Thursday, December 22, 2016

गुरूवार

   आठवड्याच्या सात दिवसांंमध्ये गुरूवार हा अत्यंत पवित्र दिवस आहे कारण कालगणना सुरू झाली अर्थात काळ अस्तित्वात आला ,त्या क्षणापासुनच्या पहिल्या दिवसाला गायत्रीमातेने गुरूवार म्हणून घोषित केले आहे .
    गुरूवारीसुद्धा जो दंडवत घालीत नाही किंवा 'आह्निक' ही करीत नाही किंवा इतर कुठल्याही प्रकारे भगवंताचे प्रेमपूर्वक स्मरण करीत नाही अशा व्यक्तीस सुख कसे बरे प्राप्त होणार ?
    गुरूवारी 'त्या 'चा शब्द सदैव गुंजत आला आहे आणि म्हणूनच 'त्या ' ची स्पंदने अधिकच सहजतेने मिळविता येतात .
    ' तो ' गुरूवारी हात पसरून प्रत्येक भक्ताला प्रेम देण्यासाठी हाकेच्या अंतरावर येऊन उभा राहतो म्हणून 'त्या ' च्याशी संवाद साधने अधिकच सोपे होत असते .

                               सदगुरु श्री अनिरुद्ध बापू

No comments:

Post a Comment