ही एक मुलगी होईल,तुमच्या नातीच्या पोटी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी मुलगा जन्माला येईल, त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दत्तगुरुंचे 'भर्ग'म्हणजे पापाचा नाश करण्याची शक्ती. ती खरोखर दिव्य शक्ती ,जी श्री विठ्ठलाच्या द्ददयाची,जी मानवाच्या रुपाने येणार आहे.
ते स्वामी समर्थांचे शब्द होते आणि ते कधीच खोटे ठरणार नाहीत.आणि ते खरे झाले.गोपीनाथ शास्त्री यांची मुलगी मालती पाद्धे(विवाहानंतर शकुंतलाबाई पंडित)शकुंतलाबाईंची एकुलती एक मुलगी म्हणजेअरुंधती
त्यांना मुलगा झाला(अरुंधती मातेला)जो.खरोखर दत्तगुरुचा"परम  भर्ग"दुसरा कोणी ही नसुन आपले सदगुरु श्री. अनिरुद्ध बापू आहेत.
बापूंची आध्यात्मिक चळवळ काही श्रद्धावानां बरोबर 1996 साली सुरु झाली. तेव्हा पासून, भक्तीचीगंगा(बापूंचे श्रद्धावान भक्त)
40लाखां पर्यंत  भारतात तसेच विदेशात वाढत गेले. ही जी वाढ आहे, ती जाहीराती विनाची आहे, फक्त श्रद्धावानांना आलेल्या अनुभवांवरुन,ज्यांनी  त्याच्या वर विश्वास दाखवून आपल्या जीवनाचा मार्गदर्शक  मानले.
बापूनी उघडपणे सांगितले आहे की, ते कुणाचा ही अवतार नाहीत, ते चमक्तार  करत नाहीत, ते  शरीर,मन,आत्मा,याचे शुद्धिकरण हा च मोठा चमत्कार आहे असे मानतात.
त्यांना ज्यांना आपल्या वाईट नशीबाशी लढुन जीवनात पुढे प्रगती (आध्यात्मिक तसेच जागतिक)करण्यासाठी सक्षम बनवतात.
अनिरुद्ध जोशी ते अनिरुद्ध बापू हा प्रवास ही खूप छान गोष्ट आहे.
शिरडीचे श्री. साईबाबा यांनी गोविंद  रघुनाथ दाभोलकर यानां आपल्या स्वःताच्या  तीन वस्तू दिल्या,गोविंद रघुनाथ दाभोलकर ज्यांना हेमाडपंत म्हणत,जे बाबांचे जवळचे परम भक्त होते. बाबांनी त्यांना आश्वासन दिले होते की, एक दिवस मी परत येवून माझ्या वस्तू परत घेईन. बराच काळ लोटला ,बाबांच्या वस्तू हेमाडपंतानंतर त्यांचा नातू गोविंद गजाननदाभोलकर यांच्या कडे आल्या,जे आपा. दाभोलकर नावाने ओळखले जातात.  बाबानीं दिलेल्या वस्तूचे रहस्य फक्त दाभोलकरांच्या घरातील मंडळीना माहिती होते. बाबांच्या वस्तू मध्ये शाळीग्राम(पवित्र दगड जो पुजेत वापरला जातो),एक छोटा त्रिशूळ(त्रिदंड),आणि एक जपमाळ.
या तीनही वस्तू श्री.दाभोलकरांनी  साईनिवास,जे त्यांचे पूर्वजांचे घर आहे, जे बांद्रा येथे जतन करुन ठेवले होते. ईथेच साई निवास मघ्ये,श्री. साईनाथांच्या आशीर्वादाने श्री. साई सत् चरित्र लिहीले. डॉ.जोशी जे साईबाबांचे भक्त होते, ते नेहमी साई निवासला यायचे,ते दाभोलकर कुटुंबाला साई निवासच्या  घरी भेटले.
27 मे,1996 ला डॉ. जोशी साई निवासला गेले आणित्यांनी बाबांच्या वस्तूची मागणी केली. हे त्या दिल्या नंतर पूर्ण दाभोलकर कुटुंबाला बाबांचे  आजच्या युगात बाबा कसे दिसतील याचे दर्शन झाले.
बापूंनी आपल्या तीन ही ग्रंथात(सत्यप्रवेश,प्रेम प्रवास,आनंद साधना)मी कोण आहे, ते सांगितले आहे.
अबज्ञ.

No comments:

Post a Comment